Marathi e-Batmya

बौद्ध विवाह कायदा तयार करण्यात आता नागरीकांचाही सहभाग महत्वाचा

मुंबई : प्रतिनिधी

राज्यातील बौद्ध समाजासाठी बौद्ध मंगल परिणय (विवाह) कायद्याचा मसुदा सामाजिक न्याय विभागाच्या https://sjsa.maharashtra.gov. in व डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे, यांच्याhttp://www.barti.in या संकेतस्थळावर एक महिन्याकरिता प्रसिद्ध करण्यात आला आहे. या कायद्याच्या तरतुदींबाबत जनतेच्या काही हरकती किंवा सूचना असल्यास त्या ऑनलाईन पद्धतीने नोंदविण्याचे आवाहन सामाजिक न्याय विभागाचे अवर सचिव यांनी केले आहे.

राज्य सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील धर्मांतरीत बौध्द समाजासाठी हिंदू कोड कायद्याप्रमाणे स्वतंत्र कायदा निर्माण होणार आहे. तसेच समाजातील महिला आणि पुरूषांना समसमान हक्क प्राप्त होणार आहेत. त्यामुळे या कायद्यात कोणत्या तरतूदी असाव्यात, कोणत्या नसाव्यात यासाठी आपल्या हरकती व सूचना सरकारकडून विचारात घेतल्या जाणार आहे.

Exit mobile version