Breaking News

ऑलिंम्पिकमध्ये मनू भाकेरच्या निमित्ताने भारताला पहिले पदक १० मीटरच्या एअर पिस्तूलमध्ये कांस्यपदक पटकाविले

भारताच्या मनू भाकेरने महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत कांस्यपदक जिंकले आणि पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये देशासाठी पहिले पदक मिळवून दिले. विशेष म्हणजे ऑलिंम्पिक स्पर्धेचे उद्घाटन कालच झाले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी लगेच भारताला एअर पिस्तुल स्पर्धेत कांस्यपदक मिळाले.

१० मीटर एअर पिस्तूलमध्ये कांस्य पदक मिळवून, भाकेर ऑलिम्पिक पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला नेमबाज ठरली आहे.

२७ जुलै रोजी मनू भाकेरने ५८० गुणांसह तिच्या स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरले होते, ४५ स्पर्धकांपैकी तिसरे स्थान मिळवले होते आणि रविवारी झालेल्या अंतिम फेरीत पहिल्या आठ स्पर्धकांनी प्रवेश केला होता. २०२४ च्या ऑलिम्पिकमध्ये अशी कामगिरी करणारी २२ वर्षीय पहिली भारतीय महिला ठरली.

भारतासाठी नेमबाजीतील हे पाचवे पदक आहे. यापूर्वी राज्यवर्धन सिंग राठोड (अथेन्स ऑलिम्पिक, २००४ मध्ये रौप्य), अभिनव बिंद्रा (सुवर्ण, बीजिंग २००८), गगन नारंग (कांस्य, लंडन २०१२) आणि विजय कुमार (रौप्य, लंडन) यांनी नेमबाजीत देशाचे नाव लौकिक मिळवून दिला होता.
पॅरिस ऑलिम्पिक २०२४ पूर्वी ती उत्कृष्ट फॉर्ममध्ये होती.

हरियाणातील झज्जर येथील २२ वर्षीय मनू भाकेर २२१.७ गुणांसह कांस्यपदक मिळविण्यासाठी संघर्ष केला. कोरियाच्या किम येजीने एकूण २४१.३ गुणांसह रौप्यपदक जिंकले तर तिचा देशबांधव जिन ये ओहने २४३.२ गुणांसह सुवर्णपदक पटकावले.

भाकेर मागील स्पर्धेत फारशी कामगिरी करू शकली नव्हती. त्यामुळे तिला रिकाम्या हाताने परतावे लागले होते. मात्र आता दुसऱ्या ऑलिम्पिकमध्ये भाग घेत कांस्य पदक मिळवले.

निकाल घोषीत झाल्यानंतर मनू भाकेर म्हणाली की, टोकियो नंतर मी खूप निराश झाले आणि त्यावर मात करायला मला खूप वेळ लागला. खरे सांगायचे तर, आज मला किती बरे वाटत आहे हे मी समजावून सांगू शकत नाही. टोकियो ऑलिंम्पिक मध्ये त्याच स्पर्धेच्या पात्रतेदरम्यान तिच्या पिस्तूलमध्ये बिघाड झाल्यानंतर डोळ्यातून अश्रू वाहिले होते. आज तिच्या चेहऱ्यावर हास्य होते.

पुढे मनू भाकेर पुढे म्हणाली की, माझ्याजवळ असलेल्या सर्व शक्तीने मी लढत होते. मी कांस्य जिंकू शकले याबद्दल खरोखरच कृतज्ञ आहे. मी भगवत गीता वाचली आणि नेहमी मला जे करायचे आहे ते करण्याचा प्रयत्न केला, बाकी सर्व काही देवावर सोडले आम्ही नशिबाशी लढू शकत नाही, अशा भावनाही यावेळी व्यक्त केल्या.

Check Also

पंबन पुलावरील वजनाची चाचणी यशस्वी समुद्रातून स्टेशनपर्यंत जाणारे अतिदुर्गम पूल

रेल्वेचे समुद्री मार्गे शेवटचे स्टेशन असलेले पंबनला जोडणाऱ्या नवीन पांबन पुलावरील लोड डिफ्लेक्शन चाचणी यशस्वीरित्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *