Marathi e-Batmya

कुवैतचा यंदाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार भारताचे पंतप्रधान मोदी यांना प्रदान

कुवैतचा सर्वोच्च नागरी पुरस्कार असलेला ऑर्डर ऑफ मुबारक अल कबीर पुरस्कारासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची निवड करण्यात आली. हा पुरस्कार कुवैतचे शेख अहमद अब्दुल्ला अल-अहमद अल-सबाह यांच्या हस्ते ‘ऑर्डर ऑफ मुबारक अल कबीर’ नागरी पुरस्कार आज पंतप्रधान मोदी यांना प्रदान करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रविवारी त्यांचे कुवैती समकक्ष शेख अहमद अब्दुल्ला अल-अहमद अल-सबाह यांच्या हस्ते ‘ऑर्डर ऑफ मुबारक अल कबीर’ हा कुवैतमधील सर्वोच्च सन्मान प्रदान करण्यात आला. भारताचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांना हा २० वा आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.

ऑर्डर ऑफ मुबारक अल कबीर हा कुवैती नाईटहूड आहे जो देशाचे प्रमुख, परदेशी सार्वभौम देशाचे नेते आणि परदेशी राजघराण्यातील सदस्यांना मैत्रीचे प्रतीक म्हणून दिला जातो.

पंतप्रधान मोदींनी आपल्या दोन दिवसीय कुवैत दौऱ्याची सुरुवात शनिवारी एका भारतीय कामगार चमूला भेट देत. ज्याचा उद्देश देशात कार्यरत असलेल्या भारतीय कामगार वर्गासोबत एकता दर्शविण्यासाठी आहे. कुवैतचे अमीर शेख मेशाल अल-अहमद अल-जाबेर अल-सबाह यांनी आमंत्रित केलेल्या पंतप्रधानांनी अमीर आणि युवराज सबाह अल-खलिद अल-सबाह यांच्यात द्विपक्षीय चर्चा झाली. तसेच भारतीय सांस्कृतिक आणि स्थलांतरीत भारतीयांच्या चाली रीतीबाबत अर्थात डायस्पोराशी संवाद साधला.

यापूर्वी कुवैतचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘ऑर्डर ऑफ मुबारक अल कबीर’ याआधी बिल क्लिंटन, प्रिन्स चार्ल्स आणि जॉर्ज बुश यांसारख्या परदेशी नेत्यांना देण्यात आला आहे. कुवैतमधील सर्वोच्च सन्मान मिळविणारे भारताचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींना मिळालेला हा २० वा आंतरराष्ट्रीय सन्मान आहे.

ऑर्डर ऑफ मुबारक अल कबीर हा कुवैती नाईटहूड आहे जो देशाचे प्रमुख, परदेशी सार्वभौम आणि परदेशी राजघराण्यातील सदस्यांना मैत्रीचे प्रतीक म्हणून दिला जातो.

Exit mobile version