Breaking News

Tag Archives: इंडिया आघाडी

मल्लिकार्जून खर्गे यांची टीका, जनादेशाचा पंतप्रधान मोदींवर कोणताही परिणाम नाही… इंडिया आघाडीने संसदेच्या प्रवेशद्वारापासून काढला राज्यघटना वाचवा मोर्चा

केंद्रात एनडीएचे सरकार स्थानापन्न झाल्यानंतर बहुमत सिध्द करण्यासाठी आणि केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यासाठी आयोजित पहिल्याच संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली. सत्ताधारी एनडीएच्या खासदारांना प्रोटेम अध्यक्ष भर्तहरी महताब यांनी खासदारकीची शपथ दिली. लोकसभेचे कामकाज सुरु होण्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिले अधिवेशन सुरू होण्यापूर्वी प्रसारमाध्यमांना संबोधित केले आणि सांगितले की, जनतेने …

Read More »

संसद अधिवेशनाला सुरुवात, खासदारांचा शपथविधी, इंडिया आघाडीचा विरोध इंडिया आघाडीकडून संसदेच्या प्रांगणात राज्यघटनेची प्रत घेऊन निदर्शने

केंद्रातील एनडीए सरकारच्या सत्ता स्थापनेनंतर पहिल्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली. आज सकाळी अधिवेशाला सुरुवात झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेच्या बाहेर औपचारिक मनोगत व्यक्त केले. त्यानंतर संसदेच्या कामकाजाला सुरुवात झाली. यावेळी केंद्रीय मंत्रिमंडळात समाविष्ट असलेल्या खासदारांचा पहिल्यांदा शपथविधी पार पडला. मात्र केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना खाजदारकीची शपथ …

Read More »

लोकसभेचे उपसभापती पद न दिल्यास इंडिया आघाडी निवडणूक लढविणार एनडीए सरकारवर दबाव आणण्यासाठी आघाडीची रणनीती

लोकसभा निवडणूकीत एनडीए आघाडीला पूर्ण बहुमत मिळाले. त्यानंतर आता बहुमत सिध्द करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारकडून पावसाळी अधिवेशन बोलावले असून या पावसाळी अधिवेशनातच सभापती आणि लोकसभेच्या उपसभापती पदावरील निवड करण्यात येणार आहे. परंपरेने सभापती पदावर केंद्रातील सरकारकडे असते, तर उपसभापती विरोधी पक्षांना देण्यात येते. मात्र जर उपसभापती …

Read More »

प्रकाश आंबेडकर यांचा आरोप, त्यांना केवळ बहुजनांची मते हवीत इंडिया आघाडीवर साधला निशाणा

त्यांना केवळ बहुजनांची मते हवी होती आणखी काही नाही. INDIA आघाडीला संसदेमध्ये स्वतंत्र बहुजनांचे नेतृत्वच नको होते. त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांचा वापर केला आणि आमचे तत्वज्ञान हायजॅक केल्याची टीका वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून केली. प्रकाश आंबेडकर पुढे बोलताना म्हणाले की, हे तेच पक्ष आहेत, ज्यांनी सर्वांत …

Read More »

संजय राऊत म्हणाले, चंद्राबाबू – नितीशकुमार आज त्यांच्यासोबत तर उद्या आमच्यासोबत एनडीएसोबत सरकारमध्ये सामील होण्यावरून संजय राऊत यांचे भाजपावर टीकास्त्र

लोकसभा निवडणूकीनंतर सर्वाधिक संख्याबळ असलेल्या भाजपा आणि एनडीएच्या खासदारांची आज संसदेच्या सभागृहात बैठक झाली. या बैठकीत एनडीएचे लोकसभेतील सभागृह नेते म्हणून खासदार नरेंद्र मोदी यांची आज एकमताने निवड करण्यात आली. या पार्श्वभूमीवर शिवसेना उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांनी मोठी प्रतिक्रिया व्यक्त करत म्हणाले की, चंद्राबाबू नायडू आणि नितीशकुमार हे …

Read More »

शरद पवार यांची स्पष्टोक्ती, टीडीपी- जेडीयूशी संपर्क साधण्याबाबत कोणतीही चर्चा नाही इंडिया आघाडीकडून अद्याप सरकार स्थापनेबाबत चर्चा नाही

लोकसभा निवडणूकीचे निकाल नुकतेच जाहिर झाले. या निकालाने एनडीएला बहुमत दिलेले असले तरी भाजपाचे संख्याबळ कमी झाले आहे. तर संपूर्ण इंडिया आघाडीला २३५ जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे इंडिया आघाडीला केंद्रातील सरकार स्थापन करण्यासाठी आणखी दोन-तीन मित्र पक्षांची आवश्यकता आहे. यापार्श्वभूमीवर आज इंडिया आघाडीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. यापार्श्वभूमीवर भाजपाच्या …

Read More »

एक्झिट पोलचे अंदाज आणि प्रत्यक्ष मतमोजणीतील निकालाचा परिणाम शेअर बाजारावर भाजपाबाबत अपेक्षा वाढवून ठेवल्याने शेअर बाजार ६ हजार अंशाने गडगडला

बीएसई सेन्सेक्सने त्याची घसरण ६,१०० अंकांपर्यंत वाढवल्याने शेअर बाजारातील गुंतवणूकदार खचले आहेत. गुंतवणूकदारांना भीती वाटते की भाजपा २७२ चे स्पष्ट बहुमत मिळवण्यात अपयशी ठरू शकते आणि एनडीएच्या मित्रपक्षांसोबत सत्तेत आल्यास राजकीय प्रभाव सोडावा लागेल. टीम NDA सध्या २९७ जागांसह आघाडीवर आहे, ३५०-अधिक जागा जिंकण्यापेक्षा खूपच कमी, काही प्रकरणांमध्ये ४००-अधिक, एका …

Read More »

मल्लिकार्जून खर्गे यांचा सवाल, स्ट्रॅटेजी कशी जाहिर करणार आम्ही उद्या सर्वांशी चर्चा करून निर्णय जाहीर करू

लोकसभा निवडणूकीच्या मतमोजणीला सुरुवात होणार असल्याच्या एक दिवस आधी इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या झालेल्या बैठकीत चर्चा करून एक्झिट पोलचे आकडे खोटे असल्याचा दावा काँग्रेसकडून करण्यात आला. तसेच २९३ जागा इंडिया आघाडीला मिळणार असल्याची घोषणाही त्यावेळी करण्यात आली. मात्र आज सकाळपासून मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर त्यानंतर भाजपा प्रणित एनडीला मिळालेल्या लोकसभेच्या जागा आणि …

Read More »

भाजपा बहुमतापासून दूरः नितीशकुमार, चंद्राबाबू नायडू इंडिया आघाडीचे किंगमेकर? सत्तास्थापनेसाठी इंडिया आघाडीकडून पत्ते पिसायला सुरुवात

लोकसभा निवडणूकीच्या मतमोजणीला आज सकाळी सुरुवात झाली. महाराष्ट्रासह, उत्तर प्रदेश आणि इतर हिंदी भाषिक राज्यांमध्ये इंडिया आघाडी आणि घटकपक्षांना मतदारांना चांगल्यापैकी प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून आले. मात्र ज्या भाजापाने ४०० पारचा नारा दिला होता. त्या भाजपाला ४०० काय आता २५० जागा मिळणेही अवघड होऊन बसला आहे. तर इंडिया आघाडीच्या विजयी …

Read More »

लोकसभा निवडणूकीच्या निकालात इंडिया आघाडीने एनडीएचा कल तोडला अनेक राज्यात एनडीए पिछाडीवर, उत्तर प्रदेशात मोदींचा लीड घटला

लोकसभा निवडणूक २०२४ साठी सात टप्प्यात मतदान पार पडल्यानंतर जाहिर करण्यात आलेल्या एक्झिट पोलमध्ये भाजपा प्रणित एनडीए आघाडीला बहुमत मिळणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. तसेच तिसऱ्यांदा भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीए बहुमतात येईल आणि पंतप्रधान पदी नरेंद्र मोदी हेच तिसऱ्यांदा विराजमान होतील असाही अंदाज व्यक्त करण्यात येत होता. …

Read More »