Breaking News

महाराष्ट्र, गोव्यासाठी २०,००० मेट्रिक टन तांदूळ साठा उपलब्ध भारतीय अन्न महामंडळाच्या खुल्या बाजार विक्री योजनेअंतर्गत तांदूळ विक्रीसाठी उपलब्ध

देशात ०७ ऑगस्ट रोजी होणाऱ्या आगामी लिलावासाठी गोवा राज्यासह संपूर्ण महाराष्ट्र प्रदेशात एकूण २०,००० मेट्रिक टन तांदळाचा साठा उपलब्ध करण्यात येत आहे. या लिलावात व्यापारी/ घाऊक खरेदीदार/ तांदूळ उत्पादक सहभागी होऊ शकतात.

तांदूळासाठी प्रत्येक बोलीदाराची किमान बोली १० मेट्रिक टन असेल आणि त्याला कमाल बोली १००० मेट्रिक टन पेक्षा जास्त लावता येणार नाही. ओएमएसएस (डी ) योजना चढ्या किंमती आटोक्यात ठेवण्यास मदत करेल आणि सर्वसामान्यांना मोठा दिलासा देईल.

भारतीय अन्न महामंडळाच्या महाराष्ट्र प्रादेशिक कार्यालयाने ऑगस्ट २०२४ च्या पहिल्या आठवड्यापासून खुल्या बाजार विक्री योजना- देशांतर्गत (ओएमएसएस-डी) द्वारे तांदूळ विक्रीसाठी उपलब्ध करण्यास सुरुवात केली आहे.

तांदूळ साठा खरेदी करण्यास इच्छुक असलेले खरेदीदार एफसीआय च्या ई-लिलाव सेवा प्रदात्याच्या “m-Junction Services Limited” https://www.valuejunction.in/fci/ वर नोंदणी करून साठ्यासाठी बोली लावू शकतात. नोंदणी इच्छुक खरेदीदारांची नोंदणी प्रक्रिया ७२ तासांच्या आत पूर्ण केली जाईल.

Check Also

सर्वोच्च न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांना जामीन नाकारला सीबीआयला बजावली न्यायालयाची नोटीस

कथित दिल्ली अबकारी धोरण घोटाळ्याच्या संबंधात केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI) ने नोंदवलेल्या भ्रष्टाचार प्रकरणात दिल्लीचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *