Marathi e-Batmya

अयोथ्येतील राम मंदीर आणि मस्जिदीसाठी १ लाख ११ हजाराची देणगी

मुंबईः प्रतिनिधी
वादग्रस्त अयोध्या येथील बाबरी मस्जिद आणि राम जन्मभूमी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे हिंदू-मुस्लिम समाजातील तेढ नाहीशी झाली. त्यामुळे राम मंदीर उभारणीसाठी अल्पसंख्याक कल्याणकारी समितीकडून १ लाख ११ हजार १११ रूपयांची देणगी दिल्याची माहिती परवेज अली सय्यद यांनी दिली.
या निकालामुळे संपूर्ण देशातील हिंदू-मुस्लिम समाजात निर्माण झालेली कटुता कमी होणार आहे. तसेच दोन्ही धर्मियांमधील बंधुभाव वाढीस लागेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

Exit mobile version