Breaking News

उद्धव ठाकरे यांचा खोचक टोला, पंतप्रधान मोदी यांनी जरांगे पाटील यांची भेट घ्यावी दिड वर्षे काय करत होतात

मराठा आरक्षणावर आता खूप लोकांनी बोलून गोंधळ घालू नये. नेमकेपणाने तो प्रश्न कसा सुटेल त्यादिशेने विचार करण्याची गरज आङे. कोणालाही काही विचारलेय आणि कोणी काहीही बोलतेय असा त्याचा विचका करू नये नेमकेपणाने काम करून मराठा समाजाला न्याय दिला गेलाच पाहिजे. ती आमचीही मागणी आहे. आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येत आहेत. त्यांचे स्वागतच आहे, पण त्यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवावा अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली.

आज शिवसेना ठाकरे गटात चंगेजखान यांनी प्रवेश केला. त्यावेळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी उद्धव ठाकरे बोलत होते. त्यावेळी वरील मागणी केली.

पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, धनगर आहेत, आदिवासी थोडेसे अस्वस्थ झाले आहेत. ओबीसी समाज आहेत. सगळ्यांना विश्वासात घ्यावे. मराठा समाज दुसऱ्याच्या हक्काचे काही मागत नाही तो त्यांचा न्याय मागतोय. पण तो देताना दुसऱ्यांचे खेचून घेऊन त्यांना दिले जाईल असा संभ्रम निर्माण झालाय. तो मोडायचा असेल तर मात्र लोकसभेत खास अधिवेशन घेऊन जी टक्केवारी आहे ती ठेवा बाजूला आणि जे सोयीसवलतींपासून न्यायहक्कांपासून वंचित आहेत त्यांचा सर्वसमावेशक विचार केला जावा असे माझे मत असल्याचेही स्पष्ट केले.

तसेच उद्धव ठाकरे म्हणाले की, राजकारणाचा खेळखंडोबा सुरू आहे. नितीमत्ता शून्य राजकारण झालेले आहे. हे कोणालाही पटत नाही. अशी सगळी लढवय्ये माणसे हे सगळे राजकारण हे गाडून टाकण्यासाठी माझ्यासोबत शिवसेनेत येत आहेत असेही सांगितले.

मराठा आरक्षणप्रश्नी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी जरांगे पाटील यांना शपथेवर सांगितले की, आरक्षण देणारच म्हणून शपथ घेणे हा भआवनिक प्रकार झाला. पण शपथ घेऊन वेळ काढणे हा काही मार्ग नाही. जरांगे पाटील यांनी जे ४० दिवस दिल होते. त्यावेळी शपथेला जागून त्यांनी न्यायहक्क देण्याची गरज होती ती दिली नाही. समजून सांगा त्यांना. आम्हालाही बोलवू नका. जरांगे पाटलांना आणि मराठा समाजाच्या लढवय्यांना बोलवून त्यांना मार्ग दाखवा. मार्ग आहेत तर काढत का नाहीत असा सवाल करत शपथ घेण्यापेक्षा मार्ग काढून मोकळे का नाही झालात. दीड वर्षे झाले आता असा उपरोधिक टोलाही मुख्यमंत्र्यांना लगावला.

Check Also

पैठण, गंगापूर येथे जिल्हा अतिरिक्त न्यायालय हिंगोली स्वतंत्र न्यायिक जिल्हा परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांचे न्यायिक काम परभणीतून

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण व गंगापूर येथे जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायालय तसेच हिंगोली स्वतंत्र न्यायिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *