Breaking News

Tag Archives: अंबादास दानवे

आदित्य ठाकरे म्हणाले, राज्यपालांनी घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना समज द्या… तर लाठिमार प्रकरणी गृहमंत्र्यांनी राजीनामा देण्याची अंबादास दानवे यांची मागणी

सरकारी कार्यक्रमासाठी लाठीचार्ज झाला. आम्ही अडीच वर्षे सरकारमध्ये होतो. त्यामुळे पोलिस स्वताहून लाठीचार्ज करत नाहीत. मुख्यमंत्री किंवा गृहमंत्र्यांकडून आदेश आल्याशिवाय पोलिसांकडून काम केले जात नाही. तरीही शांततेत मराठा आरक्षणप्रश्नी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांकडून लाठिमार करण्यात आला. हा लाठिमार गृहमंत्री, मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यानंतरच करण्यात आल्याने राज्यपालांनी घटनाबाह्य मुंख्यमंत्र्यांना समज द्यावी अशी मागणी …

Read More »

अंबादास दानवे यांची स्पष्टोक्ती, सगळेच काही संजय राऊत नसतात… संजय शिरसाट राष्ट्रीय नेते अजित पवार शरद पवार भेटीवर लगावला टोला

राज्यातील विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आज जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीबाबत विचारले असता अंबादास म्हणाले की, शिवसेना ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या वर्तमानपत्रात त्या भेटीबाबत गंमत जमंत असा अग्रलेख लिहिला आहे. त्यामुळे माझ्या मनात काही शंका …

Read More »

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत, अंबादास दानवे आणि मंत्री भुमरे आणि सत्तार भिडले पालकमत्री म्हणजे जहागीरी आहे का? अंबादास दानवे यांचा सवाल

छत्रपती संभाजीनगर अर्थात औरंगाबाद जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत शिवसेनेच्या दोन गटात जोरदार राडा पाहायला मिळाला. जिल्हा नियोजन समितीची बैठक सुरू असताना निधी वाटपावरून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे कॅबिनेट मंत्री संदीपान भुमरे आणि अब्दुल सत्तार यांना भिडले. मी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक आहे!घाबरणार नाही तर नडणार …

Read More »

अंबादास दानवे यांचा आरोप, महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यातील दुर्घटनेला सरकार जबाबदार खाजगी संस्थेने आयोजित केला होता का?

खारघर येथील महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात झालेल्या दुर्घटनेला सांस्कृतिक विभागाइतकेच गृहखातेही जबाबदार आहे. तसेच या घटनेतील श्री सदस्यांच्या मृत्यूला सरकार जबाबदार असल्याचा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विधान परिषद सभागृहात केला. पुढे बोलताना अंबादास दानवे म्हणाले, सदर घटनेमध्ये दुखापत झालेल्या रुग्णांवर टाटा हॉस्पिटलमध्ये उपचार होत नव्हते म्हणून त्यांना …

Read More »

मणिपूर येथील घटनेचे राज्य विधिमंडळात पडसाद, काँग्रेसचा सभात्याग काँग्रेसच्या महिला आमदारांकडून गोंधळ

मागील दोन महिन्याहून अधिक काळ मणिपूरमधील हिंसाचार धुमसत असताना त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणतेही भाष्य केले नाही की, हिंसाचार थांबविण्यासाठी प्रयत्न केले नाहीत. त्यातच मणिपूर येथील दोन महिलांची नग्न धिंड काढत त्यांच्यावर गॅगरेप केल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर देशातील विरोधी पक्षांसह परदेशातून मोठ्या प्रमाणावर मोदी सरकारवर टीका सुरु झाली. …

Read More »

किरीट सोमय्या प्रकरणी देवेंद्र फडणवीस यांनी केली सखोल चौकशीची घोषणा अंबादास दानवे, अनिल परब यांच्या मागणीनुसार सखोल चौकशी करण्याचे दिले आश्वासन

ईडी सारख्या तपास यंत्रणांचा धाक दाखवित आणि भाजपा पक्ष संघटनेत आणि विधान परिषद, राज्यसभा आदी ठिकाणी पद देण्याचे आमिष दाखवित भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी महिलांचे लैगिंक शोषण करत असल्याचा आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली. या व्हिडीओवरून विधान परिषदेतही विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि शिवसेना ( …

Read More »

“आमिष दाखवित…मराठी बायकांना”, किरीट सोमय्यांचे ते आक्षेपार्ह व्हिडिओज् अंबादास दानवे यांनी दिले सभागृहात पेनड्राईव्ह देत केली सखोल चौकशीची मागणी

मागील काही वर्षापासून ईडी, सीबीआयच्य़ा कारवाईचा धाक दाखवित तर कधी विधान परिषदेच्या एखाद्या समितीवर, महामंडळावर वर्णी लावतो किंवा राज्यसभेवर एखादे पद देतो, पक्ष संघटनेत पद देतो सारखी आमिषे दाखवित अनेक महिलांचे लैगिंग शोषण केल्याचा धक्कादायक आरोप विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावर केला. …

Read More »

नाना पटोले यांची टीका, शेतकऱ्यांच्या टाळूवरचे लोणी खाणारे शेतकरीविरोधी ट्रिपल इंजिन सरकार राज्यात कॅसिनो सुरु करून तरुणांना बरबाद करण्याचा भाजपा सरकारचा डाव

पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधी पक्षांनी भाजपाप्रणित शिंदे सरकारला घेरले. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर स्थगन प्रस्ताव आणला होता पण सरकारने शेतकऱी प्रश्नांवर बोलू दिले नाही. बोगस बियाणामुळे शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे पण सरकार फक्त कडक कायदा करु म्हणत वेळ मारुन नेत आहे. राज्यातील भाजपाप्रणित तिघाडी सरकार शेतकरी विरोधी असून शेतकऱ्याच्या टाळूवरचे लोणी …

Read More »

फडणवीसांनी उल्लेख केलेल्या शिंदे सरकारला लिहिलेल्या विरोधकांच्या पत्रात आहे तरी काय? वाचा तर मग या कारणामुळे चहापनावर टाकला बहिष्कार

राज्यातील भाजपा प्रणित शिंदे-फडणवीस सरकारला अजित पवार यांच्या रूपाने तिसरे इंजिन लागलेले असतानाही वेगवान निर्णय गतिमान सरकार या घोषणेची प्रत्यक्ष अंमलबजाणी होताना दिसत नाही. तसेच मागील एक वर्षाच्या कालावधीत शिंदे-फडणवीस-पवार सरकारने वारेमाप घोषणा केल्या. मात्र त्या घोषणांची अंमलबजावणी होताना दिसत नाही. त्याचबरोबर राज्यातील कायदा-सुव्यवस्था आदींसह शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विरोधी पक्षनेते अंबादास …

Read More »

“कलंकित व घटनाबाह्य” सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा सरकारवर हल्ला

सर्वोच्च न्यायालयाने नाकारलेले घटनाबाह्य मुख्यमंत्री, घटनाबाह्य व कलंकित सरकार, शेतकरी विरोधी, लोक विरोधी सरकार हे राज्यातील कायदा सुव्यवस्था राखण्यास सपशेल अपयशी ठरले आहे, असे टीकास्त्र विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज केले. या असंवैधानिक सरकारने पावसाळी अधिवेशन पूर्वसंध्येला आयोजित चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधी पक्षाच्या वतीने बहिष्कार घालण्यात येत असल्याचे विधानपरिषदेचे विरोधी …

Read More »