ज्येष्ठ अवकाश शास्त्रज्ञ तथा पद्मभूषण ई.व्ही. तथा एकनाथ वसंत चिटणीस यांचे आज सकाळी वयाच्या १०० व्या वर्षी निधन झाले. भारतीय अवकाश संशोधन संस्था अर्थात इस्त्रोच्या जडघडणीत त्यांचे महत्वपूर्ण योगदान होते. २५ जुलै २०२५ व्या वर्षी त्यांनी वयाची १०० वर्षे पूर्ण केली होती. ई.व्ही.चिटणीस यांचा जन्म कोल्हापूर येथे झाला होता. तर त्यांचे शिक्षण पुणे येथे झाले. त्याचे शिक्षण भौतिकशास्त्र आणि रसायन शास्त्र या विषयात पदवी संपादन केली. त्यांनी रेडिओ संपर्कशास्त्र विषयात पदविका अभ्यासक्रम पूर्ण केला.
ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ विक्रम साराभाई यांच्या सूचनेनुसार अमेरिकेतील मॅसॅच्युसेट्स तंत्रज्ञान संस्था अर्थात एमआयटी सोडून अवकाश संशोधन व क्ष किरण संशोधन करण्यासाठी ते भारतात परतले. १९६० ते ७० च्या दशकात त्यांनी क्ष किरण व अवकाश संशोधन विषयांवर संशोधन केले. भारताच्या अंतराळ संशोधन कार्यक्रमात त्यांनी विक्रम साराभाई यांच्यासोबत १९६१ सालापासून काम केले. अवकाश उपयोजन केंद्राचे संचालक म्हणून ही त्यांनी जबाबदारी पार पाडली. उपग्रह प्रक्षेपणासाठी थुम्बा हे स्थळ त्यांनी शोधले होते. तसेच ते इन्कोपार चे सदस्य सचिव म्हणून काम पाहिले पुढे याचेच नामांतर इस्त्रो असे झाले.
डॉ ई.व्ही. चिटणीस यांचा भारताच्या अवकाश क्षेत्रातील इन्सॅट मालिकेतील उपग्रहांच्या आखणीत महत्वाचा सहभाग होता. त्यांनी अवकाश तंत्रज्ञानाचा शैक्षणिक आणि अन्य क्षेत्रात वापर करण्यासाठी भरपूर काम केले. १९७० च्या दशकात शेती, हवामान, आरोग्य, शिक्षण दूरसंपर्क, मनोरंजन अशा क्षेत्रात अवकाश संशोधन तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यासाठी नासाच्या सहकार्याने साइट प्रकल्प डॉ यशपाल यांच्यासह महत्वाचा प्रकल्प राबविण्यात महत्वाचा सहभाग होता. त्यानंतर टीव्ही हा घरोघरी पोहोचला. या सह अनेक कामात त्यांच्या योगदानाची दखल घेऊन केंद्र सरकारने त्यांचा पद्मभूषण पुरस्कार देऊन सन्मान केला.
त्याबरोबर पुणे विद्यापीठाच्या मास कम्युनिकेशन स्टडीज विभागाची स्थापना करण्यात त्यांचा मोठा पुढाकार होता. तसेच इस्त्रोतील निवृत्तीनंतर त्यांनी या विद्यापाठातील विभाग स्थापन केल्यानंतर अनेक वर्षे या विभागात गेस्ट लेक्चरर म्हणून कामही केले. तसेच भारतातील प्रमुख घटना त्याचा परिणाम आदी त्यांचे आवडते विषय होते. तसेच या विभागाचा अभ्यासक्रम प्रामुख्याने ठरविण्यातही त्यांचा मोठी भूमिकाही होती. तसेच शिक्षण व्हावे यासाठी त्यांचा आग्रह ही होता.
