Marathi e-Batmya

शेख हसीना यांनी मागितला लंडनमध्ये आश्रय, पण अद्याप निर्णय नाही

बांग्लादेशातील विद्यार्थ्यांच्या हिंसक आंदोलनानंतर देशातून पळून गेलेल्या बांग्लादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना या आणखी काही दिवस भारतात राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे. माजी पंतप्रधान हसीना शेख यांनी लंडनमध्ये राजकिय आश्रय मागितला आहे. मात्र लंडनने अद्याप त्यासंदर्भात कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे हसीना शेख या आणखी काही दिवस भारतात राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

वादग्रस्त कोटा प्रणालीवर हिंसक निदर्शने आणि व्यापक दंगलींनंतर शेख हसीना, ज्यांच्या १५ वर्षांच्या कारकिर्दीचा नाट्यमयरित्या अंत झाला, सोमवारी संध्याकाळी दिल्लीजवळील हिंडन एअरबेसवर उतरले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हसीना ब्रिटनमध्ये आश्रय घेण्याची शक्यता आहे, कारण तिची बहीण शेख रेहाना हीच्याकडे ब्रिटिश नागरिकत्व आहे.

तथापि, लंडन येथे आश्रय नियम अवामी लीग नेत्यासाठी अडथळा ठरण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. यूके इमिग्रेशन नियम आणि निकषांनुसार: “ज्या लोकांना त्याची गरज आहे त्यांना संरक्षण प्रदान करण्याचा यूकेचा नियम आहे. आश्रय किंवा तात्पुरता आश्रय घेण्यासाठी एखाद्याला यूकेमध्ये प्रवास करण्याची परवानगी देण्याची आमच्या इमिग्रेशन नियमांमध्ये कोणतीही तरतूद नसल्याचे एका ब्रिटीश अधिकाऱ्याने सांगितले.

तसेच, ज्यांना आंतरराष्ट्रीय संरक्षणाची गरज आहे त्यांनी पोहोचलेल्या पहिल्या सुरक्षित देशाच्या आश्रयाचा दावा केला पाहिजे – हा सुरक्षिततेचा सर्वात वेगवान मार्ग आहे, अशी नियमात तरतूद आहे.

मंगळवारपर्यंत, शेख हसीना हिंडन एअरबेसजवळील एका सुरक्षित घरात राहत आहेत.

बांग्लादेशात हिंसाचार विद्यार्थी आंदोलनाला हिंसक वळण लागण्यानंतर बांग्लादेश हवाई दलाच्या C-130J विमानाने पोहोचल्या, त्यानंतर विमान पुन्हा ढाका येथे परतले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, १६ तासांच्या मुक्कामादरम्यान क्रूला हिंडन एअरबेसवर भारत सरकारकडून चोहूबाजूने संरक्षण पुरवले, तसेच आवश्यक असलेल्या सर्व सुविधाही पुरविण्यात येत आहेत.

दरम्यान, शेख हसीना यांचा मुलगा आणि त्यांचे माजी अधिकृत सल्लागार सजीब वाझेद जॉय यांनी म्हटले आहे की, त्यांच्या आईने बांग्लादेशासोबत जे केले ते योग्य केलं असे सांगत त्यांनी काहीही चुकीचे केलेले नाही, शेख हसीना यांनी बांग्लादेशाला सर्वोत्तम सरकार दिले, आता ती तिच्या नातवंडांसोबत वेळ घालवेल असेही सांगितले.

Exit mobile version