Breaking News

सर्वोच्च न्यायालयाचे आदेश, NEET-UG चे परिक्षा केंद्रनिहाय गुण जाहिर करा शनिवारी दुपारपर्यंत संकेतस्थळावर परिक्षा केंद्र निहाय गुण जाहिर कऱण्याची मुदत

NEET-UG परिक्षा पेपर लिक प्रकरणी संपूर्ण परिक्षा रद्द करण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. अशा विविध अशा ३८ याचिकांवरील एकत्रित सुनावणी सर्वोच्च न्यायालयाकडून घेण्यात येत आहे. आज झालेल्या सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ला NEET-UG 2024 मध्ये बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे शहर आणि केंद्रनिहाय विद्यार्थ्यांची ओळख जाहिर न करता मिळालेले गुण एनटीएच्या वेबसाइटवर शनिवार दुपारपर्यंत अपलोड करण्याचे निर्देश दिले.

कथित पेपर लीक आणि गैरप्रकारांमुळे NEET-UG 2024 परीक्षा रद्द करण्याची मागणी करणाऱ्या याचिकांवर सुनावणी करताना न्यायमूर्ती जेबी परडीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांचा समावेश असलेल्या सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यीय खंडपीठाने हा आदेश दिला.

वास्तविक पाहता सर्वोच्च न्यायालयाने उद्या दुपारपर्यंतची वेळ एनटीएला दिली होती. मात्र २३ लाख विद्यार्थ्यांचे निकाल परिक्षा केंद्र निहाय जाहिर करण्याच्या कामात मोठा वेळ लागणार असल्याचा युक्तीवाद एनटीएकडून करण्यात आला. त्यावर अखेर गुण जाहिर करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने शनिवारी दुपार पर्यंतचा वेळ एनटीएला दिला.

या निवेदनाची दखल घेत खंडपीठाने आदेश दिले:

“याचिकाकर्त्यांनी असे सादर केले आहे की NEET-UG 24 परीक्षेचे निकाल वेबसाइटवर प्रकाशित केले गेले तर ते योग्य होईल जेणेकरून परिक्षार्थी उमेदवारांनी मिळवलेल्या केंद्रनिहाय गुणांवर काही प्रमाणात पारदर्शकता येईल, असे निरिक्षण नोंदवित आम्ही NTA ला NEET-UG 24 परीक्षेत विद्यार्थ्यांनी मिळवलेले गुण प्रकाशित करण्याचे निर्देश देतो, त्याचवेळी विद्यार्थ्यांची ओळख लपविण्याची अट घातली आहे. निकाल प्रत्येक केंद्र आणि शहराच्या संदर्भात स्वतंत्रपणे जाहीर केले जावेत असे आदेशही यावेळी एनटीएला दिले.

भारताचे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी केंद्रनिहाय निकाल प्रकाशित करण्याच्या निर्देशाला तीव्र विरोध केला. तथापि, सरन्यायाधीशांनी तोंडी सांगितले की पटना आणि हजारीबाग केंद्रांमध्ये पेपर लीक झाल्याची नोंद झाली आहे. तसेच पेपर लीक प्रकरण फक्त त्या केंद्रांपुरतेच मर्यादित राहिली किंवा इतर शहरे आणि केंद्रांमध्ये पसरली हे सुनिश्चित करण्यासाठी, निकालांच्या संपूर्ण डेटाचे विच्छेदन करणे महत्वाचे असल्याचेही यावेळी स्पष्ट केले.

खंडपीठाने सुरुवातीला उद्या संध्याकाळी ५ वाजेपर्यंत निकाल प्रकाशित करण्याचे निर्देश एनटीएला दिले असले तरी, एनटीएला ज्येष्ठ वकील नरेश कौशिक यांनी आणखी वेळ देण्याची विनंती केली, कारण २३ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांच्या निकालाची प्रक्रिया करावी लागणार आहे. त्यानुसार खंडपीठाने शनिवारपर्यंत मुदत वाढवली.

न्यायालयाने या प्रकरणी दिवसभर सुनावणी घेतली, अनेक समर्पक प्रश्न उपस्थित केले आणि महत्त्वपूर्ण निरीक्षणे नोंदवली.
यावेळी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने NEET-UG 24 परिक्षाच रद्द करण्याच्या मागणीसाठी दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणी घेताना स्पष्ट केले, या संपूर्ण प्रकरणी दररोज सुनावणी घेण्यात येणार असल्याचे सांगत पुढील सुनावणी २२ जुलै रोजी घेण्यात येणार असल्याचेही स्पष्ट शब्दात सांगितले.

Check Also

आफ्रिकेतील उहुरु शिखरावर फडकवला, भारताचा राष्ट्रीय ध्वज चिकाटी आणि सहकार्य यातून हे ध्वजारोहन साध्य

देशाच्या 78 व्या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीतील हिमालयीन गिर्यारोहण संस्थेच्या दिव्यांगजन मोहिम चमूने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *