Breaking News

जोडे मारो आंदोलनः उद्धव ठाकरे यांचा सवाल, पंतप्रधानांनी माफी कशाची मागितली शिवद्रोही, गेट ऑऊट ऑफ इंडिया

मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळ्याप्रकरणाच्या विरोधात आज महाविकास आघाडीच्या शिवसेना उबाठा, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने जोडे मारो आंदोलन करण्यात आले. यावेळी उद्धव ठाकरे, नाना पटोले, संजय राऊत यांच्यासह अनेक नेते हुतात्मा चौक ते गेट वे ऑफ इंडियापर्यंत काढलेल्या मोर्चात पायी चालत गेले. तर राष्ट्रवादीचे प्रमुख नेते शरद पवार आणि कोल्हापूरचे खासदार छत्रपती शाहु महाराज हे दोघे मिळून सुरुवातीला काही अंतर चालले. त्यानंतर गेट वे ऑफ इंडियाजवळ गाडीने प्रवास करत पोहोचले. गेट वे ऑफ इंडिया येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ या मोर्चा पोहोचला. त्यानंतर राज्यातील महायुती सरकारला प्रतिकात्मक जोडे मारले.

यावेळी झालेल्या जोडे मारो आंदोलनावेळी झालेल्या छोटेखानी सभेत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, नुकतेच पंतप्रधान आले होते. त्यावेळी त्यांनी माफी मागितल्याचे पाहिले. पण माफी मागतानाही त्यांच्या आवाजात सत्तेची मग्रुरी असल्याचे दिसून आले. बोलण्यात मग्रुरी ठेवत, नुसते तोंडातून नतमस्तक म्हणून बोलण्यातून माफी मागितले असे होता नाही, त्यावेळी तेथेच असलेल्या उपमुख्यमंत्री नंबर एक असलेले मात्र हसत होते. परंतु पंतप्रधानांनी नेमकी कशाची आणि कशाबद्दल माफी असा सवाल करत पंतप्रधानांनी पुतळा घाईत उभारला म्हणून माफी मागितली की, कोसळून पडला म्हणून माफी मागितली की, शिवद्रोह्यांना सत्तेत सहभागी करून घेत त्यांच्या हाती सत्ता सोपवली म्हणून माफी मागितली असा सवालही यावेळी पंतप्रधानांना केला.

पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला म्हणून तुम्ही येवून माफी मागितली, जर तुमही माफी मागितली नसती तर महाराष्ट्राने तुम्हाला शिल्लक तरी ठेवले असते का असा उपरोधिक सवालही यावेळी केला.

उद्धव ठाकरे पुढे बोलताना म्हणाले की, राज्यातले हे सरकार शिवद्रोही सरकार असून या शिवद्रोह्यांमधील एक मंत्री म्हणून शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला हे चांगलं झालं, वाईटातून नेहमी चांगलं घडतं असे म्हणते होते. पुतळा पडण्यालाही चांगल म्हणणारे असले शिवद्रोही सरकारला काहीही करून हद्दपार करण्याची वेळ आली आहे. हे गेट वे ऑफ इंडिया भारताचे प्रवेशद्वार या प्रवेशद्वारातूनच आपणाला या शिवद्रोह्यांना गेट ऑऊट ऑफ इंडिया करायचे असल्याचा निर्धार व्यक्त करत त्यासाठी आता जाग आली आहे असेच पुढेही जागे रहा असे आवाहनही यावेळी उपस्थित केला.

शेवटी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, शिवछत्रपती हे फक्त शिवाजी महाराज नाहीत, तर या महाराष्ट्राचा आत्मा आहे असेही यावेळी सांगितले.

त्यानंतर कोल्हापूरचे खासदार शाहु महाराज म्हणाले की, शिवछत्रपतींचा पुतळा उभारतानाही या शिवद्रोही सरकारने टक्केवारी घेतल्याचे दिसून येत आहे. शिवछत्रपती यांचा पुतळाही उभारण्यात या सरकारने टक्केवारी घेतल्याने हे सरकार शिवद्रोही सरकार असल्याचा आरोपही यावेळी करत या सरकारला घालवले पाहिजे अशी घोषणा यावेळी केली.

Check Also

भाजपा सोलापूरातील एका आमदाराला घरी बसविणार वाढत्या असंतोषाच्या पार्श्वभूमीवर भाजपामध्ये खलबतं सुरु

आगामी विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी महायुतीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या भाजपाकडून पुन्हा सत्तेत येण्याच्या अनुषंगाने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *