Marathi e-Batmya

शरद पवार यांची स्पष्टोक्ती, परस्पर उमेदवार जाहिर करायला परवानगी नाही

नुकतेच श्रीगोंदा येथील एका कार्यक्रमात बोलताना शिवसेना उबाठाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी श्रीगांदा येथील शिवसेना उबाठाचा उमेदवार म्हणून पाचपुते असतील अशी घोषणा केली. त्यावरून महाविकास आघाडीत खडाखडीला सुरुवात झाली. त्यातच महाविकास आघाडीचे प्रमुख नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांनी संजय राऊत यांचे नाव न घेता त्यांचे कान टोचले. त्यानंतर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनीही शरद पवार यांची भूमिका बरोबर असल्याची सांगत समर्थन दिले.

शरद पवार आज बोलताना म्हणाले की, महाविकास आघाडीत उमेदवार आणि जागा वाटपाची चर्चा अद्याप सुरु आहे. मात्र परस्पर कोणीही आपला संभावित उमेदवार आणि सदर विधानसभा मतदारसंघाची जागा आपल्याच पक्षाला मिळणार असल्याचा दावा कोणीही आधीच जाहिर करू शकत नाही, तशी परवानगी कोणाला नाही अशी स्पष्टोक्ती दिली.

तसेच पुढे बोलताना शरद पवार म्हणाले की, आगामी १० दिवसात महाविकास आघाडीतील जागा वाटपाची चर्चा पूर्ण होणार असल्याचे सांगत त्या अनुंगाने चर्चा सुरु असल्याचेही यावेळी सांगत फक्त काही जागांवरील चर्चा शिल्लक असल्याचे सांगितले.

शरद पवार यांच्यापाठोपाठ काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, शरद पवार यांनी मांडलेली भूमिका योग्य असून अंतिम जागा वाटप आणि मतदारसंघाचे वाटप झाल्याशिवाय कोणीही परस्पर त्यांच्या पक्षाच्या उमेदवाराची घोषणा आणि जागेची घोषणा करू शकत नाही असेही यावेळी सांगितले.

शरद पवार आणि विजय वडेट्टीवार यांनी भूमिका स्पष्ट केल्यानंतर संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, श्रोगांदा येथील मतदारसंघाबाबत आणि तेथील उमेदवाराची घोषणा मी केली नाही. कदाचित शरद पवार यांच्यापर्यंत अपुरी माहिती पोहचली असेल त्यामुळे शरद पवार यांनी तसे वक्तव्य केले असेल. मात्र आम्ही विधानसभेच्या २८८ जागांवर एकत्र तयारी करून लढणार असल्याचेही यावेळी सांगितले.

Exit mobile version