Marathi e-Batmya

राम मंदिरात झालेल्या दान चोरी प्रकरणी राष्ट्रीय स्वंयसेवक संघाकडून पहिल्यांदा भाष्य

अयोध्या येथील राम मंदिरात दानपेट्यांमधून झालेल्या चोरीबद्दल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (RSS) शुक्रवारी तीव्र चिंता व्यक्त करत पहिल्यांदा भाष्य केले. या घटनेला ‘अत्यंत वेदनादायक’ असे संबोधत, संघाने दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आणि मंदिर व्यवस्थापनात अधिक पारदर्शकता व उत्तरदायित्व असावे, अशी आशाही यावेळी व्यक्त केली. नवी दिल्लीतून जारी केलेल्या निवेदनात, संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांनी म्हटले की, अनेक पिढ्यांतील भक्तांचे त्याग आणि समर्पणातून श्री राम जन्मभूमीवरील हे भव्य मंदिर हिंदू समाजासाठी श्रद्धा आणि भक्तीचे प्रतीक बनले असल्याचेही यावेळी सांगितले.

दत्तात्रेय होसबळे पुढे आपल्या व्हिडीओमध्ये म्हणाले की, अयोध्या राम मंदिरातील दानपेट्यांमध्ये चोरीची दुर्दैवी घटना घडली आहे, ज्यामुळे संपूर्ण समाज आणि रामभक्तांच्या भावना व श्रद्धेला मोठा धक्का बसला आहे; या घटनेमुळे आम्हा सर्वांना अत्यंत वेदना आणि संताप झाला आहे, असे मतही यावेळी व्यक्त केले.

पुढे बोलताना दत्तात्रेय होसबळे यांनी नमूद केले की, ‘श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट’च्या विनंतीवरून उत्तर प्रदेश सरकारने विशेष तपास पथक (SIT) स्थापन केली आणि त्यांच्या शिफारशींनुसार कायदेशीर कार्यवाही सुरू केली. तपासाअंती दोषी आढळणाऱ्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे, असेही सांगितले.

यावेळी सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांनी आवाहन केले की, ‘श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट’ला या घटनेकडे एक अपवादात्मक बाब म्हणून पाहण्याचे आणि मंदिर व्यवस्थापन व कार्यपद्धतीमधील त्रुटी दूर करण्याचे आवाहन केले. अयोध्या मंदिरावरील लाखो भक्तांची श्रद्धा अबाधित राहील आणि या घटनेभोवती निर्माण झालेली अनिश्चितता संपुष्टात येईल, याची खात्री करणे आवश्यक असल्याचे भाष्यही यावेळी केले.

पारदर्शक प्रशासकीय व्यवस्थेद्वारे ट्रस्ट मंदिरावरील लोकांचा विश्वास अधिक दृढ करत राहील, असा विश्वास दत्तात्रेय होसबळे यांनी व्यक्त केला.

पुढे बोलताना दत्तात्रेय होसबळे म्हणाले की, “योग्य आर्थिक व्यवस्थापन, निर्दोष व पारदर्शक कार्यपद्धती आणि पावित्र्य, शुचिता व खऱ्या धार्मिकतेने युक्त वातावरण यांच्या माध्यमातून ‘श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट’ हिंदू समाजाची श्रद्धा आणि विश्वास अधिक दृढ करत राहील, याची आम्हाला खात्री आहे,” असेही म्हणाले.

दरम्यान, संघाने शांततेचे आवाहन केले आणि तपास सुरू असताना हिंदू समाजाने संयम व धैर्याने वागावे, अशी विनंती केली.

या कठीण प्रसंगी आवश्यक तो संयम आणि धीर राखावा, असे आवाहनही राषअट्रीय स्वयंसेवक संघाने संपूर्ण हिंदू समाजाला केले. “या कठीण प्रसंगी आवश्यक संयम आणि धैर्याचे प्रदर्शन करा आणि या दुर्दैवी घटनेचा गैरफायदा घेऊन हिंदू धर्म व समाजाची बदनामी करू पाहणाऱ्या हिंदू-विरोधी व राष्ट्र-विरोधी शक्तींचे कट हाणून पाडा,” असे आवाहन या निवेदनात करण्यात आल

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राम मंदिर देणगीतील कथित गैरव्यवहाराच्या प्रकरणानंतर राजीनामा दिलेले ‘श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट’चे सरचिटणीस चंपत राय आणि विश्वस्त अनिल मिश्रा यांना ट्रस्टतर्फे ६ जुलै रोजी होणाऱ्या महत्त्वपूर्ण बैठकीत ‘कारणे दाखवा’ नोटीस (show-cause notice) बजावली जाण्याची शक्यता आहे.

ट्रस्टच्या सूत्रांनुसार, त्यांच्या राजीनाम्याबाबत किंवा भविष्यातील भूमिकेबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी, देणगीतील अनियमिततेबाबत या दोन्ही पदाधिकाऱ्यांकडून लेखी आणि तोंडी स्पष्टीकरण मागवले जाईल.

ही कार्यवाही ट्रस्टच्या नियमावलीनुसार केली जात असल्याचे सूत्रांनी सांगितले; या नियमावलीनुसार, कोणतीही शिस्तभंगाची कारवाई करण्यापूर्वी संबंधित पदाधिकाऱ्यांना आपली बाजू मांडण्याची संधी देणे अनिवार्य आहे. तसेच, त्यांचे राजीनामा स्वीकारण्याबाबत किंवा त्यांना पदावरून दूर करण्याबाबतचा कोणताही निर्णय विश्वस्तांच्या आवश्यक बहुमताने मंजूर होणे गरजेचे आहे, अशी तरतूदही या नियमांमध्ये आहे.

Exit mobile version