Breaking News

विशेष बातमी

नाशिक, नंदूरबारसह १३ जिल्ह्यातील जि.प.च्या शाळा होणार ‘आंतरराष्ट्रीय शाळा’ सिंगापूर, हाँगकाँग, जपान मधील शिक्षण पध्दतीवर शिक्षण देणार

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील विद्यार्थ्यांना एकविसाव्या शतकातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे उत्तम शिक्षण देण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या, आदिवासी विकास विभाग व सामाजिक न्याय विभाग, शालेय शिक्षण विभाग यांच्या शाळांमधून आंतरराष्ट्रीय शैक्षणिक दर्जाच्या शाळा निर्माण करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर शिक्षणात अग्रेसर असणाऱ्या सिंगापूर, हाँगकाँग, जपान या देशातील शिक्षण पद्धतींचा अभ्यास करून …

Read More »

प्लास्टिक उत्पादक आणि वितरकांवर महानगरपालिका आणि नगरपालिकांनो कारवाई करा स्थानिक स्वराज्य संस्थांना पर्यावरण विभागाचे आदेश

मुंबई : प्रतिनिधी पर्यावरणाच्या संरक्षणाच्यादृष्टीने राज्याला प्लास्टीक मुक्त करण्यासाठी राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायायालयानेही स्विकारला आहे. त्यामुळे महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदांनी प्लास्टीक उत्पादक आणि वितरकांवर कारवाई करावी असे आदेश पर्यावरण विभागाने राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना दिल्याची माहिती पर्यावरण विभागातील विश्वसनीय सूत्रांनी दिली. प्लास्टिक बंदी विरोधात न्यायालयात गेलेल्या …

Read More »

राज्यातील विविध विभागाकडून फेब्रुवारी-मार्च महिन्यातच सर्वाधिक खर्च एप्रिल अखेर ८९ टक्के खर्च

मुंबई : प्रतिनिधी राज्याला गतीमान सरकार देण्याचा नारा देत सत्तेवर आलेल्या भाजपनेही विविध विकास कामांवर वर्ष अखेरीसच खर्च करण्याची परंपरा कायम ठेवली आहे. सरकारच्या अखत्यारीत असलेल्या बहुतांष विभागांकडून फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल महिन्यातच विकास कामांवर खर्च केल्याचे दिसून येत असून या शेवटच्या तीन महिन्यात जवळपास अर्थसंकल्पिय तरतूदीच्या ४५ टक्के रक्कम …

Read More »

उध्दव ठाकरेच्यां आश्वासनामुळे शेतकऱ्याने आत्महत्येचा विचार बदलला उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकरी मारूती कुदळेंनी केले स्वत:ला परावृत्त

मुंबई : प्रतिनिधी देशात आणि महाराष्ट्रात शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही म्हणून काही शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने पत्र लिहीत आत्महत्या केल्याच्या घटना काही दिवसांपूर्वी उघडकीस आल्या. मात्र शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या आश्वासनानंतर आत्मदहनाच्या विचारापासून शेतकरी पारावृत्त झाल्याची चांगली घटना नुकतीच उघडकीस आली. मागील ८ ते …

Read More »

खासगी बस, ट्रॅव्हल्सवाल्यांनी जास्त पैसे घेतल्यास प्रवाशांनो तक्रार करा परिवहन विभागाचे प्रवाशांना आवाहन

मुंबई : प्रतिनिधी राज्य शासनाने दि. २७ एप्रिल रोजीच्या शासन निर्णयाद्वारे कंत्राटी वाहनांचे (खासगी बस, ट्रॅव्हल्स इ.) महत्तम भाडेदर निश्चित केले आहेत. हा शासन निर्णय त्वरीत प्रभावाने अमलात आला आहे. कंत्राटी बस परवाने धारकांकडून जर विहीत दरापेक्षा अधिक दराने आकारणी करण्यात येत असेल तर त्या विषयी मोटार वाहन विभागाच्या 022 …

Read More »

सुवर्णपदक विजेता पै. राहूलला मुंडे प्रतिष्ठानची एक लाख एक्कावन्न हजाराची मदत पालकमंत्री ना पंकजाताई मुंडेंनी पालकत्व स्विकारत केले खास अभिनंदन

मुंबई : प्रतिनिधी राष्ट्रकुल स्पर्धेत सुर्णपदक पटकावणारा बीडचा भूमीपुत्र राहूल आवारे याला पुढील प्रशिक्षणासाठी गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने एक लाख एक्कावन्न हजाराची मदत आज देण्यात आली. राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी राहूलचे पालकत्व स्विकारत त्याचे खास अभिनंदन केले व आगामी ऑलिम्पिक स्पर्धेसाठी त्याला शुभेच्छा दिल्या. …

Read More »

जिल्हा परिषदेच्या १ लाख शिक्षकांच्या बदल्या त्यांच्या घराजवळ होणार अॉनलाईन बदली प्रक्रियेत २० पर्याय देण्याची मंत्री पंकजा मुंडे यांची घोषणा

मुंबई : प्रतिनिधी राज्य शासनाच्या २७ फेब्रुवारी २०१७ च्या शासन निर्णयानुसार जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदली धोरणाला उच्च न्यायालयाने दुजोरा दिला असून आता शिक्षकांच्या बदल्यांचा जिल्हातंर्गत आणि आंतरजिल्हा पध्दतीने करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे घरापासून लांब राहून ज्ञानदानाचे काम करणाऱ्या शिक्षकांना आता घरात किंवा घराजवळ राहून शिक्षकाची नोकरी करणे शक्य होणार …

Read More »

उद्दीष्ट एकच, २०१९ ला भाजप आणि मित्र पक्षाला सत्तेवरून घालविणे साहित्यिक, विचारवंत, सामाजिक कार्यकर्त्यांच्या मित्र लोकशाहीचे फोरमची घोषणा

मुंबई : प्रतिनिधी मित्र लोकशाहीचे (Friends of Democracy) हा फोरम कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नाही.  तरीही त्याचे प्रमुख उद्दिष्ट मात्र राजकीय आहे. म्हणजेच आज केंद्रात सत्तेत असणाऱ्या मनुवादी व लोकशाही विरोधी भाजपा व त्याच्या मित्र पक्षास २०१९ मधील निवडणुकीमध्ये सत्तेतून पायउतार करणे, हेच ह्या फोरमचे  प्रमुख उद्दिष्ट असणार आहे. त्यासाठी …

Read More »

निर्वासितांना दिलेल्या जमिनी त्यांच्या मालकीच्या होणार राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

मुंबई : प्रतिनिधी देशाच्या फाळणीनंतर पाकिस्तानातून भारतात आलेल्या निर्वासित नागरिकांना राज्यात देण्यात आलेल्या जमिनी व मालमत्ता  हस्तांतरण व वापर यावरील निर्बंधातून मुक्त करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने आज घेतला. अशा निर्वासित नागरिकांना देण्यात आलेल्या भूखंडांच्या नोंदणीवर अ-१ सत्ता प्रकार अथवा भोगवटादार वर्ग-१ अशी नोंद करण्यात येणार आहे. त्यामुळे या जमिनींचे मालक हे …

Read More »

विदर्भ, मराठवाडा, उर्वरित महाराष्ट्र विकास मंडळांना आवश्यक मनुष्यबळ द्या विकास मंडळांच्या आढावा बैठकीत राज्यपालांच्या मुख्यमंत्र्यांना सूचना

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील विकास मंडळांनी अधिक सक्षमपणे काम करण्याची गरज असून या मंडळांना आवश्यक ते मनुष्यबळ उपलब्ध करुन द्यावे अशा सूचना राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देत यासाठी नियोजन विभागाने कालबद्ध कार्यक्रम हाती घेण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. राज्यातील विदर्भ विकास मंडळ, मराठवाडा विकास मंडळ, उर्वरित …

Read More »