Marathi e-Batmya

१ लाख ८० हजार नागरिकांना मदत करतेय डिक्की

पुणे: प्रतिनिधी
दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स ॲण्ड इंडस्ट्रीचे (डिक्की) अध्यक्ष डॉ. मिलिंद कांबळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पुणे शहरातील ७ निवारागृहातील बेघर नागरिकांसाठी सकाळचा नाष्टा, दुपारचे भोजन आणि रात्रीच्या जेवणाची व्यवस्था गेल्या ५३ दिवसांपासून शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वसतिगृहाच्या आवारातील कम्युनिटी किचन
येथून भोर, वेल्हा आणि मावळ तालुक्यातील अति दुर्गम भागातील ९०० आदिवासी कुटुंबांना २० दिवस पुरेल इतके रेशन तर पुणे शहरातील १२९ वस्त्यांतील १५ हजार ५०९ कुटुंबांना तांदूळ, गव्हाचे पीठ, मसाला, मीठ, डाळ यांचा समावेश असलेल्या किराणा मालाचे किट या संस्थेमार्फत वितरित करण्यात आले आहे. संस्थेच्या या उपक्रमाचा आजवर एकूण १ लाख ८० हजार नागरिकांना लाभ झाला असल्याचे यावेळी कांबळे व बाहेती यांनी सांगितले.

Exit mobile version