Breaking News

Tag Archives: अजित पवार

पीक विमा अग्रिम, पिण्याचे पाणी, चाऱ्याची व्यवस्था याविषयी मुख्यमंत्र्यांचे निर्देश कमी पावसाच्या पार्श्वभूमीवर काटेकोर नियोजन करावे

राज्यात आतापर्यंत सरासरीच्या ८१.०७ टक्के पाऊस झाला असून कमी पावसाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक ते नियोजन काटेकोरपणे करण्यात यावे असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. राज्यात १ ते ६ सप्टेंबर दरम्यान केवळ २४०५ म्हणजे सरासरी १३.६० टक्के पाऊस पडला आहे. २५७९ पैकी ४४६ महसुली भागात …

Read More »

सहकारी साखर कारखान्यांना राज्य सहकारी बँकेकडून शासन हमीवर कर्ज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

आर्थिक अडचणीतील सहकारी साखर कारखान्यांना राज्य सहकारी बँकेकडून शासन हमीवर कर्ज उपलब्ध करणार आहे. हे कर्ज अटी आणि शर्तींच्या अधीन राहून उपलब्ध करून देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या योजनेच्या अनुषंगाने सहकारी साखर कारखान्यांना त्यांच्या फेस व्हॅल्युनुसार कर्ज व तारणाचे प्रमाण …

Read More »

जिंतेंद्र आव्हाड यांची टीका, राज्य सरकारकडून मराठा समाजाची दिशाभूल सुरु सर्वसमावेशक हिंदू धर्म आम्हाला मान्य पण सनातन हिंदू धर्म मान्य नाही

मराठा समाजाला आरक्षण देण्याचा अधिकार राज्य सरकारला नाही, केवळ राज्य सरकार मराठा समाजाची दिशाभूल करत आहे. जर राज्यातील सरकारला मराठा समाजाला आरक्षण द्यायचं असेल तर त्यांनी केंद्र सरकारला लोकसभा आणि राज्यसभेमध्ये विधेयक आणायला सांगितले पाहिजे. जेणेकरून तातडीने मराठा समाजाला आरक्षण मिळू शकते अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी …

Read More »

शेतकऱ्यांना अनुदान वितरणाचा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ तीन लाख शेतकऱ्यांना ३०० कोटी रुपये अनुदान वितरीत होणार

राज्य शासनाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी १ फेब्रुवारी ते ३१ मार्च २०२३ या कालावधीत विक्री केलेल्या कांद्यासाठी ३५० रुपये प्रति क्विंटल व जास्तीत जास्त २०० क्विंटल प्रति शेतकरी याप्रमाणे अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता. या अनुदान वितरणाच्या पहिल्या टप्याचा शुभारंभ आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, …

Read More »

येरवडा आणि हवेली येथील औद्योगिक संस्थांना उपयुक्त व्यावसायिक अभ्यासक्रम सुरू करावेत- उपमुख्यमंत्री अजित पवार

पुण्यातील येरवडा येथे मान्यता देण्यात आलेल्या नवीन शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि हवेली येथील शासकीय औद्योगिक संस्थांना जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्यात येईल. पुणे येथील औद्योगिक संस्थांना उपयुक्त ठरणारे व्यावसायिक अभ्यासक्रम औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये सुरू करावेत, अशी सूचना उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार यानी दिली. मंत्रालय …

Read More »

८५ टक्के बहुजनांना ५० टक्के आणि १५ टक्क्यांना ५० टक्के आरक्षण हा कुठला न्याय ? इतर राज्यात ५० टक्यांची मर्यादा हटवली मग मराठा आरक्षणासाठीच अडचण का ? - अतुल लोंढे

मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सुटला पाहिजे ही राज्यातील सर्वच राजकीय पक्षांची अपेक्षा आहे, सत्ताधारी पक्षही तीच भाषा बोलतो पण कृती मात्र काहीच करत नाही. मराठा समाजाला आरक्षण द्यायचे असेल तर सध्या असलेली ५० टक्क्यांची आरक्षण मर्यादा काढावी लागेल, बिहार, तामिळनाडू, कर्नाटकसह इतर काही राज्यात आरक्षणाचे प्रमाण ५० टक्क्यांपेक्षा जास्त आहे …

Read More »

लाठीचार्जच्या आरोपांवरून ठाकरे-सरकारमध्ये आव्हान प्रतिआव्हान अजित पवार यांचे उद्धव ठाकरेंना आव्हान, ...तर आम्ही तिघेही राजकारण सोडू

जालन्यातील मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज झाल्यानंतर सरकार विरुद्ध विरोधक असा सामना रंगला आहे. मराठा आंदोलकांवर लाठीमार करण्याचे आदेश दिल्याचे आरोप उद्धव ठाकरे यांनी सिद्ध करावे. हे आरोप सिद्ध झाल्यास आम्ही तिघेही (एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस व अजित पवार) राजकारण सोडू असे आव्हान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले तर महाविकास आघाडीच्या कार्यकाळात …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांचे निर्देश, मराठवाड्यातील मराठा समाजास कुणबी प्रमाणपत्र द्या अपर मुख्य सचिवांच्या समितीने प्राधान्याने महिन्याभरात अहवाल सादर करावा

मराठवाड्यातील मराठा समाजास कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी प्रक्रिया करण्याकरिता नेमलेल्या अपर मुख्य सचिवांच्या समितीने तातडीने कार्यवाही करून महिनाभरात अंतिम अहवाल द्यावा, या कामी सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. मराठा आरक्षण व समाजाला सुविधा देण्यासाठी नेमलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या उपसमितीची बैठक आज सह्याद्री अतिथगृह येथे झाली. उपमुख्यमंत्री देवेंद्र …

Read More »

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील म्हणाले, ….आरक्षणाचा जीआर घेऊन या शिंदे-फडणवीस-पवार सरकारचे शिष्टमंडळ जाणार जरांगे पाटील यांच्या भेटीला

मराठा आरक्षणाचा जीआर घेवून या चर्चेची दारं खुली केलीत म्हणून तुम्ही मागचे पाढे वाचू नका असे सांगत मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारच्या उपसमितीच्या बैठकीत झालेल्या निर्णयावर त्यांनी आपली प्रतिक्रीया माध्यमाशी बोलताना व्यक्त केली. शुक्रवारी जालना येथील आंदोलकांवर लाठीमार केल्यानंतर राज्यात वातावरण चांगलेच तापले. राज्यात ठिकठिकाणी सकल मराठा …

Read More »

संजय राऊत यांची खोचक टीका, राज्यात तीन जनरल डायर मराठा आरक्षण आंदोलकांवर झालेल्या हल्यावरून संजय राऊत यांची शिंदे-फडणवीस-पवार यांच्यावर टीकास्त्र

जालन्यातील अंबड तालुक्यातील मराठा समाजाच्या आरक्षणप्रश्नी आंदोलन करत असलेल्या आंदोलकांवर पोलिसांनी बेछूट लाठीमार केला. त्यात अनेक निष्पाप नागरिक गंभीररित्या जखमी झाले. मात्र त्यानंतरही राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सदर ठिकाणी भेट देण्याचे सोडा तेथील घटनेची माहिती घेण्याचेही टाळले. त्यातच पोलिसांना मुंबईतून फोन …

Read More »