Breaking News

रामदास आठवले यांची स्पष्टोक्ती, शिवाजी महाराजांचा पुतळा… निर्णय चुकीचा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंची मालवण मधील राजकोट किल्ल्याला भेट

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्याची दुर्घटना अत्यंत दुःखद मनाला चटका लावणारी आहे. या प्रकरणी सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी. मालवण राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याचे काम नवोदित शिल्पकारास देण्याचा निर्णय चुकीचा होता. राज्यात राम सुतार आणि सारंग सारखे ज्येष्ठ अनुभवी शिल्पकार असताना नवोदितांना ही मोठी जबाबदारी देण्याचा निर्णय चुकीचा होता असे मत केंद्रीय सामजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले.

आज मालवण मधील राजकोट किल्ल्याला रामदास आठवले यांनी आज भेट देऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्याची दुर्घटना घडलेल्या जागेची पाहणी केली.

रामदास आठवले पुढे बोलताना म्हणाले की, मालवण राजकोट मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्याची दुर्घटना अक्षम्य आहे. मोठे वादळ आलेले नसताना पुतळा कसा कोसळला याची सखोल चौकशी झाली पाहिजे. नेव्ही आणि पीडबल्यूडीच्या जबाबदार अधिकाऱ्यांची चौकशी झाली पाहिजे. याप्रकरणी दोषींना कठोर शिक्षा झाली पाहिजे. जो कोणी मुख्य दोषी असेल त्यास फशीची कठोर शिक्षा झाली पाहिजे असा हा गुन्हा घडला असल्याचे मत व्यक्त केले.

पुढे बोलताना रामदास आठवले म्हणाले की, याप्रकरणी पंतप्रधान मोदींनी आणि मुख्यमंत्री शिंदेंनी माफी मागितली आहे. त्यामुळे विरोधकांनी यात राजकारण करू नये. या प्रकरणी चौकशी समिती नियुक्त करण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पुन्हा कसा मजबूत चांगला भव्य उभारता येईल यासाठी सर्वांनी एकत्र प्रयत्न करावेत. त्यासाठी राज्य सरकार ने नव्याने पुतळा उभारण्यासाठी सत्ताधारी पक्षासोबत विरोधी पक्षातील लोकप्रतिनिधींना आणि तज्ञांचां समावेश करून समिती नियुक्त करावी. या समितीने नवीन पुतळा कसा असावा आणि त्याच्या निर्मितीचे काम कुणास द्यावे याचा शासनाला सल्ला द्यावा अशी भूमिकाही यावेळी स्पष्ट करत आपण याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असल्याचेही यावेळी सांगितले.

पुढे बोलताना रामदास आठवले म्हणाले की, कन्याकुमारी येथे तीन समुद्राचा संगम आहे तिथे अनेक पुतळे आहेत, मात्र आजवर कधीही पुतळा कोसळण्याची दुर्घटना घडली नाही. मात्र राजकोट मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्याची दुर्घटना घडली याचे दुःख असल्याचेही यावेळी सांगितले.

Check Also

महाराष्ट्रातील वीज खरेदीचे कंत्राट अदानीला; जयराम रमेश यांचे पाच प्रश्न जयराम रमेश यांचा आरोप, पराभवाच्या छायेखाली असतानाही कंत्राट अदानीलाच

राज्याच्या ऊर्जा विभागाने नुकतेच वीच खरेदी संदर्भात निविदा काढली होती. मात्र हि निविदा अदानीलाच मिळावी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *