Marathi e-Batmya

सत्यपाल मलिक यांचे भाकित, निवडणूकीत भाजपाचा सुपडा नाही अंताची सुरवात

जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी राज्यपाल पदावरून निवृत्त झाल्यानंतर भाजपाचा राजीनामा देत भाजपाच्या दुट्टपी भूमिकेची सातत्याने पोलखोल करण्यास सुरुवात केली. त्यातच आज माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी मातोश्री निवासस्थानी जात शिवसेना उबाठा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी संजय राऊत हे ही उपस्थित होते.

सत्यपाल मलिक हे जम्मू काश्मीर मधील पुलवामा घटनेवरून भाजपाने घेतलेल्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करून भाजपाच्या भूमिकेच्या कथित देशप्रेमाचा बुरखा फाडला.

उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर सत्यपाल मलिक म्हणाले की, विधानसभा निवडणूकीत भाजपाचा नुसता फटका बसणार नाही तर भाजपाचा सुफडा साफ होणार आहे. या विधानसभा निवडणूकी उद्धव ठाकरे हे प्रमुख भूमिका बजावणार असल्याचे सांगत कुणाला त्यांची काळजी करण्याचे कारण नसल्याचेही यावेळी सांगितले.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सरकारबाबत विचारले असता इंग्रजीतील म्हण म्हणून दाखवत लास्ट नेल इन बीजेपी कॉफीन असे सांगत विधानसभा निवडणूका या भाजपाच्या अंताची सुरुवात असेल असा विश्वासही सत्यपाल मलिक यांनी यावेळी व्यक्त केला.

राज्यातील विधानसभा निवडणूकांबाबत बोलताना सत्यपाल मलिक म्हणाले की, महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूकातील निकालाचे पडसाद संपूर्ण देशभर उमटणार असून देशातील परिस्थितीही ढवळून निघणार असल्याचे भाकितही यावेळी वर्तविले.

Exit mobile version