Breaking News

उघड्यावर शौच करायला गेला आणि अजगराच्या विळख्यात अडकला सोशल मिडीयावर व्हिडिओ व्हायरल जबलपूर येथील घटना

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हरघर शौचालय आणि हरघर नळ या योजनेची मोठ्या थाटामाटात घोषणा केली. त्यानुसार देशातील प्रत्येक राज्य सरकारकडून या योजनेची अंमलबजावणी करण्यात येते. मात्र आजही अनेक राज्यातील ग्रामीण भागात ही योजना पोहोचलेली असली तरी पुरेसे पाणी ग्रामीण भागात उपलब्ध होत नसल्याने किंवा रोजगाराच्या अपुऱ्या संधीमुळे छोट्या छोट्या गोष्टीसाठीसाठी किरकोळ स्वरूपातील खर्चही ग्रामीण भागातील नागरिकांना करता येत नाही अशी परिस्थिती आहे. मात्र पंतप्रधानांनी जाहिर केलेली योजनेचा लाभ न घेतलेल्या एका व्यक्तीला आपला जीव गमाविण्याची पाळी आली. यासदंर्भात एक्स वर व्हिडिओ व्हायरल झाला असून तो चांगलाच व्हायरल होत असल्याचे दिसून आले आहे.

सदर घटनेचा व्हिडिओ हा जबलपूरमधील असल्याचे सांगण्यात येत असून एक व्यक्ती उघड्यावर शौच करण्यास गेला असता त्याला त्या परिसरातील एका अजगराने गिळण्याचा प्रयत्न केला. सदर व्यक्तीने अजगरापासून स्वतःची सोडवणूक करून घेण्याचा प्रयत्नही केला. परंतु अजगराने व्यक्तीला गिळण्यासाठी कवेत घेतले असल्याने बिचाऱ्याला धड स्वतःची सोडवणूकही करून घेता येईना आणि शौचावरून उठताही येईना, अखेर शौचास बसलेल्या व्यक्तीने आरडाओरड केल्याने स्थानिक भागातील काही नागरिकांनी अजगराच्या तावडीतून व्यक्तीची सोडवणूक कऱण्यासाठी धाव घेतली.

तेव्हा मदतीसाठी धावलेल्या एका व्यक्तीने आधी काठीने अजगराला बाजूला साऱण्याचा प्रयत्न केला. मात्र अजगराने काही हलायला तयार होईना तेव्हा मदतीसाठी धावलेल्या व्यक्तीने अजगरावर कुऱ्हाडीचे घाव घालण्यास सुरुवात केली. तेव्हा कुठे अजगराने शौचास बसलेल्या व्यक्तीला सोडण्यास सुरुवात केली.

मात्र पावसाळ्याच्या दिवसात जमिनीत लपून राहणारी अशी साप, विंचू-अजगर हे आपले भक्ष्य शोधण्यासाठी उघड्यावर आलेली असतात आणि थोडासा झाडी झुडपांचा आडोसा धरून लपून राहिलेली असतात. मात्र सदर व्यक्तीला शौचास उघड्यावर बसणे चांगलेच अंगलट आल्याचे दिसून येत आहे.

Check Also

आफ्रिकेतील उहुरु शिखरावर फडकवला, भारताचा राष्ट्रीय ध्वज चिकाटी आणि सहकार्य यातून हे ध्वजारोहन साध्य

देशाच्या 78 व्या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीतील हिमालयीन गिर्यारोहण संस्थेच्या दिव्यांगजन मोहिम चमूने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *