Breaking News

Tag Archives: अजित पवार

त्या टीकेवर महेश तपासे म्हणाले, शरद पवारांवर टीका करणे ही राजकीय फॅशन पवार साहेबांनी मोठे केलेले लोक ऋण विसरले मात्र जनता पवार साहेबांसोबत

महाराष्ट्रातल्या नगर जिल्ह्यात दलित तरुणांना झाडावर उलट टांगून मारहाण केली या घटनेचा साधा निषेध ही बीडच्या सभेमध्ये जमलेल्या मंत्र्यांनी केला नाही याची खंत पवार गटाचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी बोलून दाखवली. राज्यातल्या नेते मंडळींना राज्यात वाढत चाललेल्या असहिष्णुतेच्या घटना दिसत नाहीत हे दुर्दैव आहे अशी प्रतिक्रियाही व्यक्त केली. पुढे …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांचे टीकास्त्र, आम्ही असा काही करंट दिला की…. शासन आपल्या दारी कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांच्यावर केली टीका

परभणी जिल्ह्यात आज शासन आपल्या दारी या कार्यक्रमाच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नेहमीप्रमाणे उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडताना म्हणाले की, देश चंद्रावर जात आहे. मात्र काहीजण घरात बसून राज्य चालवित होते असा उपरोधिक टोला …

Read More »

उद्धव ठाकरे यांचे टीकास्त्र, शासन आपल्या दारी थापा मारतय भारी… देवेंद्र फडणवीस यांना काही म्हणणार नाही, नाही तर उगीच बोभाटा होतो

राज्यात सध्या निवडणूकांचे वारे वहात आहेत. तसेच शिवसेनेतील फुटीनंतर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या पक्षसंघटनेच्या बांधणीच्या निमित्ताने सध्या मराठवाडा दौऱ्याच्या निमित्ताने हिंगोली येथे आलेले शिवसेना ठाकरे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपावर टीकास्त्र सोडले. यावेळी उद्धव ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस-पवार सरकारवर टीका …

Read More »

सुनिल तटकरे यांची स्पष्टोक्ती, अजित पवार यांची बीड येथे उत्तरदायित्व सभा होणारच… उद्याच्या सभेनंतर राज्यव्यापी दौरा करणार

बीडमधील प्रभू वैजनाथाच्या चरणी नतमस्तक होऊन राज्यातील जनतेसमोर संवाद साधण्यासाठी बीड येथे जाहीर सभेचे आयोजन केले आहे. ही उत्तरदायित्वाची सभा आहे. लोकांचे आम्ही उत्तरदायित्व मानत आलो आहे त्यामुळे आम्ही घेतलेली भूमिका व करायचे काम आणि ध्येयधोरणे याची स्पष्टता व्हावी. राज्यभर जे काही दौरे पुढच्या कालावधीत करणार आहोत त्या दौऱ्याची सुरुवात …

Read More »

शरद पवार यांची स्पष्टोक्ती, अजित पवार… पक्षाचे नेते, तर अजित दादा म्हणाले, नो कॉमेंटस.. अजित पवार यांच्या पक्षातून बाहेर जाण्याच्या मुद्यावरून शरद पवार यांचे स्पष्ट मत

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक तथा पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा खरा वारसदार सुप्रिया सुळे की अजित पवार यावरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये संदोपसंदी सुरु झालेली असतानाच अजित पवार यांनी आपल्या काही समर्थकांना सोबत घेत भाजपाप्रणित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी झाले. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडल्याची चर्चा सुरु झाली. …

Read More »

नाना पटोले यांचा अंदाज, अजित पवारांचे मन वळवण्यात शरद पवारांना यश… शरद पवारांबद्दल काँग्रेस व उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत संभ्रम नाही

शरद पवार हे ज्येष्ठ व अनुभवी नेते आहेत, अजित पवारांनी त्यांच्याशी घेतलेल्या भेटीनंतर परत यावे असे अजित पवारांना वाटत असावे. अजित पवारांचे मन वळवण्यात शरद पवार यांनाही यश आले असावे असेच शरद पवार यांच्या विधानावरून दिसत आहे, त्यामुळे अजित पवार पुन्हा स्वगृही परततील असे चित्र दिसत आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष …

Read More »

अतुल लोंढे यांचा टोला, अजित पवार रिर्टन्स पार्ट-२ पहायला मिळेल शरद पवार, सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्यावरून काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांचा टोला

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या विधानावरून राजकीय चर्चा सुरु झाली आहे. शरद पवार यांच्या विधानाचा सरळसरळ अर्थ असा लावला जाऊ शकतो की महाराष्ट्राला व देशाला अजित पवार रिर्टन्स पार्ट-२ पहायला मिळू शकतो, असा टोला प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांना …

Read More »

अनधिकृत लॉटरी, बोगस विक्रेत्यांवर कडक कारवाई करणार उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

महाराष्ट्रात इतर राज्यातील लॉटरीची अनधिकृतपणे विक्री करणाऱ्यांवर तसेच बोगस तिकीट विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री तथा अर्थ मंत्री अजित पवार यांनी दिले. राज्य लॉटरीच्या आढावा बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते. यावेळी वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, लेखा व कोषागार विभागाचे अपर मुख्य सचिव आशिष कुमार …

Read More »

जि प शाळांच्या इमारतींत अंगणवाडी खोल्या वापरण्याबाबत धोरण तयार करा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

राज्यातील अनेक अंगणवाड्या भाड्याने घेतलेल्या खोल्यांमध्ये चालविल्या जात आहेत. अंगणवाड्यांना स्वमालकीच्या इमारती असण्याबरोबरच वीज, पाणी आदी पायाभूत सुविधा दिल्या पाहिजेत. याअनुषंगाने ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांच्या इमारतींमध्ये मोकळ्या राहणाऱ्या वर्गखोल्या अंगणवाडीच्या बालकांसाठी वापरण्याबाबत धोरण तयार करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. महिला व बाल विकास विभागाच्या विविध प्रश्नांसंदर्भात उपमुख्यमंत्री …

Read More »

अजित पवार यांचे निर्देश, १ ट्रिलियन अर्थ व्यवस्थेसाठी जिल्हा केंद्र मानून विकासयोजना महाराष्ट्र आर्थिक सल्लागार परिषदेसंदर्भातील बैठकीत

राज्याची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलर करण्याचे उद्द‍िष्ट २०२८ पर्यंत पूर्ण करायचे असेल, तर मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, पालघर या जिल्ह्यांच्या बरोबरीने सर्वच विभागातील जिल्ह्यांचा सर्वसमावेशक विकास करावा लागेल. कृषी, कृषीपूरक उद्योग, ऊर्जा, पायाभूत सुविधा, दळण-वळण, गृहनिर्माण, मध्यम व लघुउद्योग, कौशल्य विकास, उत्पादन, सेवा आदी महत्वाच्या क्षेत्रांमध्ये कार्यविस्तार करुन विकासाच्या नवीन …

Read More »