Breaking News

राहुल गांधी यांचा प्रहार, हिंदू धर्माच्या नावाखाली तुम्ही हिंसा घडवताय पंतप्रधान नरेंद्र मोदी राहुल गांधी यांचे भाषण ऐकण्यासाठी स्वतः लोकसभेत उपस्थित

संसदेत लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि इंडिया आघाडीच्या सदस्यांनी NEET परिक्षा लिकच्या प्रकरणी चर्चेची मागणी केली. मात्र लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी चर्चेची मागणी फेटाळून लावली. त्यामुळे विरोधकांनी साभात्याग केला. त्यानंतर लोकसभेत राष्ट्रपती यांच्या अभिभाषणावरील आभार प्रदर्शनावरील चर्चा लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांनी उपस्थित केली. त्यावेळी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना पहिल्यांदा संधी देण्यात आली.

यावेळी राहुल गांधी यांनी पहिल्यांदाच भाजपाच्या हिंदूत्वावादी भूमिकेवर हल्लाबोल करत म्हणाले की, माझे घर काढून घेतले, मला भाजपातून आणि प्रसारमाध्यमातून हल्ले सुरु ठेवले. याशिवाय माझ्याविरोधात २०० हून अधिक केसेस दाखल करण्यात आले. त्यातील एका केसच्या चौकशीसाठी मला बोलविण्यात आले. जवळपास माझी ५५ तास चौकशी झाली. त्यावेळी त्या चौकशी अधिकाऱ्याने चौकशी कॅमेरा बंद करत मला प्रश्न केला की, ५५ तास तुमची चौकशी सुरु आहे. मात्र तुम्ही कोणत्या दगडातून निर्माण झाले आहेत. या प्रश्नाचे उत्तर आता मी तुम्हाला सांगतोय, ही ताकद, ही शक्ती माझ्यासह इंडिया आघाडीच्या सर्व सदस्यांमध्ये आली ती या भोलेनाथ यांच्याकडे पाहुन असे सांगत यावेळी शंकर भोलेनाथ यांचे पोस्टर सभागृहात दाखवित म्हणाले की, हिंदू धर्मात लिहिलय की, हिंसा करू नका असेही लिहिलय, कोणाला घाबरू नका आणि घाबरवूही नका. पण सत्ताधारी भाजपा हिंदू धर्माच्या नावावर फक्त हिंसा घडवून आणत आहे. तुम्ही हिंसा करताय म्हणजे खरे हिंदू नाहीत असा आरोप केला.

पुढे बोलताना राहुल गांधी म्हणाले की, भगवान शंकराचा फोटो बघा, इस्लाम धर्म पहा, भगवान महावीर, गुरू नानक यांचा फोटा पहा, येशू ख्रिस्त, भगवान बुध्द या सगळ्यांनी हिंसेला कधीच स्थान दिले नाही. त्यांच्या प्रत्येक पोस्टरमधील मुद्रा बघा ती निर्भय मुद्रा असल्याचे यावेळी सांगितले.

मात्र राहुल गांधी यांच्या भगवान शंकराच्या पोस्टर दाखविल्याने हिंदूच्या नावाखाली फक्त हिंसा करत असल्याचा आरोप केल्यानंतर भाजपाच्या सदस्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्येच या गोंधळात स्वतः उठून म्हणाले की, राज्यघटनेतून मी एक गोष्ट चांगलीच शिकलोय की ती म्हणजे विरोधी पक्ष नेत्यांचे बोलणे गंभीरतेने घ्यायचे आहे. परंतु हिंदू समाजाला जबाबदार धरणे हे गंभीर असल्याचे मतही यावेळी व्यक्त केले.

पुढे राहुल गांधी बोलताना म्हणाले की, देशातील अल्पसंख्यांकाना सातत्याने धमकावणे त्यांच्यात भीती निर्माण करणे आदी गोष्टी भाजपाने आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्या आहेत. त्यामुळे भाजपाला सगळे घाबरून राहतात. परंतु मी नाही घाबरत भाजपाला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना असे आव्हानही यावेळी दिली.

यावेळी राहुल गांधी बोलताना म्हणाले की, देशाचे संरक्षण मंत्री अग्निवीर योजनेतील सैनिकांना पेन्शन देणार नाही म्हणतात, त्याचा मृत्यू झाला तर त्याला शहिदाचा दर्जा देणार नाही म्हणतात. परंतु काळजी करू नका आमचे सरकार आल्यानंतर अग्निवीर योजना आम्ही बंद करणार असून त्यांना मुळ सैनिकाप्रमाणे सर्व गोष्टी देणार असल्याचे निर्धार पूर्वक सांगितले.

राहुल गांधी यांच्या आक्षेपावर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी लगेच मध्येच उठून म्हणाले की, विरोधी पक्षनेते जे सांगत आहेत त्यातून लोकसभा सभागृहाची दिशाभूल करत आहेत. आमच्या ताफ्यातील एखाद्या सुरक्षा रक्षकाचा जरी मृत्यू झाला तरी त्याच्या कुटुंबियाला एक कोटी रूपयांचा धनादेश आम्ही देतो, तसेच शहिदाचा दर्जा देतो. त्यामुळे राहुल गांधी यांची वक्तव्य पटलावरून काढून टाकावे अशी मागणी केली.

राजनाथ सिंह यांनी घेतलेल्या आक्षेपावर उत्तर देताना राहुल गांधी पुढे म्हणाले की, सभागृहात एकाबाजूला संरक्षण मंत्र्यांनी केलेले वक्तव्य आहे तर दुसऱ्याबाजूला मी केलेले एक वक्तव्य आहे. परंतु खरे काय ते अग्निवीर योजनेतंर्गत भरती झालेल्या सर्वांना काय वास्तव आहे ते माहित आहे असे प्रत्युत्तरही लगेच दिले.

पुढे बोलताना राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बायोलॉजिकल प्रोसेसमधून जन्म झालेला नसून थेट परमात्माने आपल्याला पाठविले असल्याच्या वक्तव्याचा उल्लेख करत म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्या परमात्म्याचा निरोप आला की अन्य कोणी एकाने दिला. यांनी रात्रीत जीएसटी लागू केली. पुन्हा निरोप आला की, नोटबंदी केली.

राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी हरकत घेतली, त्यावर राहुल गांधी म्हणाले की, हि सर्व वक्तव्य माझी नसून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच प्रसारमाध्यमांना दिलेल्या मुलाखतीत सांगितली आहेत. ती सर्व वक्तव्ये लोकांमध्ये आहेत, असा उल्लेख केला. त्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही राहुल गांधी यांच्या उत्तरावर आक्षेप घेत या सगळ्या गोष्टींची सत्यता पडताळणारी वक्तव्यांचा पुरावा द्यावी अशी मागणी करत तुम्ही ज्या लोकतंत्राचा उल्लेख करता त्या लोकशाहीचा गळा तुमच्याच पक्षाने घोटून सर्व अधिकार निलंबित केले असा टोलाही यावेळी लगावत पुढे म्हणाले की, विरोधी पक्ष नेत्यांना कदाचित माहिती नसावे की, देशातील करोडो लोक गर्व से कहो हिंदू है म्हणतात असे सांगत बचावात्मक पवित्राही यावेळी घेतला.

पुढे बोलताना राहुल गांधी म्हणाले की, या देशातील गरिब अल्पसंख्याक आणि दलित यांच्यात तुम्ही भीती निर्माण केलात. खरं तर तुम्ही काँग्रेसला घाबरता. त्यामुळेच या गोष्टी करत राहता. मात्र मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घाबरत नाही, भाजपाला घाबरत नाही असे ठामपणे सांगितले.

देशातील मणिपूरमधील दंगलीचा उल्लेख करत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यावर हल्लाबोल करत म्हणाले की, मणिपूर हा देशाचा भाग आहे हे पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री शाह हे मानायला तयार नाहीत. त्यामुळेच ते अद्याप पर्यंत मणिपूर सातत्याने हिंसाचारग्रस्त असतानाही एकदाही भेट दिली नाही यावरून टीका केली.

त्याचबरोबर राहुल गांधी पुढे म्हणाले की, आता आपण काहीसे देशाच्या भविष्यावर अर्थात हजारो विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबद्दल, भविष्याबद्दल बोलू असे सांगत नीट परिक्षेसाठी वर्षनवर्षे विद्यार्थी अभ्यास करत असतात. पण त्यांच्या परिक्षेचा पेपर लीक होतो. त्या पेपर लीक थांबविण्याचे काम केले जात नाही. त्यांच्या नोकरीसाठीची परिक्षा होते, त्याचाही पेपर फुटतो त्यामुळे आता विद्यार्थ्यांचा विश्वास सरकारच्या परिक्षेवर राहिला नाही. बरं परिक्षा सगळ्या केंद्र सरकारने सगळ्या स्वतःकडे घेतल्या. त्यातून विद्यार्थ्यांकडून लाखो-कोट्यावधी रूपयांचा निधी फक्त सरकारच्या तिजोरीत जमा होतो. मात्र त्यांच्या हाती काही पडत नाही अशी टीका करत हे सरकारी यंत्रणांचे अपयश असल्याचा आरोपही यावेळी केला.

राहुल गांधी यांनी यावेळी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या कृतीवरही टीका करताना म्हणाले की, ज्या दिवशी लोकसभा अध्यक्ष पदासाठी तुमची निवड झाली. त्यावेळी मी आणि पंतप्रधान मोदी आम्ही तुमच्या बाकाजवळ येवून तुम्हाला खुर्चीवर आसनस्थ केले. त्यावेळी तुम्ही माझ्याशी हस्तांदोलन केले. पण पंतप्रधान मोदी यांनी जेव्हा तुमच्याही हस्तांदोलन केले त्यावेळी तुम्ही त्यांच्यासमोर झुकलात अशी आठवण सांगताच ओम बिर्ला म्हणाले की, आमचे संस्कार आणि संस्कृती आहे की, आपल्यापेक्षा वयाने आणि पदाने मोठे असलेल्या व्यक्तीसमोर झुकावे. त्यावर राहुल गांधी म्हणाले की, ही लोकशाही आहे, या सदनाचे तुम्ही प्रमुख व्यक्ती आणि नेता आहात, या लोकसभेत सर्वात मोठा नेता कोण तर तो सभागृहाचा अध्यक्ष हा असतो. त्याच्यासमोर आम्ही झुकू परंतु बाकीच्यांसमोर तुम्ही झुकणे योग्य नाही. त्यामुळे आम्ही तुमचे आदेश मानू आणि झुकू असे सांगत अध्यक्षाने दुसऱ्यासमोर झुकणे योग्य नसल्याची बाबही अध्यक्षाच्या निदर्शनास आणून दिली.

भाषणाच्या शेवटी राहुल गांधी म्हणाले की, मला गर्व आहे की आम्ही विरोधकात मध्ये बसलो आहोत. लोकांची सगळी ताकद आमच्याकडे आहे. तुम्हाला फक्त सत्ता हवी होती म्हणून तुम्ही तिकडे आहात. आम्ही तुमचे दुश्मन नाही आम्ही चर्चेला तयार आहोत, आमच्याशी चर्चा कराल तर देशासाठी चांगल्या गोष्टी करता येतील, एखाद्या गोष्टीत सुधारणा करता येतील अशी अपेक्षा व्यक्त करत जर तुम्ही यापैकी काहीच करणार नसाल तर तुमचा पराभव निश्चित आहे. तसेच गुजरात मध्ये यावेळी तुमचा पराभव आम्ही करणार, हे लिहून ठेवा असे आव्हानही यावेळी पंतप्रधान मोदी आणि भाजपाला दिले.
राहुल गांधी यांचे भाषण झाल्यानंतर तृणमूलच्या मोईआ मोईत्रा बोलायला उभ्या राहिल्या. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभागृहाच्या बाहेर पडणे पसंत केले.

Check Also

देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन, … वीज पुरवठ्याची व्यवस्था तपासणार आशिष जयस्वाल, योगेश सागर, प्राजक्त तनपुरे यांच्या प्रश्नावर फडणवीस यांचे उत्तर

राज्यात बऱ्याच ठिकाणी वेळोवेळी मोठी प्रदर्शने भरविण्यात येतात. तसेच काही शहरांमध्ये ‘गेम झोन’ आहेत. या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *