Breaking News

विशेष बातमी

मंत्रालयाच्या दारात आणखी एकाचा आत्महत्येचा प्रयत्न ग्रामस्थांने अंगावर रॉकेल ओतून घेतले

मुंबई : प्रतिनिधी अन्यायाच्या विरोधात किंवा स्वत:चा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मंत्रालयात येवून आत्महत्येचा प्रयत्न करण्याचे सत्र काही थांबायचे नाव घेत नाही. मागील महिनाभरात हे सत्र थांबले असे वाटत असतानाच  लासलगावच्या गुलाब शिंगारी यांनी मुख्य प्रवेशद्वाराजवळ अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा  प्रयत्न केला. मात्र  पोलिसांनी प्रसंगाचे गंभीर्य ओळखून शिंगारी यांना ताब्यात घेतले. …

Read More »

हमारी युती बनी रहेगी शिवसेना मुख्य प्रतोदांचे भाजपच्या मुख्य प्रतोदांना आश्वासन

मुंबई : प्रतिनिधी विधानसभेत आज विभागीय अनुदानाच्या मागणीवर चर्चा करताना भाजपचे मुख्य प्रतोद राज पुरोहीत यांनी मुंबईला अधिक निधी देण्याची मागणी केली. त्यानंतर शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनिल प्रभू यांनीही आपल्या भाषणात मुंबईच्या विविध प्रश्नांना स्पर्श केला. यावेळी सुनिल प्रभू यांनी राज पुरोहीत यांच्याकडे पहात कल हो ना हो हमारी युती …

Read More »

गुढी पाडव्यापासून प्लास्टीक, थर्माकॉलच्या वस्तूंवर बंदी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांची घोषणा

मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्रात संपूर्ण प्लास्टिक व थर्माकोलच्या वस्तुंवर रविवारी गुढी पाडव्याच्या दिवसापासून बंदी घालण्यात येत असल्याची घोषणा पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी आज विधानसभेत केली. तसेच प्लास्टीक आणि थर्माकॉल पासून ताट, कँप्स, प्लेट्स, ग्लास, काटे, वाटी, चमचे, स्ट्रॉ, कटलरी, नॉन वोवन पॉलिप्रॉपीलेन बँग्ज, स्प्रेड शीट्स, प्लास्टीक पाऊच, पँकेजींग यासह …

Read More »

अपक्ष आमदारांची अवस्था ना धड बाईसारखी ना गड्या सारखी अहमदपूरचे अपक्ष आमदार विनायकराव पाटील यांनी मांडली खंत

मुंबई : प्रतिनिधी विधानसभेत सर्व अर्थसंकल्प असेल, अर्थसंकल्पित पुरवणी मागण्या असतील आणि इतर विषय असतील. त्यावर बोलायला अध्यक्ष महोदय तुम्ही सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या सदस्यांना वेळ वाटून देता. मात्र आम्हा अपक्ष आमदारांची अवस्था ना धड बाई ना धड गड्याची राहीली अशी खंत व्यक्त करत सभागृहात बोलण्यासाठी आम्हालाही वेळ द्या अशी …

Read More »

भिसे आणि बोंद्रे यांचा मंत्री लोणीकर आणि मंत्री तावडेंच्या उत्तरावर संताप ४५ दिवस आधी प्रश्न देवूनही उत्तरे चुकीचे देत असल्याचा आरोप

मुंबई : प्रतिनिधी मंत्री महोदय ज्या गावात योजना सुरु असल्याचे सांगत आहेत. त्या गावातील नदीच्यावरील विहीरीत पाणीच नाही. पाणी नसताना तेथे पाणी पुरवठ्याची योजना कशी सुरु असेल असा सवाल आमदार त्र्यंबकराव भिसे यांनी उपस्थित केली. तसेच मंत्री महोदय चुकीचे उत्तर देत असून चुकीची उत्तरे देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली. …

Read More »

एक बोटे आत एक भिडे बाहेर मिलिंद एकबोटेला पुणे ग्रामीण पोलिसांकडून अखेर अटक

पुणे : प्रतिनिधी भीमा- कोरेगाव येथे झालेल्या हिंसाचाराप्रकरणी अँट्रोसिटी गुन्हा दाखल करण्यात येवूनही या घटनेचे मास्टरमाईंड असलेल्या मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडेंना अटक करण्यास राज्य सरकारकडून टाळाटाळ केली जात होती. अखेर जनक्षोभ आणि विरोधकांच्या रेट्यामुळे दोघांपैकी  मिलिंद एकबोटे यांना पुणे ग्रामीण पोलिसांनी अखेर अटक केली. तर संभाजी भिडेवर अद्याप कोणतीही …

Read More »

ज्येष्ठ रंगकर्मींच्या मार्गदर्शनाने ‘बालरंगभूमी अभियान’ चळवळीची सुरुवात बालनाट्याच्या प्रयोगांना महाराष्ट्र शासनाचे अनुदान मिळविण्यासाठी प्रयत्न करणार

मुंबई : प्रतिनिधी बालरंगभूमीचा विकास घडवून नाट्यरसिकांना बालनाट्याचा आनंद देतानाच बालवयातच कलाकार-तंत्रज्ञांची पिढी घडविण्याच्या उद्देशाने आज मुंबईमध्ये ‘बालरंगभूमी अभियान’ संघटनेची सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी वर्षाताई विनोद तावडे तसेच ज्येष्ठ रंगकर्मी विजय केंकरे, बालरंगभूमी अभियानाच्या अध्यक्षा कांचनताई सोनटक्के आणि नाट्यक्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. आही उद्दिष्टे डोळ्यांसमोर ठेवून या बालरंगभूमी अभियानाची सुरुवात करण्यात आली …

Read More »

सरकारशी चर्चा सकाळीच… मुंबईकरांना त्रास होवू नये म्हणून मोर्चा रात्रीतच आझाद मैदानावर पोहोचणार

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील शेतकरी, आदीवासी यासह सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नावर किसान सभेने जरी मोर्चा काढलेला आहे. या मोर्चाचा त्रास मुंबईच्या चाकरमान्यांना होवू नये यासाठी रात्री १२ नंतर सोमय्या मैदानावरून आझाद मैदानाकडे निघणार असून रात्रीत सरकारशी कोणत्याही प्रकारची चर्चा करणार नसल्याचे  मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कॉम्रेड डॉ.अशोक ढवळे यांनी सांगितले. शेतकऱ्यांना विना …

Read More »

आणि शिवसेनेचे आदरातिथ्य मोर्चेकऱ्यांनी नाकारले पाणी स्विकारू पण इतर खाण्या-पिण्याच्या गोष्टी नाही

मुंबई : प्रतिनिधी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह इतर प्रश्नांवर किसान सभेने नाशिक ते मुंबई लाँग मार्च काढला. शेतकऱ्यांच्या मोर्चा असल्याने शिवसेनेने पुढाकार घेत मोर्चेकऱ्यांचे स्वागत करत पिण्याच्या पाण्यासह खाण्या-पिण्याच्या गोष्टी उपलब्ध करून दिल्या. मात्र शेतकऱ्यांच्या मोर्चाची दखल घेतलीत म्हणून तुमचे पाणी स्विकारू पण खाण्याच्या-पिण्याच्या गोष्टी स्विकारणार नसल्याचे सांगत शिवसेनेचे आदारातिथ्य नाकारल्याची माहिती …

Read More »

चैत्र चाहूल चे २०१८ चे पुरस्कार जाहिर लेखक दत्ता पाटील यांना रंगकर्मी तर ज्येष्ठ कला दिग्दर्शक अविनाश गोडबोलेंना ध्यास सन्मान

मुंबई : प्रतिनिधी चैत्र चाहूल तर्फे दरवर्षी दिल्या जाणाऱ्या रंगकर्मी सन्मान आणि ध्यास सन्मान या दोन्ही पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. यंदाचा रंगकर्मी सन्मान २०१८ हा पुरस्कार तरुण लेखक दत्ता पाटील आणि ध्यास सन्मान २०१८ या पुरस्कारासाठी अविनाश गोडबोले यांची निवड करण्यात आली आहे. चैत्र चाहूल तर्फे प्रदान करण्यात येणाऱ्या …

Read More »