Marathi e-Batmya

विजय वडेट्टीवार यांचा आरोप, आता गौतम अदानीचा फोटोही महापुरुंषासोबत….

राज्यातील जिल्हा परिषद आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मालकीच्या शाळा आता खाजगी कंपन्यांना हस्तांतरीत करण्याचा निर्णय राज्यातील शिंदे-फडणवीस-पवार सरकारने घेतला. आधीच राज्यातील अनेक ठिकाणचे भूखंड आणि संपूर्ण मुंबई शहरातील मोक्याच्या ठिकाणचे भूखंड आधीच अदानीच्या घशात राज्यातील सरकारने धारावी पुर्नवसनच्या नावाखाली घातले असताना आता शाळाही अदानीच्या घराशात घालण्याची तयारी सुरु केली असल्याचे दिसून येत असून याची सुरुवात चंद्रपूरातील एका शाळेने करण्यात आली आहे. तसेच त्यासंबधीचा शासन निर्णयही राज्य सरकारकडून जारी करण्यात आला आहे. यावरून विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारच्या या धोरणावर टीका केली.

यासंदर्भात विजय वडेट्टीवार यांनी एक्सवर ट्विट करत राज्य सरकारला सवाल केला असून वडेट्टीवार आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, महाराष्ट्राचा ७/१२ अदानीच्या नावे लिहिणार का महायुती सरकार? असा सवाल करत महाराष्ट्राला महायुती सरकार एवढाच धोका अदानीचा देखील आहे. एअरपोर्ट, वीज, धारावी, मुंबईतील जमिनी झाल्या आता शाळांवर पण अदानींचा डोळा असल्याचा आरोप केला.

पुढे बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, महायुती सरकारने संपूर्ण महाराष्ट्राचा ७/१२ च अदानी अँड कंपनीला द्यायचा ठरवलं आहे का? असा सवाल करत शाळेच्या भिंतीवर आदराने आणि विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्यासाठी लावलेल्या राष्ट्रपिता महात्मा गांधी, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमांसोबत आता गौतम अदानी यांचा पण फोटो लावायची तयारी शिंदे, फडणवीस आणि अजित पवार सरकारकडून सुरू झाली असल्याची टीकाही यावेळी केली.

दरम्यान, राज्यातील भाजपाच्या नेतृत्वाखालील मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या सरकारने मुंबईसह कोकणातील जमिनी आणि नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी आधीच दिल्या आहेत. आता राज्यातील सरकारच्या मालकीच्या शाळाही अदानीला देवू केल्या आहेत. त्यामुळे भविष्यात मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक शासकीय यंत्रणेवर कब्जा हा गौतम अदानी यांचा राहणार असल्याची चर्चा राजकिय वर्तुळात सुरु झाली आहे.

Exit mobile version