Breaking News

विशेष बातमी

महारेराच्या विरोधात ग्राहकांना आता दाद मागता येणार महाराष्ट्र महसूल न्यायाधिकरणला अपिलावर सुणावनी घेण्याचे सरकारचे आदेश

मुंबईः प्रतिनिधी राज्यातील बांधकाम व्यावसायिकांकडून ग्राहकांच्या होत असलेल्या फसवणूकीच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी राज्य सरकारने केंद्र सरकारच्या गृहनिर्माण कायद्यातील तरतूदीनुसार महारेरा कायद्यांतर्गंत प्राधिकरणाची स्थापना केली. मात्र या प्राधिकरणाकडे स्वतःची न्यायप्रणाली नसल्याने सध्या महारेराच्या निकाला विरोधात दाद मागण्यासाठी महाराष्ट्र महसूल प्राधिकरणाकडे जबाबदारी सोपविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. बांधकाम व्यावसायिकांवर जरब बसविण्यासाठी …

Read More »

भारती विद्यापीठ, डि.वाय.पाटील, सिम्बॉयसिस विद्यापीठांसह अनेकांवर कारवाईचा बडगा स्वायत्त संस्थांना विद्यापीठ नाव वापरल्याबद्दल युजीसीकडून नोटीस

मुंबई: प्रतिनिधी काही वर्षांपूर्वी राज्यातील शैक्षणिक संस्थांना स्वातंत्र्य देण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने गर्भश्रीमंत शैक्षणिक संस्थांना स्वायत्त शिक्षण संस्थांचा दर्जा दिला. मात्र या संस्थांकडून स्वायत्ततेचा अर्थ स्वतंत्र विद्यापीठ असल्यासारखा घेतल्याने नावात विद्यापीठ नाव वापरणाऱ्या भारती विद्यापीठ, डी.वाय पाटील, सिम्बॉयसिस विद्यापीठ, गोखले इन्स्टीस्टुशन, डेक्कन कॉलेज, टाटा सोशल सायन्स यासह राज्यातील २१ संस्थांवर …

Read More »

ग्रीन एनर्जीयुक्त वाहन धोरणास लवकरच परवानगी प्रदुषण मुक्तेतासाठी दिल्ली, कर्नाटक पाठोपाठ राज्य सरकारचे पाऊल

मुंबई : प्रतिनिधी पर्यावरण संतुलन व वृध्दीच्या अनुषंगाने केंद्रा सरकारकडून विविध उपाय योजना राबविल्या जात असतानाच राज्यातील पर्यावरणाचे संतुलन राखले जावे यासाठी राज्य सरकारकडून लवकरच ग्रीन एनर्जीयुक्त असलेल्या वाहन वापराच्या अनुषंगाने लवकरच धोरण आणण्यात येणार आहे. त्यादृष्टीने दिल्ली आणि कर्नाटक राज्यापाठोपाठ राज्याच्या उद्योग आणि वीज विभागाकडून नवे धोरण तयार करण्यात …

Read More »

राज्यातील फायद्याच्या संस्थांनी सरकारच्या खात्यात पैसे ठेवावे नव्याने कर्ज घेण्यासाठी एमएमआरडीए, म्हाडासह १० संस्थांना सरकारचे आदेश

मुंबईः प्रतिनिधी राज्यातील विकास कामांना गती देण्यासाठी निधी अपुरा पडत असल्याने नव्याने कर्ज काढण्याची गरज पडू शकते. त्यासाठी राज्याच्या तिजोरीत ५० हजार कोटींची गंगाजळी दाखविणे आवश्यक आहे. एमएमआरडीए, म्हाडा, एसआरए, सिडको, एमआयडीसी सारख्या संस्थांना राज्य सरकारच्या खात्यात पैसे जमा करण्याविषयी कळविण्यात आल्याची माहिती मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. मागील आठवड्यात …

Read More »

३५० कोटी रूपयांचा ओव्हर ड्राफ्ट घेण्याची महाराष्ट्रावर वेळ ? खात्यात पैसेच शिल्लक नसल्याने राज्य सरकारचा निर्णय

मुंबई : प्रतिनिधी एकच ध्यास महाराष्ट्राचा विकास अशी घोषणा देत राज्यात सत्तेवर आलेल्या भाजप सरकारने विकास कामांच्या घोषणांचा पाऊस पाडायला सुरुवात केली. तसेच प्रसंगी कर्ज काढण्याची तयारीही दाखविली. एकाबाजूला या गोष्टी सुरु असतानाच दुसऱ्याबाजूला मात्र राज्याच्या तिजोरीत पैसे नसल्याने ३५० कोटी रूपयांचा ओव्हर ड्राफ्ट घेण्याची पाळी राज्य सरकारवर आल्याची धक्कादायक …

Read More »

परवडणाऱ्या घरांसाठी पीएमएवायखाली राज्य सरकारची स्व-पुनर्विकास योजना ग्रीन आणि नो डेव्हलपमेंट झोनमध्ये घरे निर्माण होण्याचा मार्ग मोकळा

मुंबई: प्रतिनिधी मुंबईसह राज्यात परवडणारी घरे निर्माण व्हावीत याकरिता राज्य सरकारने नवे गृहनिर्माण धोरण आणण्याचे निश्चित केले आहे. या धोरणानुसार पहिल्यांदाच शासकिय जमिनीबरोबरच खाजगी जमिनीवर परवडणाऱ्या घरांच्या निर्मितीसाठी राज्य सरकारकडून पंतप्रधान आवास योजना अर्थात पीएमएवायखाली प्रोत्साहन देण्यात येणार आहे. त्यामुळे राज्यात ५ ते १० लाख परवडणारी घरे निर्माण होणार असल्याची …

Read More »

वर्ष अखेरीस राज्यात कर्ज काढून ३ लाख ४१ हजार कोटींची विकास कामे सर्वाधिक कामे मुंबई आणि ठाणे शहरात

मुंबई : गिरिराज सावंत राज्यात भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारला नुकतीच तीन वर्षे पूर्ण झाली. या तीन वर्षाच्या कालावधीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विकास कामांच्या घोषणेचा एकच धडका लावला. या घोषणेनुसार राज्यातील मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर या प्रमुख शहरांमध्ये ३ लाख ४१ हजार ४९०.५१ कोटी रूपयांची कामे हाती घेण्यात आली …

Read More »

आर्मी डेपो खाजगीकरणाच्या विरोधात लष्करी जवान करणार आंदोलन देशभरातील कार्यालये आणि संसदेसमोर ४ लाख जवानांचे धरणे

मुंबईः प्रतिनिधी एल्फीस्टन येथील रेल्वेच्या पादचारी पुलावरील झालेल्या दुर्घटनेत अनेक निष्पाप नागरीकांचा बळी गेला. त्यामुळे रेल्वे प्रशासनावर अविश्वास दाखवित आर्मीच्या जवानांना पाचारण करत तेथील पादचारी पुलाचे काम करून घेण्याचा निर्णय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी घेत त्याची अंमलबजावणीही केली. संरक्षण मंत्रालयाने रेल्वेच्या हाकेला ओ देत मदतीचा हात दिला. परंतु याच संरक्षण …

Read More »

समृध्दी महामार्गासाठी आता अंतिम अर्थ पुरवठादाराच्या होकाराची प्रतिक्षा दक्षिण कोरिया कंपनीकडून शेवटची पाहणी पूर्ण

samruddhi समृद्धी महामार्ग

मुंबईः प्रतिनिधी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रिम प्रोजेक्ट असलेल्या समृध्दी महामार्गाच्या मागे असलेले वित्तीय शुल्क काष्ठ काही केल्या अद्यापही सुटायला तयार नाही. या प्रकल्पासाठी निधी उभारणीचे आव्हान मोठ्या प्रमाणावर असून सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी या प्रकल्पास वित्तीय सहाय करण्यास दोन्ही वेळेस नकार दिल्याने दक्षिण कोरियाच्या आर्थिक मदतीची शेवटची आशा राज्य …

Read More »

पदावरून दूर केलेल्या मोपलवार यांची पुन्हा एमएसआरडीसीत नियुक्ती सामान्य प्रशासन विभागाचे रजा मंजूर करत पुन्हा रूजू होण्याचे आदेश

मुंबईः प्रतिनिधी शहरातील बोरिवली येथील भूखंड स्वस्तदरात विकण्यासंदर्भात आणि बांधकाम व्यावसायिक सतीश मांगले यास धमकाविल्याप्रकरणी एमएसआरडीसीच्या उपाध्यक्ष पदावरून दूर करण्यात आलेले राधेश्याम मोपलवार यांना पुन्हा सेवेत रूजू होण्याचे आदेश दिले आहेत. विशेष म्हणजे त्यांना पदावरून दूर करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेला असताना त्या कालावधीची रजा गृहीत धरून त्यांना …

Read More »