Marathi e-Batmya

१३ व्या शतकातील पर्शियन कविताः इराणच्या मंत्र्याने दाखविली बंधूतूल्य शेजाऱ्यांमध्ये मध्यस्थीची तयारी

काश्मीरमधील पलगावमधील बैसरण येथे पाकिस्तानी दहशतवाद्यांनी हल्ला करून दोन परदेशी पर्यटकांसह २६ पर्यटकांचा बळी घेतला. पाकिस्तानस्थित दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारताने पाकिस्तानी नागरिकाचा व्हिसा रद्द करत सिंधू नदी पाणी वाटपासंदर्भात भारत-पाकिस्तानमध्ये असलेल्या कराराला स्थगिती दिली. त्यामुळे भारत-पाकिस्तान दरम्यान तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

भारत सरकारने केलेल्या या कारवाईच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तान सरकारनेही भारतीय विमानांना पाकिस्तानी हवाई हद्द वापरण्यास बंदी घातली आहे. तसेच अट्टारी ब़ॉर्डरही बंद केली आहे. त्याच बरोबर भारताने सिंधू नदी पाणी वाटप करारावरून संताप व्यक्त केला आहे. त्यामुळे या दोोन्ही देशा दरम्यान तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या तणावाच्या पार्श्वभूमीवर इराणचे मंत्री सय्यद अब्बास अरघची यांनी १३ व्या शतकातील एक पर्शियन कविता एक्सवर शेअर करत भारत आणि पाकिस्तान आमचे बंधूतुल्य शेजारी असल्याचे सांगत या दोन्ही देशातील तणाव कमी करण्यासाठी मध्यस्थी करण्याची तयारी दर्शविली आहे.

इराणचे मंत्री सय्यद अब्बास अरघची यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, आमचे संबध शतकानुशतके जून्या सांस्कृतिक आणि सभ्यतेच्या संबधावर आधारीत आहेत. इतर शेजराऱ्यांप्रमाणे आम्ही त्यांना सर्वोच्च प्राधान्य देतो. तसेच भारत आणि पाकिस्तान हे बंधूतुल्य शेजारी आहेत.
यावेळी सय्यद अब्बास अरघची यांनी त्यांच्या एक्सवरील प्रोफाईलवर १३ शतकातील कविता शेअर केलेल्या कवितेचा अर्थ सांगत म्हणाले की, पर्शियन कवी सादी यांनी शिकवलेल्या भावनेनुसार या कठिण काळात अधिक समजूतदार पणा निर्माण करण्यासाठी भारत आणि पाकिस्तानमध्ये चांगल्या अधिकारांचा वापर करण्यास तयार करण्यास तयार आहे.

तसेच कवितेचा भावार्थ सांगताना म्हणाले की, मानवजाती ही एकसंध घटकाची सदस्य आहे. संपूर्ण सृष्टी आत्मा आणि सार एकच आहे. जर एकाला वेदना झाली तर दुसराही अस्वस्थ होतो असा अर्थही सय्यद अब्बास अरघची यांनी सांगितला आहे.

दरम्यान, इराणच्या मंत्री सय्यद अब्बास अरघची यांच्या या प्रस्तावावर अद्याप भारत सरकार आणि पाकिस्तान सरकारकडून कोणताही अधिकृत प्रस्ताव दिलेला नाही.

Exit mobile version