“डाना” हे तीव्र चक्रिवादळ १२ किमी प्रतितास वेगाने उत्तर-वायव्य दिशेने सरकले आणि उत्तर किनारपट्टी ओडिशाच्या मध्यभागी, धमारा पासून १५ किमी उत्तरेस आणि हबलीखाटी निसर्ग छावणीच्या (भितरकनिका) उत्तर-वायव्येस ३० किमी अंतरावर असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने (IMD) एक्स X वर पोस्ट केले. तसेच पश्चिम बंगालमध्ये डाना या चक्रिवादळात एकाचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.
डाना चक्रिवादळामुळे खवळलेला समुद्र, वादळी वारे आणि पावसाचा धमरा आणि भद्रकला फटका बसला आहे. “आतापर्यंत सुमारे ५.८४ लाख लोकांना सुरक्षित आश्रयस्थानी हलवण्यात आले असल्याची माहिती ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांनी सांगितले.
एका अधिकृत निवेदनानुसार, ओडिशाने चक्रिवादळाच्या प्रभावाचा सामना करण्यासाठी व्यापक तयारी केली आहे. राज्याने ५२०९ चक्रीवादळ निवारे उभारले आहेत आणि अतिसंवेदनशील भागातील लोकांना बाहेर काढून सुरक्षित स्थळी हलवले आहे. ज्यात ३६५४ गर्भवती महिलांचा समावेश आहे ज्यांना जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
ओडिशासाठी हेल्पलाइन क्रमांक: बालेसोर: 06782-262286 / 261077 मयूरभंज: 06792-252759 / 252941 भद्रक: 06784-251881 जाजपूर: 06728-26728-2678 ओंझर: ०६७६६-२५५४३७ जगतसिंहपूर: ०६७२४-२२०३६८ कटक: ०६७१-२५०७८४२ धेनकनाल : ०६७६२-२२६५०७ / २२१३७६ पुरी: ०६७५२-२२३२३७ बीएमसी (बीबीएसआर) टोल फ्री क्रमांक-१९२९ आपत्कालीन प्रतिसाद समर्थन प्रणाली: ११२
पश्चिम बंगालसाठी हेल्पलाइन क्रमांक: 24X7 हेल्पलाइन: 2214 3526 पश्चिम बंगाल पोलिस: 033 22145486 / 22141988 पश्चिम मेदिनीपूर जिल्हा नियंत्रण कक्ष: 03222 267983 STROLPEALCIPALCI96969 00 कोलकाता महानगरपालिका: 91 33 2286- 1212/ 1313/ 1414
बंगालमध्ये दाना चक्रीवादळात एकाचा मृत्यू: ममता
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शुक्रवारी सांगितले की, दाना चक्रीवादळात राज्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला, जरी प्रशासनाने सखल भागातून सुमारे २.१६ लाख लोकांना बाहेर काढले.
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या परिस्थितीवर लक्ष ठेवून असून राज्य सचिवालयात आढावा बैठक घेतली, त्यांनी अधिकाऱ्यांना चक्रीवादळामुळे प्रभावित झालेल्या सर्वांपर्यंत मदत सामग्री पोहोचेल याची खात्री करण्याचे निर्देश दिले.
“या नैसर्गिक आपत्तीत फक्त एकाचा मृत्यू झाला. केबलशी संबंधित काही काम करत असताना या व्यक्तीचा त्याच्या राहत्या घरी मृत्यू झाला. ते अत्यंत दुर्दैवी आहे. शवविच्छेदन तपासणीत स्पष्ट चित्र समोर येईल. गरज पडल्यास आम्ही (राज्य सरकार) कुटुंबाला मदत करू, असेही यावेळी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सांगितले.
