Breaking News

Tag Archives: आदिती तटकरे

केंद्र व राज्य शासनाच्या महिलांकरिता असलेल्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणार मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान माध्यमातून महिलांच्या योजना प्रभावीपणे राबवणार

महिलांना संघटीत करणे, प्रशिक्षित करणे, स्वावलंबी करणे, महिलासंदर्भातील शासकीय योजना लोकाभिमुख करुन त्यांची अंमलबजावणी करणे, सर्व शासकीय यंत्रणांचे प्रतिनिधी एकत्र येऊन योजनांचे लाभ लाभार्थ्यांना देणे या उद्देशाने सर्व जिल्ह्यांमध्ये २ ऑक्टोबर, २०२३ ते १ ऑक्टोबर, २०२४ या कालावधीत राज्यामध्ये मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री …

Read More »

महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी प्रयत्नशील लोरियल इंडिया व माविम यांच्यात सामंजस्य करार

लोरियल इंडिया व महिला व आर्थिक विकास महामंडळ (माविम) यांच्यातील सामंजस्य करारामुळे महिलांची आर्थिक उन्नती होणार असून महिला आर्थिक विकास महामंडळाच्या बचतगटांना प्रदेशनिहाय शेतीमधील विविधता लक्षात घेऊन विविध स्टेक होल्डर व ‘माविम’ यांच्या समन्वयाने प्रशिक्षण देणार असल्याचे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले. कफ परेड येथील हॉटेल प्रेसिडेंट …

Read More »

जि प शाळांच्या इमारतींत अंगणवाडी खोल्या वापरण्याबाबत धोरण तयार करा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

राज्यातील अनेक अंगणवाड्या भाड्याने घेतलेल्या खोल्यांमध्ये चालविल्या जात आहेत. अंगणवाड्यांना स्वमालकीच्या इमारती असण्याबरोबरच वीज, पाणी आदी पायाभूत सुविधा दिल्या पाहिजेत. याअनुषंगाने ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांच्या इमारतींमध्ये मोकळ्या राहणाऱ्या वर्गखोल्या अंगणवाडीच्या बालकांसाठी वापरण्याबाबत धोरण तयार करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. महिला व बाल विकास विभागाच्या विविध प्रश्नांसंदर्भात उपमुख्यमंत्री …

Read More »

नागरी, ग्रामीण व आदिवासी क्षेत्रांतील अंगणवाडी केंद्रांच्या इमारतींसाठी भाडेवाढ महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची माहिती

केंद्र पुरस्कृत एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत नागरी, ग्रामीण व आदिवासी क्षेत्रांतील अंगणवाडी केंद्र इमारतींसाठी भाडेवाढ करण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतला आहे. ग्रामीण, आदिवासी क्षेत्रांत दोन हजार रुपये, नागरी क्षेत्रांमध्ये (नगरपालिका, नगर परिषद, नगरपंचायत, महानगरपालिका) सहा हजार रुपये, महानगर (Metropolitan) क्षेत्रांमध्ये आठ हजार रुपये दरमहा वाढ करण्यात आली आहे, अशी …

Read More »

महिलांच्या विकासासाठी संयुक्त राष्ट्र संघाच्या परिषदेसमवेत सामंजस्य करार करणार महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची माहिती

राज्यातील महिलांच्या विकासासाठी संयुक्त राष्ट्र संघाच्या महिला परिषदेसमवेत राबविण्यात येणाऱ्या योजनांबाबत लवकरच एक कृती आराखडा तयार करून सामंजस्य करार करणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. मंत्रालयात संयुक्त राष्ट्रसंघाच्या महिला परिषदेच्या प्रतिनिधींसमवेत आयोजित बैठकीत महिला व बालविकास मंत्री कु. तटकरे बोलत होत्या. यावेळी महिला व बालविकास …

Read More »

राज्यात पाळणाघर योजनेबाबत लवकरच धोरणात्मक निर्णय घेणार महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांचे आश्वासन

पाळणाघर योजनेबाबत राज्य शासनाची नियमावली तयार करण्यासाठी तसेच ही योजना राबविताना शासकीय, अशासकीय संस्थांचेही मत विचारात घेण्यात येणार आहे. याबाबत शालेय शिक्षण, कामगार, गृह आणि महिला व बालविकास विभागाची संयुक्त बैठक घेणार असून चौथ्या महिला धोरणात पाळणाघराबाबत निर्णयाचा समावेश करणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. …

Read More »

बालगृहांच्या सुरक्षेसाठी बायोमेट्रिक आणि सीसीटीव्ही कॅमेरे तातडीने कार्यान्वित करा महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांचे निर्देश

बालगृहांमधील बालकांच्या सुरक्षेसाठी एका महिन्यात बायोमेट्रिक प्रणाली आणि सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करावेत. बालकांना देण्यात येणाऱ्या अन्न, सुरक्षा आणि स्वच्छतेबाबतचा अहवाल दर तीन महिन्यांनी सादर करण्याचे निर्देश महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले. राज्यातील बालगृहे, विशेष गृहे, खुले निवारा गृह, बालकांसाठी सुरक्षित ठिकाण, अनुरक्षणगृहे याबाबत आज मंत्रालयात आढावा बैठकीचे …

Read More »

जयंत पाटील यांनी स्पष्टच सांगितले; काही काळ त्यांच्यासाठी थांबू, मात्र विशिष्ट कालावधीनंतर… त्या ९ आमदार वगळता इतरांसाठी पक्षाची दारे खुले

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार यांनी बंडाळी करत शरद पवार यांचे निकवर्तीय म्हणून ओळखले जाणारे छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, अनिल पाटील, धर्मराव आत्राम यांना सोबत नेत थेट मंत्री पदाची शपथ दिली. याशिवाय प्रफुल पटेल, सुनिल तटकरे यांची कन्या आदिती तटकरे, संजय बन्सोड, धनंजय मुंडे यांना हे अजित पवार समर्थक म्हणून ओळखले …

Read More »

राष्ट्रवादीतील राजकिय भूकंपात अजित पवार यांना ‘या’ नेत्यांनी दिली साथ मुख्यमंत्री शिंदेंकडील आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडील खात्यांचा भार हलका

राज्यातील सत्ता हस्तगत करण्यासाठी शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाविरोधात एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंडखोरी केली. त्यापाठोपाठ १३ खासदारही ठाकरे यांना सोडून शिंदे यांच्यासोबत गेले. आता तशीच काहीशी पुर्नरावृत्ती राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घडवून आणण्यात भाजपाला यश आल्याचे दिसून येत आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरी पाठोपाठ आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही अजित पवार …

Read More »