Marathi e-Batmya

जळगांव परधाडे येथे रेल्वे दुर्घटनाः घाबरून एका रेल्वेतून उतरले अन् दुसऱ्या चिरडले

मुंबईकडे येणाऱ्या पुष्पक रेल्वे एक्सप्रेसमध्ये आग लागल्याच्या अफवेमुळे जळगांव रेल्वे स्टेशन सोडल्यानंतर काही वेळातच परधाडे रेल्वे स्थानकाच्या जवळ रेल्वे थांबवित रेल्वेतून खाली उतरले अन् त्याच रेल्वे ट्रॅकच्या समांतर असलेल्या दुसऱ्या ट्रॅकवर पोहोचले. मात्र त्यावेळी त्याच दुसऱ्या ट्रॅकवरून बंगरूळकडे निघालेल्या भरधाव वेगातील बंगळूरु एक्सप्रेस तेथून जात होती. त्यावेळी या पुष्पक एक्सप्रेसच्या प्रवाशांना चिरडल्याची दुर्घटना संध्याकाळच्या सुमारात घडली. या अपघात मोठ्या प्रमाणावर रेल्वे प्रवाशी जखमी झाल्याचे आणि मृत्यूमुखी पडल्याचे वृत्त आहे. दरम्यान मध्य रेल्वे विभागाकडून अद्याप अधिकृत माहिती जाहिर केली नाही. परंतु मदत कार्य तातडीने सुरु केल्याचे सांगण्यात येत आहे.

जळगांव रेल्वे स्थानक सोडल्यानंतर काही अंतर पुढे पुष्पक एक्सप्रेसने अंतर कापले नाही तोच पुष्पक एक्सप्रेसला आग लागली म्हणून एकच गोंधळ रेल्वेतील प्रवाशांमध्ये उडाला. त्यावेळी पुष्पक एक्सप्रेस मध्येच थांबविण्यात आली. रेल्वे गाडी थांबल्याने रेल्वेतील प्रवाशांनी खाली उतरण्याची एकच घाई केली. त्यावेळी पुष्पक रेल्वे ज्या रूळावरून जात होती. त्याच्या समांतर आणखी एका रेल्वे रूळ आहे. सुरक्षेच्या उद्देशाने पुष्पक रेल्वे एक्सप्रेसमधील अनेक प्रवाशी हे त्या दुसऱ्या समांतर रेल्वे ट्रॅकवर पोहोचले. मात्र त्याचवेळी त्या ट्रॅकवरून कर्नाटक एक्सप्रेस बंगरूळूच्या दिशेने जाणाऱ्या गाडी येत असल्याचा अंदाज काही प्रवाशांना आली नाही. त्यामुळे त्या एक्सप्रेस गाडीने दुसऱ्या ट्रॅकवर आलेल्या प्रवाशांना चिरडून कर्नाटक एक्सप्रेस पुढे निघून गेली.

या दुर्घटनेत ८ ते १० प्रवाशी कर्नाटक एक्सप्रेसच्या खाली चिरडून मेल्याचा अंदाज आहे. तर ३० ते ४० प्रवाशी गंभीररित्या जखमी झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. दुर्घटना घडल्यानंतर अर्ध्या पाऊण तासानंतर मध्य रेल्वेच्या जनसंपर्क विभागाने जखमी प्रवाशांना तात्काळ वैद्यकीय सुविधा मिळाव्यात यासाठी तीन ग्रामीण रूग्णालयाशी संपर्क साधून सेवा अॅक्टीवेट केली आहे. तसेच १०८ रूग्णवाहिकानांही घटनास्थळी पोहोचण्याचे आदेश दिल्याचे सांगण्यात येत आहे.

तसेच घटनास्थळी अत्यावश्यक मदत पोहोचविण्यात येत आहे. तसेच रेल्वे पथकही पोहोचत आहे असेही यावेळी सांगितले.

Exit mobile version