Breaking News

Tag Archives: इस्त्रायल

अखेर बेंजामिन नेत्यानाहु यांनी मागितली माफी पत्रकार परिषद घेत मागितली माफी

इस्त्रायलवर हमासने हल्ला केल्यानंतर जगभरातून आणि इस्त्रायलमधूनही त्यावेळी इस्त्रायलची सेना आणि गुप्तचर संस्था काय करत होती असा सवाल उपस्थित केला. त्यानंतर इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहु यांनी आपल्याच देशाच्या गुप्तचर यंत्रणा आणि सेना अधिकाऱ्यांवर टीकेची तोफ डागली होती. मात्र आज बेंजामिन नेत्यानाहु यांनी पत्रकार परिषद घेत अखेर आपल्याच देशाच्या सैन्याची आणि …

Read More »

गाझातील मानवी मुल्यांच्या प्रस्तावावरील मतदानावेळी भारत युनोत गैरहजर हमास हल्ल्याचा उल्लेख न केल्याने आमसभेत गैरहजर राहिल्याचा दावा

सध्या मध्य पूर्वेत हमास आणि इस्त्रायल दरम्यान उडालेल्या युध्दाच्या भडक्याने आंतराराष्ट्रीयस्तरावर सरळ सरळ दोन तट पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यातच या युध्दाच्या मुद्यावरून युनोच्या आमसभेच्या मतदानावेळी भारत सरकार गैरहजर राहिला. भारत सरकारने गैरहजर राहण्याचे समर्थन करताना मानवीदृष्टीकोनातून युध्दबंदीचा प्रस्ताव या सभेत आणण्यात आला नाही. उलट ७ ऑक्टोंबर रोजी हमास …

Read More »

मध्य पूर्वेतील युध्द आणि चीन, युक्रेनची अमेरिकेविरोधात वाढणारी भीती अमेरिकेचा युक्रेन आणि इस्त्रायलला पाठिंबा पण भविष्यातील भूमिकेवरून साशंक

मध्य पूर्वेतील हमासने इस्त्रायलवर केलेल्या हल्ल्यानंतर अमेरिकेने इस्त्रायलच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बीडेन यांनी घेतला. तसेच इस्त्रायचे पंतप्रधान बेंजामीन नेत्यान्याहू यांची भेट घेऊन अमेरिकेकडून मदत देण्याचे आश्वासनही दिले. त्यातच अमेरिकेने रशियाचा विरोधक युक्रेन आणि चीनचा विरोधक तैवानला शस्त्रात्रांची मदत देण्यास सुरुवात केल्याने आणि शस्त्रास्त्र पुरवठ्यासाठी या देशांनी …

Read More »

एअर इंडियाने तेल अवीवची उड्डाणे १४ ऑक्टोबरपर्यंत रद्द केली हमासच्या हल्ल्यानंतर एअर इंडियाचा निर्णय

हमासच्या दहशतवाद्यांनी शनिवारी इस्रायलमधील तेल अवीववर हल्ला केल्यानंतर एअर इंडियाने १४ ऑक्टोबरपर्यंत तेथील सर्व उड्डाणे रद्द केली आहेत. कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले की, प्रवासी आणि क्रू मेंबर्सच्या सुरक्षेचा विचार करून एअर इंडियाने तेथील सर्व उड्डाणे रद्द केली आहेत. तेथून १४ ऑक्टोबरपर्यंत रद्द करण्यात आली आहे. एअर इंडियाच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, ज्या …

Read More »

इस्रायलवर हमासच्या हल्ल्यामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ भारतातही सणासुदीच्या काळात पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढू शकतात

हमासच्या इस्रायलवरील हल्ल्यानंतर त्याचा पहिला परिणाम दिसून आला. सणासुदीच्या आधी सर्वसामान्यांच्या खिशावर भार पडणार आहे. इस्रायलवर हमासच्या हल्ल्यानंतर तीन दिवसांनी कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी उसळी पाहायला मिळाली. या किमती स्थिर न राहिल्यास पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी वाढ होणार आहे. इस्रायलवर हमास दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याच्या तिसऱ्या दिवशी तेलाच्या किमती ५ …

Read More »

पार्टी सुरू असतानाच हमासचे सैनिक इस्त्रायलच्या भूमीवर, गोळाबारात अनेकजण जखमी तर इस्त्रायलने केला हमासच्या गुप्तचर संस्थेच्या मुख्यालयावरील हल्ल्याचा व्हिडिओ

पॅलेस्टाईनच्या हमास या लष्कराने शनिवारी इस्त्रायलवर मोठ्या प्रमाणावर रॉकेट हल्ले केले. त्या हल्ल्यात आज रविवारीही सातत्य ठेवले. विशेष म्हणजे यावेळी रॉकेट हल्ले करत हमासचे सैन्य पॅराशूटच्या माध्यमातून इस्त्रायली भूमीवर उतरून इस्त्रायली नागरिकांवर गोळीबार करत आहेत. तर अनेक तरूणींचे अपहरण करून त्यांची अर्धनग्न धिंड काढण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे काही व्हिडिओ …

Read More »

इस्त्रायलने केली पॅलेस्टाईन विरोधात यु़ध्दाची घोषणा गाझा पट्टीत पॅलेस्टाईनकडून क्षेपणास्त्र डागल्याने युध्दाला सुरुवात

मागील काही महिन्यांपासून इस्त्रालयचे पंतप्रधान बेंज्यामिन नेत्यान्याहू यांच्या विरोधात वातावरण तापलेलं होतं. त्यामुळे नेत्यान्याहू यांना जनतेच्या रोषासमोर कायद्यातील बदलाच्या तरतूदींबाबत माघार घ्यावी लागणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र त्यातच पॅलेस्टाईनच्या हमास या लष्करी यंत्रणेकडून गाझापट्टीत अनेक क्षेपणास्त्र माऱ्यास सुरुवात केल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे बेंज्यामिन नेत्यानाहू यांनी इस्त्रायलही या …

Read More »