Breaking News

उद्धव ठाकरे म्हणाले, बांग्लादेशाने दाखवून दिलेय, कोणी स्वतःला देव समजू नये धारावीवरून अदानीला दिला इशारा

मुंबई माजी मुख्यमंत्री आणि शिवेसना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या दिल्ली दौऱ्यावरून भाजपाने उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले असतानाच उद्धव ठाकरे यांनी पलटवार करत भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारवर बांग्लादेशाच्या सद्यपरिस्थितीवरून निशाणा साधला.

बांग्लादेशातील सत्तापालटानंतर उद्धव ठाकरे यांचा मंगळवारपासून तीन दिवसीय दिल्ली दौऱ्यावर आहेत. य दौऱ्यात उद्धव ठाकरे यांनी सोनिया गांधी, राहुल गांधी यांची भेट घेतली. तसेच या दौऱ्यात शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची भेटही झाली.

दिल्लीत पत्रकारांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे म्हणाले की, बांग्लादेशातील सत्तापालटानंतर शेख हसीना यांना बांगलादेश सोडावे लागले आणि तेथील जनतेला स्पष्ट संदेश दिला की जनता सर्वोच्च आहे आणि त्यांच्या संयमाची परीक्षा होऊ देणार नाही. बांग्लादेशात अडकलेल्या हिंदूंना वाचवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी पुढाकार घ्यावा, असे आव्हानही यावेळी एनडीए सरकार आणि भाजपाला दिले.

भारतातही अशी परिस्थिती निर्माण होत आहे का, असा सवाल उद्धव ठाकरे यांना विचारण्यात आला, त्यावेळी म्हणाले की, जनता सर्वोच्च आहे आणि नेत्यांनी त्यांच्या संयमाची परीक्षा घेऊ नये असा संदेश बांग्लादेशने दिला आहे. असे केले तर जनतेच्या न्यायालयात काय करू शकते हे बांग्लादेशात स्पष्टपणे दिसून आले.

पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, श्रीलंका आणि इस्रायलमध्ये अलीकडे असेच काही निदर्शने पाहायला मिळाले. जिथे पंतप्रधानांनाही घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. बांग्लादेशात आंदोलकांना प्राणी संबोधून त्यांचा अपमान करण्यात आला. आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना दहशतवादी घोषित करण्यात आले. बांग्लादेशातील परिस्थिती सर्वांना इशारा देते की कोणीही स्वतःला देव समजू नये. प्रत्येकजण माणूस आहे. बांग्लादेशात संघर्ष करणाऱ्या आणि अत्याचाराला सामोरे जाणाऱ्या हिंदूंना वाचवणे हे केंद्र सरकारचे कर्तव्य असल्याची आठवणही यावेळी करून दिली.

उद्धव ठाकरे पुढे बोलताना म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी जर युक्रेन युद्ध थांबवू शकत असतील तर ते बांग्लादेशातील हिंदूंना वाचवण्यासाठीही पुढाकार घेऊ शकतात. त्यांना न्याय द्या. मणिपूरमधील परिस्थिती वाईट आहे. जम्मू-काश्मीरमध्ये हिंदूंना मारले जात आहे आणि बांग्लादेशातही हिंदूंना धोका आहे. बांग्लादेशात आरक्षणाविरोधात आंदोलने झाल्याची आठवणही यावेळी करून दिली.
पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, भारतातही काही मुद्दे आहेत ज्यांची लोकसभेत चर्चा व्हायला हवी. अशी परिस्थिती इथे निर्माण होऊ नये, असे सरकारला वाटत असेल, तर सरकारला पावले उचलावी लागतील आणि संबंधित लोकांशी चर्चा करावी लागेल, खरे तर मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दाही महाराष्ट्रात आणि सत्ताधारी शिवसेनेचा चर्चेचा विषय आहे.

मुंबई कुणाला उद्ध्वस्त करू देणार नाही : उद्धव ठाकरे

धारावी विकास प्रकल्पाबाबत उद्धव ठाकरे म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे कोणालाही मुंबई उद्ध्वस्त करू देणार नाहीत. अदानी माझा शत्रू नाही, असे ठाकरे म्हणाले. पण मुंबईला कोणी उद्ध्वस्त करायला आले तर मी तेही होऊ देणार नाही. शरद पवारही हे मान्य करतील असे वाटत नाही. धारावीतील लोकांना धारावीतच घरे द्यायला हवीत, कारण तिथल्या प्रत्येक घरात छोटा व्यवसाय आहे. याचाही प्रकल्पात समावेश करावा. अदानी समूहाला धारावीतील लोकांना इतर ठिकाणी पाठवायचे आहे. तुम्हाला मुंबईत २० धारावी बांधायची असतील तर आम्ही परवानगी देणार नाही असा इशाराही यावेळी दिला.

Check Also

भाजपा सोलापूरातील एका आमदाराला घरी बसविणार वाढत्या असंतोषाच्या पार्श्वभूमीवर भाजपामध्ये खलबतं सुरु

आगामी विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी महायुतीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या भाजपाकडून पुन्हा सत्तेत येण्याच्या अनुषंगाने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *