Marathi e-Batmya

राज्यातील बार-रेस्टॉरंटची वेळ ठरली, या कालावधीत सुरु राहणार

मुंबई : प्रतिनिधी

राज्यात missionbeginagain अंतर्गत अनलॉक-५ जाहीर करत असताना बार-रेस्टॉरंट सुरु करण्यासही राज्य सरकारने परवानगी दिली. मात्र या गोष्टी उघडण्याची-बंद करण्याच्या वेळा ठरविण्याचे अधिकार स्थानिक प्रशासनाला दिले. त्यामुळे सर्व जिल्ह्यात वेगवेगळ्या वेळा जाहीर करण्यात आल्याने बार-रेस्टॉरंट चालकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येवू लागली. अखेर यावर तोडगा काढत या व्यवस्थापनासाठी सकाळी ८ वाजल्यापासून ते रात्री १० वाजे पर्यत सुरु ठेवण्यास परवानगी दिली.

बार-रेस्टॉरंट सुरु केल्यानंतर प्रत्येक ठिकाणी प्रशासनाकडून वेगवेगळ्या वेळा जाहीर करण्यात येवू लागले. त्यामुळे बार-रेस्टॉरंट चालकांमध्ये गोंधळाचे आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले. त्यातच उत्पादन शुल्क विभागाकड़ूनही वेगवेगळी वेळापत्रक जारी करण्यात येवू लागले. अखेर यासर्वांवर मार्ग काढण्यासाठी पर्यावरण विभागाने पुढाकार घेत यासंबधीचे वेळापत्रकच जाहीर केले.

Exit mobile version