युपीएससी अर्थात केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षा २०२४ चा अंतिम निकाल जाहीर झाला असून देशभरातून एकूण १००९ उमेदवार यशस्वी झाले आहेत. यापैकी राज्यातून ९० हून अधिक उमदेवारांनी घवघवीत यश मिळविले आहे. अर्चित पराग डोंगरे राज्यातून प्रथम आले असून देशात ३ रा क्रमांक पटकाविला आहे. तर शिवांश सुभाष जगदाळे यांना २६वी ऑल इंडिया रँक मिळाला आहे. पहिल्या १०० मध्ये राज्यातील ७ उमेदवार आहेत.
राज्यातून यशस्वी झालेले उमेदवार
अर्चित पराग डोंगरे (०३) शिवांश सुभाष जगदाळे (२६) शिवानी पांचाळ (५३) अदिती संजय चौघुले (६३) साई चैतन्य जाधव (६८) विवेक शिंदे (९३) तेजस्वी प्रसाद देशपांडे (९९) दिपाली मेहतो (१०५) ऐश्वर्या मिलिंद जाधव (१६१) शिल्पा चौहान (१८८) कृष्णा बब्रुवान पाटील (१९७) गौरव गंगाधर कायंदे पाटील (२५०) मोक्ष दिलीप राणावत (२५१) प्रणव कुलकर्णी (२५६) अंकित केशवराव जाधव (२८०) आकांश धुळ (२९५) जयकुमार शंकर आडे (३००) अंकिता अनिल पाटील (३०३) पुष्पराज नानासाहेब खोत (३०४) राजत श्रीराम पात्रे (३०५) पंकज पाटले (३२९) स्वामी सुनील रामलिंग (३३६) अजय काशीराम डोके (३६४) श्रीरंग दीपक कावोरे (३९६) वद्यवत यशवंत नाईक (४३२) मानसी नानाभाऊ साकोरे (४५४) केतन अशोक इंगोले (४५८) बच्छाव कार्तिक रवींद्र (४६९) अमन पटेल (४७०) संकेत अरविंद शिंगाटे (४७९) राहुल रमेश आत्राम (४८१) चौधर अभिजीत रामदास (४८७) बावणे सर्वेश अनिल (५०३) आयुष राहुल कोकाटे (५१३) बुलकुंडे सावी श्रीकांत (५१७) पांडुरंग एस कांबळी (५२९) ऋषिकेश नागनाथ वीर (५५६) श्रुती संतोष चव्हाण (५७३) रोहन राजेंद्र पिंगळे (५८१) अश्विनी संजय धामणकर (५८२) अबुसलीया खान कुलकर्णी (५८८) सय्यद मोहम्मद आरिफ मोईन (५९४) वेदांत माधवराव पाटील (६०१) अक्षय विलास पवार (६०४) दिलीपकुमार कृष्ण देसाई (६०५) गायकवाड ऋषिकेश राजेंद्र (६१०) स्वप्नील बागल (६२०) सुशील गिट्टे (६२३) सौरव राजेंद्र ढाकणे (६२८) अपूर्व अमृत बलपांडे (६४९) कपिल लक्ष्मण नलावडे (६६२) सौरभ येवले (६६९) नम्रता अनिल ठाकरे (६७१) ओंकार राजेंद्र खुंताळे (६७३) यश कनवत (६७६) बोधे नितीन अंबादास (६७७) ओमप्रसाद अजय कंधारे (६७९) प्रांजली खांडेकर (६८३) सचिन गुणवंतराव बिसेन (६८८) प्रियंका राठोड (६९६) अक्षय संभाजी मुंडे (६९९)अभय देशमुख (७०४) ज्ञानेश्वर बबनराव मुखेरकर (७०७) विशाल महार (७१४) अतुल अनिल राजुरकर (७२७) अभिजित सहादेव आहेर (७३४) भाग्यश्री राजेश नायकेले (७३७) श्रीतेश भूपेंद्र पटेल (७४६) शिवांग अनिल तिवारी (७५२) पुष्कर लक्ष्मण घोळावे (७९२) योगेश ललित पाटील (८११) श्रुष्टी सुरेश कुल्ये (८३१) संपदा धर्मराज वांगे (८३९) मोहिनी प्रल्हाद खंदारे (८४४) सोनिया जागरवार (८४९) अजय नामदेव सरवदे (८५८) राजू नामदेव वाघ (८७१) अभिजय पगारे (८८६) हेमराज हिंदुराव पनोरेकर (९२२) प्रथमेश सुंदर बोर्डे (९२६) गार्गी लोंढे (९३९) सुमेध मिलिंद जाधव (९४२) आनंद राजेश सदावर्ती (९४५) जगदीश प्रसाद खोकर (९५८) विशाखा कदम (९६२) सचिन देवराम लांडे (९६४) आदित्य अनिल बामणे (१००४)
केंद्रीय लोकसेवा आयोग नागरी परीक्षा २०२४
केंद्र शासनाच्या विविध सेवांमधील रिक्त जागांसाठी सप्टेंबर २०२४ मध्ये मुख्य परीक्षा घेण्यात आली. जानेवारी – एप्रिल २०२५ दरम्यान परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. या परिक्षेच्या निकालातील उत्तीर्ण १००९ उमेदवारांची केंद्रीय लोकसेवा आयोगाने विविध सेवेतील पदांच्या नियुक्तीसाठी शिफारस केली आहे. यामध्ये सर्वसाधारण गटातून ३३५, आर्थिक मागास प्रवर्गातून (ईडब्ल्यूएस) १०९, इतर मागासवर्गीय प्रवर्गातून (ओबीसी) – ३१८, अनुसूचित जाती प्रवर्गातून (एससी) – १६०, अनुसूचित जमाती प्रवर्गातून- ८७ उमेदवारांचा समावेश आहे. एकूण यशस्वी उमेदवारांमध्ये ७२५ पुरूष तर २८४ महिला उमेदवार आहेत.
एकूण यशस्वी उमेदवारांमध्ये ५० दिव्यांग आहेत. लोकसेवा आयोगाने २३० उमेदवारांची आरक्षित सूची (Reserve List) तयार केली आहे. यामध्ये सामान्य गट ११५, आर्थिक मागास प्रवर्ग (ईडब्ल्यूएस) ३५, इतर मागास वर्ग ५९, अनुसूचित जाती १४, अनुसूचित जमाती ०६, दिव्यांग ०१ उमेदवारांचा समावेश आहे.
या रिक्त पदांवर उमेदवार होतील रूजू
भारतीय प्रशासन सेवा (आयएएस) या सेवेत शासनाकडे एकूण १८० जागा रिक्त आहेत. यामध्ये सर्वसाधारण ७३, आर्थिक मागास प्रवर्ग (ईडब्ल्यूएस) १८ इतर मागास वर्ग (ओबीसी) ५२, अनुसूचित जाती (एससी) २४, अनुसूचित जमाती (एसटी) १३ जागा रिक्त आहेत. उमेदवारांच्या गुणानुक्रमे रिक्त जागांवर यशस्वी उमेदवारांची निवड केली जाईल.
भारतीय विदेश सेवा (आयएफएस) या सेवेत शासनाकडे एकूण ५५ जागा रिक्त आहेत. यामध्ये सामान्य गट (ओपन) २३, आर्थिक मागास प्रवर्ग(ईडब्ल्यूएस) ०५, इतर मागास वर्ग (ओबीसी) १३, अनुसूचित जाती (एससी) ०९, अनुसूचित जमाती (एस.टी.) ०५ जागा रिक्त आहेत.
भारतीय पोलिस सेवा (आयपीएस) या सेवेमध्ये एकूण १४७ जागा रिक्त आहेत, यामध्ये सामान्य गटातून (ओपन) ६०, आर्थिक मागास प्रवर्ग (ईडब्ल्यूएस) १४, इतर मागास प्रवर्गातून ४१, अनुसूचित जाती प्रवर्गातून २२, तर अनुसूचित जमाती प्रवर्गातून १० उमेदवारांना नियुक्ती दिली जाणार आहे.
केंद्रीय सेवा गट अ – या सेवेमध्ये एकूण ६०५ जागा रिक्त आहेत. यामध्ये सामान्य गटातून (ओपन) – २४४, आर्थिक मागास प्रवर्ग (ईडब्ल्यूएस) ५७ , इतर मागास प्रवर्गातून – १६८, अनुसूचित जाती प्रवर्गातून – ९० तर अनुसूचित जमाती प्रवर्गातून –४६ उमेदवारांना नियुक्ती देण्यात येईल.
केंद्रीय सेवा गट ब – या सेवेमध्ये एकूण – १४२ जागा रिक्त आहेत. यामध्ये सामान्य गटातून (ओपन) – ५५, आर्थिक मागास प्रवर्ग(ईडब्ल्यूएस) १५ उमेदवार, इतर मागास प्रवर्गातून – ४४, अनुसूचित जाती प्रवर्गातून – १५ तर अनुसूचित जमाती प्रवर्गातून -१३ उमेदवारांना नियुक्ती दिली जाईल.
एकूण २४१ उमेदवारांची निवड तात्पुरत्या स्वरुपाची आहे. अधिकृत निकाल व यशस्वी उमदेवारांची नावे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या www.upsc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
यावर्षीच्या उत्तीर्ण उमेदवारामध्ये महाराष्ट्राचा डोंगरे अर्चित पराग (रोल क्र. ०८६७२८२) यांनी वेल्लोर व्हीआयटी येथून इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकीमध्ये पदवीधर (बी.टेक.) असून युपीएससी परीक्षेत तत्वज्ञान हा पर्यायी विषय घेऊन देशभरात तिसरा क्रमांक पटकावला आहे.
पहिल्या २५ उमेदवारांमध्ये ११ महिला आणि १४ पुरुष आहेत. त्यांची शैक्षणिक पात्रता आयआयटी, एनआयटी, व्हीआयटी, जेएनयू, दिल्ली विद्यापीठ आणि अलाहाबाद विद्यापीठ यासारख्या देशातील प्रमुख संस्थांमधून अभियांत्रिकी, विज्ञान, वाणिज्य, वैद्यकीय विज्ञान आणि वास्तुकला या विषयातील पदवीपर्यंत आहे.
पहिल्या २५ यशस्वी उमेदवारांनी लेखी (मुख्य) परीक्षेत मानववंशशास्त्र, वाणिज्य आणि लेखाशास्त्र, भूगोल, गणित, तत्वज्ञान, भौतिकशास्त्र, राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध, सार्वजनिक प्रशासन, समाजशास्त्र आणि तमिळ भाषेचे साहित्य यासह विविध पर्यायी विषयांची निवड केली आहे.
