संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी बुधवारी पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मधील दहशतवादी छावण्यांवर अचूक हल्ले केल्याबद्दल सशस्त्र दलांचे कौतुक केले आणि म्हटले की ही कारवाई निष्पाप लोकांना मारणाऱ्यांना लक्ष्य करून करण्यात आली.
सहा राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये सीमा रस्ते संघटनेने (बीआरओ) ५० पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना राजनाथ सिंह यांनी ऑपरेशन सिंदूर राबवणाऱ्या सशस्त्र दलांना पूर्ण पाठिंबा दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले.
राजनाथ सिंह म्हणाले की, “ही कारवाई केवळ आमची लष्करी अचूकताच नाही तर आमचा नैतिक संयम देखील दर्शवते. भगवान हनुमानाच्या शब्दात: ‘जिन मोही मारा, तीन मोही मारे’. याचा अर्थ आम्ही फक्त आमच्या निष्पापांनाच इजा करणाऱ्यांवर हल्ला केला,” असेही सांगितले.
राजनाथ सिंह म्हणाले की, कोणत्याही नागरी स्थानावर किंवा नागरी लोकसंख्येवर परिणाम होऊ नये यासाठी सशस्त्र दलांनी संवेदनशीलता दाखवली.
पुढे बोलताना राजनाथ सिंह म्हणाले की, “तुम्हा सर्वांना माहिती आहेच की, काल रात्री भारतीय सैन्याने त्यांचे शौर्य आणि धाडस दाखवून एक नवा इतिहास रचला. भारतीय सशस्त्र दलांनी अचूकता, सतर्कता आणि संवेदनशीलतेने काम केले आहे. आम्ही ठरवलेले लक्ष्य नियोजित योजनेनुसार अचूकतेने नष्ट करण्यात आले आहेत,” असेही सांगितले.
भारतीय सेनाओं ने अपने अद्भुत शौर्य और पराक्रम का परिचय देते हुए एक नया इतिहास रच दिया है… pic.twitter.com/enHzYZg50f
— Rajnath Singh (@rajnathsingh) May 7, 2025
राजनाथ सिंह पुढे बोलताना म्हणाले, “म्हणजेच, सैन्याने एक प्रकारची अचूकता, सावधगिरी आणि करुणा दाखवली आहे. ज्यासाठी मी संपूर्ण देशाच्या वतीने आमच्या सैन्याच्या सैनिकांचे आणि अधिकाऱ्यांचे अभिनंदन करत असल्याचेही यावेळी सांगितले.
राजनाथ सिंग म्हणाले की, भारताने आपल्या भूमीवरील हल्ल्याला ‘प्रत्युत्तर देण्याचा अधिकार’ वापरला आणि ही कारवाई दहशतवाद्यांचे मनोबल तोडण्यासाठी होती. आमची कारवाई अतिशय विचारपूर्वक आणि मोजमापाने करण्यात आली आहे. दहशतवाद्यांचे मनोबल तोडण्याच्या उद्देशाने. ही कारवाई फक्त त्यांच्या छावण्या आणि इतर पायाभूत सुविधांपुरती मर्यादित असल्याचेही यावेळी सांगितले.
पाकिस्तान आणि पीओकेमधील दहशतवादी पायाभूत सुविधांवर हवाई आणि तोफखान्याच्या हल्ल्यांचा संदर्भ देत राजनाथ सिंग म्हणाले की, ही कारवाई पहलगाममधील अलिकडच्या दहशतवादी हल्ल्याला भारताने विचारपूर्वक दिलेला प्रतिसाद होता.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली, आपल्या सैन्याने दहशतवादी प्रशिक्षण शिबिरे आणि त्यांच्या पायाभूत सुविधांवर जोरदार आणि योग्य प्रत्युत्तर दिले असल्याचे सांगत सशस्त्र दलांना पूर्णपणे पाठिंबा दिल्याबद्दल त्यांनी पंतप्रधान मोदींचे आभार मानले आणि देशाचे सन्मानाने रक्षण करण्यात त्यांच्या भूमिकेचे कौतुक केले.
