Breaking News

Tag Archives: अजित पवार

एटापल्ली नक्षल्यांचा पत्रक वाटून राज्य सरकारला इशारा एटापल्ली तालुक्यातील नक्षलवादी आक्रमक

अधुरा सपना पुरा करेंगे, असा इशारा नक्षल्यांनी गडचिरोली जिल्ह्यात पत्रकं वाटले आहेत. नक्षली चळवळीवर वारंवार होणाऱ्या हल्ल्यांमुळे नक्षलवादी आता आक्रमक झाले आहेत. अलीकडे झालेल्या एटापल्ली तालुक्यातील चकमकीत 12 माओवादी ठार झाले होते. नक्षल्यांनी वाटलेल्या पत्रकात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करण्यात आले आहे. अजित पवार 23 …

Read More »

एसटी महामंडळ कृती समितीची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी घेतली बैठक उच्चाधिकार समितीने बैठक घेऊन आठवडाभरात अहवाल सादर करावा

राज्य परिवहन महामंडळातील कामगार संघटनांच्या कृती समितीने ९ ऑगस्ट पासून पुकारलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली कृती समितीची बैठक झाली. समितीच्या मागण्यांच्या अनुषंगाने उच्चाधिकारी समितीने बैठक घेऊन त्याचा अहवाल आठवडाभरात सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. महामंडळाच्या उत्पन्नवाढीसाठी राज्य शासन अजून दोन हजार नविन बसेस घेण्याबाबत सकारात्मक …

Read More »

अल्पसंख्यांक बांधवांच्या विकासासाठी बार्टीच्या धर्तीवर मार्टी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रयत्नांना यश

राज्यातील अल्पसंख्याक बांधवांचे मागासलेपण दूर करुन त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी टार्टी’, ‘बार्टी’, ‘सारथी’, ‘महाज्योती’, ‘अमृत’च्या धर्तीवर ‘अल्पसंख्याक संशोधन व प्रशिक्षण संस्था म्हणजे ‘एमआरटीआय’ची स्थापना करण्याचा राज्य मंत्रिमंडळाने आज घेतलेला निर्णय म्हणजे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजनमंत्री अजित पवार यांच्या प्रयत्नांचे यश असल्याचे सांगत राज्यातील अनेक मुस्लिम तसेच अल्पसंख्यांक बांधवांच्या संस्था, संघटनांनी …

Read More »

अजित पवार २४ दिवसात ३९ विधानसभा मतदारसंघात संवाद साधणार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांची माहिती

राष्ट्रवादी काँग्रेसची ‘जनसन्मान’ यात्रा ८ ऑगस्टपासून नाशिकच्या दिंडोरी येथून सुरू होणार असून त्यामध्ये उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मुंबई आणि विदर्भ असा हा पहिला टप्पा ३१ ऑगस्टला संपणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. पुढे बोलताना सुनिल तटकरे म्हणाले की, लोकशाहीवर आमचा दृढविश्वास असल्यानेच …

Read More »

अजित पवार यांच्या ‘जनसन्मान’ यात्रेच्या निमित्ताने समन्वयकांची नेमणूक राज्यातील दौऱांची जबाबदारी या पदाधिकारी आणि मंत्र्यांवर

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार हे राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये ‘जनसन्मान’ यात्रेच्या निमित्ताने महायुती सरकारच्या लोककल्याणकारी योजना व महायुती सरकारने केलेले जनसेवेचे कार्य जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी दौरा करणार असून या जनसन्मान यात्रेसाठी ७ समन्वयकांची तर ८ सहसमन्वयकांची यादी राष्ट्रवादी काँग्रेसकडून जाहीर करण्यात आली आहे. जनसन्मान यात्रेसाठी समन्वयक म्हणून सहकारमंत्री दिलीप वळसे …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, लोकशाहीर अण्णा भाऊंचे साहित्य लढणाऱ्या माणसांसाठी दीपस्तंभ अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य जगभर प्रसिद्ध असून त्यांचा वाटेगाव ते मॉस्को प्रवास आहे. तो उल्लेखनीय असून त्यांच्या साहित्यातून समाजात क्रांतिकारी परिवर्तन घडले आहे. त्यांचे साहित्य वीस पेक्षा अधिक भाषेत अनुवादित झाले असून त्यांचे साहित्य जगण्यासाठी लढणाऱ्या माणसांसाठी दीपस्तंभासारखे आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. अण्णा भाऊ …

Read More »

… तोपर्यंत टोल वसुली थांबवा; अजित पवार यांचे आदेश महामार्गावरील टोल वसुली थांबविण्यासाठीचा प्रस्ताव सादर करावा

महामार्गावरील भुयारी मार्ग, उड्डाणपूल यासारख्या कामांसह रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे निर्माण झालेल्या वाहतूक कोंडीच्या त्रासातून नागरिकांची मुक्तता करण्यासाठी सर्वप्रकारच्या उपाययोजना युद्धपातळीवर राबवाव्यात. त्यासाठी लागणारी सर्व प्रकारची मदत राज्य शासनामार्फत करण्यात येईल. मात्र, पुढील १० दिवसांत या महामार्गावरील वाहतूक सुरळीत न झाल्यास जबाबदार अधिकाऱ्याला निलंबित करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सार्वजनिक …

Read More »

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीदिनी आर्टी कार्यालयाचे उद्घाटन देवेंद्र फडणवीस, अजित पवार, विधानसभा अध्यक्ष ॲड राहुल नार्वेकर यांची उपस्थितीत उद्घाटन सोहळा

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०४ व्या जयंतीनिमित्त अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था (आर्टी) कार्यालयाचे उद्घाटन १ ऑगस्ट २०२४ रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई येथे सकाळी ११ वाजता हा उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या …

Read More »

छत्रपती संभाजीनगर येथील प्रकल्पासाठी टोयोटा किर्लोस्करसमवेत सामंजस्य करार राज्यातील मोटार निर्मिती उद्योगात क्रांती आणणारा प्रकल्प – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

छत्रपती संभाजीनगर येथे टोयोटा किर्लोस्करच्या प्रकल्पामुळे मराठवाड्याला मोठा फायदा तर होईलच शिवाय एकूणच भारतातील मोटार वाहन निर्मिती उद्योगात देखील एक क्रांती येईल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. आज सह्याद्री अतिथिगृह येथे राज्य शासनाचा उद्योग विभाग आणि टोयोटा किर्लोस्कर यांच्यात छत्रपती संभाजीनगर येथील ऑरिक सिटीमध्ये इलेक्ट्रिक आणि हायब्रीड कार्स निर्मितीच्या ग्रीनफिल्ड …

Read More »

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आले हे महत्वाचे निर्णय अनुदान वाटपासह विविध विभागाच्या अनुषंगाने निर्णय घेतले

राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज झाली. या बैठकीला राज्याच्या विविध विभागाचे मंत्री आणि मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित होते. या बैठकीत वसतीगृहे आणि आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या दरडोई अनुदानात वाढ करण्यात आली आहे. याशिवाय नादेड येथील गुरूजी रूग्णालयाला निधी, आदीवासी सूतगिरण्यांना दिर्घ मुदतीचे कर्ज, कारागृहांच्या अत्याधुनिकीकरणासाठी निधी, जलविद्युत प्रकल्प नवीनीकरण यासह अनेक महत्वाचे …

Read More »