Marathi e-Batmya

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची ५५ हजार चौरस फुटाची भव्य रांगोळी, फोटो पाहिला का?

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंती निमित्ताने काँग्रेसच्या अनुसूचित विभागाचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ हत्तीआंबीरे यांच्या वतीने परभणी शहरातील इंदिरा गांधी जिल्हा क्रीडा संकुलावर तब्बल ५५ हजार चौरस फुटाची डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भव्य रांगोळी साकारण्यात आली आहे.

जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या हस्ते अभिवादन करून ही भव्य रांगोळीची प्रतिकृती परभणीकरांना पाहण्यासाठी खुली करण्यात आली. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ५५ हजार चौरस फूट प्रतिमेसाठी तब्बल १२० क्विंटल रांगोळी लागली असुन ७ दिवस परभणीच्या १६ कलाकारांनी ही रांगोळी साकारली आहे. अतिशय सुंदर आणि भव्यदिव्य अशी प्रतिकृती पाहण्यासाठी परभणीकरांनी मोठी गर्दी केली.

५५ चौरस फुट रांगोळीत काढलेला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटोः-

Exit mobile version