Marathi e-Batmya

सरकारच्या तिजोरीतील खडखडः सांस्कृतिक विभाग वरळीच्या डोममधून प्रभादेवीच्या रविंद्र नाट्य मंदिरात

राज्याची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत बॉलीवूड असल्याने आणि इथल्या तारे-तारकांच्या झगमटात मुंबईच्या चंदेरी दुनियेला एक वेगळीच झळाळी येते. आतापर्यंत या झळाळीला शोभल अशाच कार्यक्रमाचे आयोजन राज्याच्या सांस्कृतिक विभागाकडून आतापर्यंत करण्यात आले. मात्र यंदाच्या वर्षी सांस्कृतिक विभागाने ६२ व्या मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्याचे आयोजन दरवर्षी वरळी येथील डोम या स्टेडियम सदृष्य ठिकाणी ७ ते ८ हजार रसिकांच्या क्षमतेच्या ठिकाणी आयोजित कऱण्यात येते. मात्र यंदाच्या राज्याच्या तिजोरीतील वाढत्या खडखडाच्या पार्श्वभूमीवर हाच कार्यक्रम पहिल्यांदाच एक हजार ते दिड क्षमतेच्या रसिक क्षमतेच्या प्रभादेवी येथील रविंद्र नाट्य मंदिरात आयोजित करण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे.

मुंबईत मराठी चित्रपट सृष्टीसह हिंदी चित्रपटसृष्टी त्याशी निगडीत इतर व्यवसाय मोठ्या प्रमाणावर आहेत. याच चित्रपटसृष्टीच्या पार्श्वभूमीवर मुंबईचे एक आगळे वेगळे ग्लॅमर्स आहे. त्यामुळे मध्यंतरीच्या काळात शिवसेना उबाठाचे प्रमुख तथा उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील सरकारच्या कार्यकाळात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मुंबईच्या बॉलीवूडला भगव्या उत्तर प्रदेशचे आकर्षण दाखवले, हिंदी आणि भोजपरी चित्रपटाच्या अनुशंगाने चित्रपट निर्मितीचे केंद्रे निर्माण करणा असल्याची ग्वाहीही दिली. त्यावर बॉलीवूडमधील काही हिंदी चित्रपट अभिनेते आणि अभिनेत्री यांनी थोडासा कल दाखवला. परंतु बॉलीवूड उत्तर प्रदेशात हलविण्याच्या मागणीकडे दुर्लक्ष केले.

भाजपाचे मुंबईचे नेते तथा सांस्कृतिक क्षेत्रात खास रस घेऊन काम करणारे आशिष शेलार यांच्याकडे सांस्कृतिक विभागाचे पदभार सोपविल्यापासून मराठी चित्रपटसृष्टी किंवा हिंदी चित्रपटसृष्टीशी निगडीत कोणताही सोहळा हा राज्य सरकारकडून भव्य आणि दिव्य स्वरूपात करण्यात येतो.

यंदाच्या ६२ वा महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्यात पंडित हृदयनाथ मंगेशकर यांना व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्काराने सन्माने करण्यात येणार आहे. प्रसाद ओक यांना व्ही शांताराम विशेष योगदान पुरस्कार देण्याचे आयोजित करण्यात आले. याशिवाय प्रख्यात आणि प्रसिद्ध कथाकार सलिम-जावेद जोडीतील सलिम यांचना राज कपुर जीवन गौरव पुरस्कार तर प्रसिद्ध अभिनेत्री राणी मुखर्जी यांना राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. यापूर्वीचे अशेच कार्यक्रम वांद्रे येथील म्हाडाच्या मोकळ्या मैदानावर आयोजित करण्यात येत होता. तर मागील तीन वर्षापासून हाच कार्यक्रम वरळीच्या डोममध्ये आयोजित करण्यात येत असे.

मात्र यंदाच्यावर्षी राज्याच्या तिजोरीत महसूली रकमेचा तुडवडा असल्याने हा कार्यक्रम चंदेरी पद्धतीचा भव्य आणि दिव्य अशा स्वरुपाता होणार नाही. तो अत्यंत साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला.

यासंदर्भात सांस्कृतिक मंत्रालयाचे मंत्री आशिष शेलार यांच्या कार्यालयाशी संपर्क साधला असता म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या सूचनेनुसार आणि कॉस्ट कस्टींगनुसार वरळीच्या डोममध्ये सदरचा कार्यक्रम आयोजित करून भव्य दिव्य स्वरूप देण्याऐवजी तो अंत्यत शांतातामय आणि कमी प्रेक्षकांच्या उपस्थित मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा आयोजित करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले. याशिवाय सरकारच्या अर्थसंकल्पातही आर्थिक तरतूद केली नसल्याने हा कार्यंक्रम कमी प्रेक्षकगृहात हा कार्यक्रम उरकण्यात येणार असल्याचे सांगितले.

Exit mobile version