Breaking News

Tag Archives: आयएएस अधिकारी

मुख्यमंत्री शिंदे यांचे आवाहन, केवळ फोटोपुरते योग न करता… रोज करा योग, नियमित रहा निरोग

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योगाला जगभर प्रसिद्धी मिळवून दिली. त्यातूनच २१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन जगभरात साजरा केला जात आहे. केवळ फोटोपुरते योग न करता योग हा आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक मानून रोज योग करून निरोग राहण्याचे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. गेट वे ऑफ इंडिया येथे मुंबई …

Read More »

तुकाराम मुंढे यांच्याकडे आता असंघटीत कामगारः वर्षभरात पुन्हा बदली राज्यातील सात सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

मागील काही वर्षापासून सततच्या बदल्यांमुळे चर्चेत असलेले सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांची मंगळवारी पशुसंवर्धन आणि दुग्धविकास विभागाच्या सचिव पदावरून बदली करण्यात आली. वर्षभरात बदली झालेले तुकाराम मुंढे यांना असंघटित कामगार विभागाच्या आयुक्तपदी नियुक्त करण्यात आले आहे. राज्याच्या कुटुंब कल्याण आणि सार्वजनिक आरोग्य विभागाचे आयुक्त म्हणून अमगोथु श्री रंगा नायक यांची …

Read More »

मंत्रालयातील आयएएस दांपत्याच्या तरूण मुलीने केली आत्महत्या इमारतीच्या १० व्या मजल्याववरून रात्री ३ वाजता उडी मारून आत्महत्या

मंत्रालयात सनदी अधिकारी असलेल्या पती पत्नी अधिकाऱ्यांच्या २६ वर्षीय मुलीने पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास राहत्या इमारतीच्या १० व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज घडली. इतक्या रात्री पहाटे तीन वाजता इमारतीच्या १० व्या मजल्यावरून आत्महत्या करण्याचे काय, इतक्या मध्यरात्री असे काय घडले की, मुलीने आत्महत्या केली अशी चर्चा …

Read More »

इक्बाल सिंह चहल थेट मुख्यमंत्री कार्यालयातः आदित्य ठाकरे यांची टीका

लोकसभा निवडणूकीची आचारसंहिता जाहिर होताच निवडणूक आयोगाने ज्या अधिकाऱ्यांना तीन वर्षे पूर्ण झाले आहेत अशा अधिकाऱ्यांची बदली करण्याचे आदेश दिले. परंतु राज्य सरकारने राज्यातील इतर अधिकाऱ्यांच्या ऐवजी मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांना महानगरपालिकेच्या पदावर कायम ठेवण्यासाठी आपल्या अधिकाराचा वापर सुरु केला. मात्र अखेर केंद्रीय निवडणूक आयोगाकडून इक्बालसिंह चहल यांची …

Read More »

निवडणूक आयोगाचे सरकारला आदेशः राजकीय नेत्यांचे फोटो तातडीने हटवा

देशातील लोकसभा निवडणूकीचा कार्यक्रम आणि त्यासाठीची आचारसंहिता लागू होण्यास काही दिवसांचा अवधी शिल्लक राहिला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मार्गदर्शक तत्वे जाहिर करण्यात येत आहेत. त्या अनुषंगाने महाराष्ट्रातील निवडणूक मुख्याधिकारी यांनी राज्य सरकारला आदेश बजावत राज्य सरकारच्या मालकीच्या विविध संकेतस्थळावरील राजकिय नेत्यांचे फोटो तात्काळ आणि विनाविलंब हटविण्याचे आदेश राज्याच्या …

Read More »

राज्यातील १२ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

देशातील लोकसभा निवडणूकांच्या आचारसंहिता लागू करण्याचा कालावधी जसजसा जवळ येत आहे. तसतसे राज्यातील आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्याचे प्रमाण वाढू लागले आहे. काल केंद्रिय निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार ज्या आयएएस अधिकाऱ्यांची सेवा एकाच पदावर तीन वर्षाहून अधिक काळ झाले आहेत, अशा सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचे आदेश राज्य सरकारला दिले होते. त्यानुसार मुंबई …

Read More »

राज ठाकरे यांची स्पष्टोक्ती, व्याभिचारी तडजोड… आयएएस अधिकारीच म्हणतात तो टेम्पररी मुख्यमंत्री मी परमंट

राज्यात एकीकडे मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटपावरून नाट्यमय राजकीय घडामोडी सुरू असताना मनसे प्रमुख राज ठाकरे चिपळूणच्या दौऱ्यावर आहेत. चिपळूणमध्ये राज ठाकरे यांनी अपेक्षेप्रमाणे सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. यावेळी राज्यातील राजकीय घडामोडींवर भाष्य करताना त्याचा उल्लेख व्याभिचारी तडजोड असा करत जोरदार टीकास्त्र सोडले. तुमच्या मनात महाराष्ट्राबद्दलचा जो राग आहे तो तुमच्या मनातून …

Read More »