उज्ज्वल निकमसह चार जणांची राज्यसभेवर निवड, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन पंतप्रधान मोदी यांच्याकडून एक्सवर पोस्ट करत केले अभिनंदन

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी रविवारी (१३ जुलै, २०२५) माजी परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला, २६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्यातील विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम, केरळ भाजपा नेते सी. सदानंदन मास्टर आणि दिल्लीस्थित इतिहासकार मीनाक्षी जैन यांना राज्यसभेवर नामानिर्देशित केले.

केंद्रीय गृह मंत्रालयाने नामांकनाची अधिसूचना जारी केली. “भारतीय संविधानाच्या कलम ८० च्या कलम (१) च्या उप-कलम (अ) द्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून, त्या कलम (३) सह वाचले जाते, राष्ट्रपती नामनिर्देशित सदस्य म्हणून राज्यसभेत नियुक्त करण्यात आले आहे. यापूर्वी नियुक्त करण्यात आलेले सदस्य निवृत्त झाल्याने त्यांच्या रिक्त जागेवर या चार जणांची नियुक्ती करण्यात आली आहे. उज्ज्वल देवराव निकम, सदानंदन मास्टर, हर्षवर्धन श्रृंगला आणि डॉ. मीनाक्षी जैन, यांची नियुक्ती करण्यात आल्याचे अधिसूचनेत म्हटले आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच झालेल्या लोकसभा निवडणूकीत भाजपाच्या तिकिटावर मुंबईतून निवडणूक लढविलेले उज्ज्वल देवराव निकम यांची नियुक्ती राज्यसभेवर करण्यात आली आहे. याशिवाय सदानंद मास्टर, हर्षवर्धन श्रृंगला आणि डॉ मिनाक्षी जैन यांची

नियुक्ती राज्यसभेवर करण्यात आल्याबद्दल एक्सवर पोस्ट करत या चारही जणांचे अभिनंदन केले.

About Editor

Check Also

लाल किल्ला परिसरात मोठा स्फोट; किमान ८ जणांचा मृत्यू दिल्ली, मुंबई आणि कोलकाता परिसरात हाय अलर्ट

सोमवारी (१० नोव्हेंबर २०२५) संध्याकाळी लाल किल्ल्याजवळ उभ्या असलेल्या एका कारमध्ये झालेल्या उच्च-तीव्रतेच्या स्फोटात किमान …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *