Marathi e-Batmya

उद्धव ठाकरे यांची खोचक टीका, बाजार बुनग्यांना महाराष्ट्र पायाखाली आणायचाय

उद्धव ठाकरे यांनी बुधवारी केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांच्यावर जोरदार हल्लाबोल करत अमित शाह यांना ‘बाजरबुंगे’ अशा शब्दात टीका केली. पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, शाह यांना महाराष्ट्राला पायाखाली आणायचे आहे, पण महाराष्ट्र ही महान लोकांची भूमी असल्याची आठवणही यावेळी करून दिली.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शाह दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. अमित शाह कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांच्या आढावा बैठका घेत आहेत. मंगळवारी त्यांनी नागपूर येथे बैठक घेऊन विदर्भाच्या तयारीचा आढावा घेतला. कार्यकर्त्यांना संबोधित करताना अमित शाह यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना राजकीयदृष्ट्या संपवण्याचे आवाहन कार्यकर्त्ये आणि पदाधिकाऱ्यांना केले. तसेच महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना भाजपामध्ये सामील करून घ्या आणि प्रत्येक बूथवर किमान १० टक्के मते वाढवण्याचा प्रयत्न करा, असे निर्देशही दिले.

वैजापूरचे माजी नगरसेवक व छत्रपती संभाजी नगरचे भाजपा सरचिटणीस डॉ. दिनेश परदेशी यांनी शिवसेना उबाठा प्रवेश केला. उद्धव ठाकरे यांनी बुधवारी मातोश्रीवर शेकडो कामगारांसह उबाठा पक्षात दाखल झाले. उद्धव ठाकरे यांनी भाजपाच्या पदाधिकाऱ्यांना पक्षात शिवबंधन बांधून त्यांना धगधगत्या मशालीचे प्रतीक देत प्रवेश दिला. परदेशी यांचा शिवसेना उबाठात प्रवेश हा संभाजी नगरमध्ये भाजपाला मोठा धक्का मानला जात आहे. या वेळी उद्धव ठाकरे यांनी केलेल्या भाषणात अमित शाह यांच्यावर टीका केला.

उद्धव ठाकरे यावेळी बोलताना म्हणाले की, काही बाजारबुनगे लोक नागपुरात आले होते आणि आम्हाला संपवण्याच्या धमक्या देत होते. ते लोक बाजारबुनगे आहेत. त्यांना महाराष्ट्र आपल्या पायाखालचा ठेवायचा आहे, पण त्यांना माहित नाही, महाराष्ट्र हे महापुरुषांच्या वैचारीक वारशांचे राज्य आहे. त्यांना याची कल्पना नसावी अशी टीका करत महाराष्ट्रात येण्याची हिंमत दाखवा, महाराष्ट्र कोणाला संपवतो ते दाखवीन असे आव्हानही यावेळी अमित शाह आणि मोदी यांना दिले.

पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, मला खूप काही सांगायचे आहे. पण मी मुद्दाम ‘बाजारबुंगे’ (अनिष्ट माणूस) शब्द वापरला. हिंदुत्वाच्या बहाण्याने भाजपा देशात खोट्या गोष्टींचा प्रचार करत आहे. भाजपा कार्यकर्त्यांमध्ये भेसळ करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोपही यावेळी केला.

उद्धव ठाकरे पुढे बोलताना म्हणाले की, कामगारांना अशी भेसळ मान्य आहे का, असा सवाल करत पुढे म्हणाले की, भाजपाचा परतीचा प्रवास सुरू झाल्याचा दावाही यावेळी केला.

त्याशिवाय शिवसेना उबाठा खासदार संजय राऊत यांनीही अमित शाह यांच्या दौऱ्यावर निशाणा साधत म्हणाले की, अमित शाह मणिपूरला गेले नाहीत, तर सरकारी अधिकाऱ्यांवर दबाव आणण्यासाठी ते महाराष्ट्रात आले आहेत. महाराष्ट्रात भाजपा कमकुवत आहे. त्यामुळे अमित शाहना महाराष्ट्रात यावे लागले. गृहमंत्री आले की ते धरायला येत नाहीत. बैठका घेतात, परंतु निवडणूक प्रक्रियेत सहभागी असलेल्या जिल्हाधिकारी आणि अधिकाऱ्यांवर दबाव आणण्यासाठी महाराष्ट्रात येत असल्याचा आरोपही यावेळी केला.

विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वट्टीवार म्हणाले, “विदर्भ हा भाजपच्या हातातून गेला आहे. मोदी आणि शहा यांनी खूप प्रयत्न केले, तर महाराष्ट्रात एमव्हीए ४५ जागा जिंकेल. मोदी आणि शाह यांच्या भेटीमुळे महाराष्ट्रात भाजपाचाच नाश होईल अशी टीका केली.

राष्ट्रवादीचे सपाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, “महायुतीला महाराष्ट्रात लोकसभेच्या अवघ्या १७ जागा जिंकता आल्या. उद्धव ठाकरे आणि शरद पवार हेच महायुतीची खरी ताकद आहेत. त्यामुळे या दोन नेत्यांना रोखण्यासाठीच महाराष्ट्रात निवडणूक जिंका असे आदेश शाह यांनी कार्यकर्त्यांना दिले. यावरून शाह यांचा संदेश भाजपाची ताकद कमी पडत असल्याचेही यावेळी सांगितले.

Exit mobile version