Breaking News

राहुल गांधी यांनी उडविली पंतप्रधान मोदी यांच्या महात्मा गांधी यांच्यावरील त्या वक्तव्याची टिंगल महात्मा गांधी यांना जाणून घेण्यासाठी एन्टायर पॉलिटीकल सायन्सच्या विद्यार्थ्यांना पिक्चर बघण्याची गरज

लोकसभा निवडणूकीच्या निमित्ताने मागील काही दिवसांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अचाट वक्तव्यावरून सातत्याने कोणता ना कोणता तरी वाद निर्माण होत आहे. त्यातच नुकत्याच एका खाजगी वृत्त वाहिनीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुलाखत दिली. या मुलाखतीत पंतप्रधान मोदी यांनी महात्मा गांधी यांना कोणी ओळखत नव्हते असे धांदात बुध्दीची किव करणारे वक्तव्य केले. तसेच गांधी चित्रपट आल्यानंतरच महात्मा गांधी यांना जगात ओळखले जायला लागले असे भ्रामक वक्तव्यही केले. यावरून राहुल गांधी एक्स या मायक्रो ब्लॉगिंगवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या वक्तव्याची चांगलीच टिंगल उडविली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सातत्याने लोकसभा निवडणूकीच्या निमित्ताने अनेक वृत्तवाहिनीच्या संपादकांना बोलावून मुलाखत देण्याचा सपाटाच लावला आहे. या मुलाखतीतून कधी हिंदू-मुस्लिम धर्मियांविषयी वक्तव्य करणारे, तर कधी काँग्रेसच्या नेत्यांवरून तर कधी मुघलांवरून तर कधी ब्रिटीश राजसत्तेवरून सातत्याने कोणते ना कोणते वक्तव्य करून संयुक्त पुरोगामी विचारधारेच्या लोकांकडून टीकेचे झोड उडवून घेत चर्चेत राहतात. याशिवाय मध्यंतरी २१ व्या शतकाच्या विज्ञान युगात पंतप्रधान मोदी यांनी बायलॉजिकल प्रोसेसमधून आलो नाही तर परमात्माने खास पाठविला असल्याचे वक्तव्य करत त्यांच्या हातून सगळं काही आपोआप घडवून येत असल्याचे इललॉजिकल वक्तव्य केले. त्यावरून नेटकऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चांगलाच समाचार घेतला.

https://x.com/zoo_bear/status/1795756792863129652

तर पंतप्रधान मोदी यांनी काल एका वृत्त वाहिनीला मुलाखत देताना कहरच केला, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुलाखत देताना म्हणाले की, महात्मा गांधी यांना फारसे कोणी ओळखत नव्हते. परंतु त्यांच्यावरील गांधी हा चित्रपट आल्यानंतर जगभरात गांधी यांच्याबद्दल उत्सुकता निर्माण झाली. त्यातूनच महात्मा गांधी यांच्याबद्दल जगभरात जाणून घेण्यास सुरुवात झाली आणि त्यानंतरच त्यांचे महान कार्याची ओळख झाल्याचे टीपण्णी केली. तसेच मागील ७५ वर्षात महात्मा गांधी किती महान होते हे जगाला सांगायचे काम आपले होते. पण आपण जगाला सांगायची जबाबदारी आपण पार पाडली नसल्याचे वक्तव्यही केले. या मुलाखतीतील १.२० मिनिटाचा व्हिडिओ चांगलाच एक्सवर व्हायरल झाला. या व्हायरल व्हिडिओवर नेटकऱ्यांनीही यथेच्छ टीका सुरु केली.

नेटकऱ्यांनंतर काँग्रेस नेते राहुल गांधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या याच वक्तव्याची एक्सवरून टीका करत टींगल केली. राहुल गांधी आपल्या एक्स या मायक्रोब्लॉगिंग अकाऊटंवर म्हणाले की, फक्त एंटायर पॉलिटीकल सांइस च्या विद्यार्थ्यांना महात्मा गांधी यांच्याबद्दल जाऊन घेण्यासाठी चित्रपट पहावा लागतो अशी खोचक टींगल करत टींगल उडविली.

https://x.com/RahulGandhi/status/1795768872269926794

Check Also

भाजपा सोलापूरातील एका आमदाराला घरी बसविणार वाढत्या असंतोषाच्या पार्श्वभूमीवर भाजपामध्ये खलबतं सुरु

आगामी विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी महायुतीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या भाजपाकडून पुन्हा सत्तेत येण्याच्या अनुषंगाने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *