Breaking News

Tag Archives: उपमुख्यमंत्री

आठच दिवसात राज्य सरकारकडून ५ हजार कोटी रूपयांचे पुन्हा कर्ज रोखे दहा वर्षे आणि ११ वर्षाचे अनुक्रमे प्रति २ हजार ५०० कोटींचे कर्जरोखे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्या पाठीशी असलेल्या महाशक्तीच्या जोरावर राज्यातील सरकार कायदेशीर की बेकायदेशीर या वादात आहे. या सरकारच्या अर्थनीतीमुळे महाराष्ट्राच्या तिजोरीवर चांगलीच गळती लागल्याचे दिसून येत असून आठ दिवसाच्या अंतराने पुन्हा एकदा राज्य सरकारकडून निधी उपलब्ध करण्यासाठी तब्बल ५ हजार कोटी रूपयांचे कर्ज …

Read More »

अजित पवार यांनी स्पष्टच केले, ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता… राज्यात जातीनिहाय जनगणना करा

ओबीसी समाजाला आणि अनुसूचित जाती-जमातीसह सध्या ६२ टक्के आरक्षण असून मराठा समाजाला उरलेल्या ३८ टक्क्यांमध्ये आरक्षण देण्याबाबत अभ्यास सुरू आहे. मात्र, ओबीसीमधील आरक्षणाला धक्का न लावता आणि न्यायालयात टिकणारे आरक्षण देणार असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. उपमुख्यमंत्री अजित पवार आज सोलापूर दौऱ्यावर होते. माढा तालुक्यातील विठ्ठलराव शिंदे साखर …

Read More »

देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती, ओबीसी जनगणनेला विरोध नाही… ओबीसी जनगणनेच्या मागणीला विरोध नाही

ओबीसी जनगणनेच्या मागणीला आमचा विरोध नाही. याबाबतची भूमिका आम्ही आधीच स्पष्ट केली आहे. मराठा आरक्षणाबाबत टिकणारे आरक्षण देण्याची भूमिका सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले. नागपूर विमानतळावर आगमन झाले असता ते पत्रकारांशी बोलत होते. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ओबीसी जनगणनेच्या …

Read More »

ट्विट करत रोहित पवार यांचा देवेंद्र फडणवीस यांना टोला, राजकारणापायी…. निधी वाटपावरून साधला निशाणा

राज्यात शिवसेनेतील एकनाथ शिंदे यांच्यापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस मधील अजित पवार गटानेही भाजपाच्या सोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार अजित पवार हे सत्तेत सहभागीही झाले. मात्र अजित पवार हे जरी राज्याचे गृहमंत्री असले तरी त्यांना पूर्ण अधिकार अद्यापही दिले नसल्याचे आता स्पष्ट होत आहे. याच मुद्यावरून शरद पवार समर्थक रोहित पाटील यांनी …

Read More »

सुप्रिया सुळे म्हणाल्या, ज्या मंत्र्यांनी निर्णय घेतला त्यांच्याच बरोबर सत्ता उपभोगायची… राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर झेपत नसेल तर त्यांनी देशाच्या गृहमंत्र्यांना सांगावं

भारतीय जनता पक्षाबद्दल हसावं आणि त्यांच्या या केविलवाण्या प्रयत्न बद्दल काय बोलावं हा प्रश्न मला पडला आहे. माझी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनम्र विनंती आहे की, आपण सगळ्या वृत्तवाहिन्यांवर पाहतच असाल. राज्यात अनेक ठिकाणी आंदोलन सुरू आहेत. या आंदोलनाचा परिणाम तेथील सामान्य नागरिकांवर होत आहे. अनेक ठिकाणी …

Read More »

आशियाई क्रीडा स्पर्धेत पदकविजेत्या राज्यातील खेळाडूंच्या रक्कमेत दहापट वाढ क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांची माहिती

राज्याचे नाव उज्ज्वल केलेल्या राज्यातील खेळाडूंना व त्यांच्या मार्गदर्शकांना प्रोत्साहनपर बक्षीस देऊन त्यांचा गौरव करण्यासाठी आशियाई क्रीडा स्पर्धेतील(एशियन गेम्स) पदक विजेते खेळाडू आणि मार्गदर्शकांना देण्यात येणाऱ्या पारितोषिक रकमेत दहापट वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असल्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी सांगितले. मंत्री संजय बनसोडे म्हणाले की, …

Read More »

नाना पटोले यांचा टोला,…एकनाथ शिंदे, अजित पवारांना माफी मागायला सांगा शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी, उद्योग राज्याबाहेर घालवण्याचे पाप भाजपाचेच

देवेंद्र फडणवीस व भाजपा यांनीच राज्यातील तरुणांना नोकऱ्यांपासून वंचित ठेवले आहे. राज्यात येणारे प्रकल्प गुजरातला पळवले आणि सरकारी नोकर भरतीचा खेळखंडोबा करुन तरुणांचे आयुष्य बरबाद केले आहे. त्यामुळे ही आंदोलनाची नौटंकी बंद करून भाजपा व देवेंद्र फडणवीस यांनीच महाराष्ट्राची नाक घासून माफी मागावी, तसेच या पापातील त्यांचे भागीदार मुख्यमंत्री एकनाथ …

Read More »

विजय वडेट्टीवार यांनी केला सरकारच्या या वृत्तीचा निषेध मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाबाबत सरकारचा जाणीवपूर्वक भेदभाव

राज्यातील टीआरटीआय, बार्टी, सारथी, महाज्योती, अमृत या संस्थांच्या कार्यक्रमांमध्ये तसेच योजनांमध्ये एकसमानता आणण्यासाठी व धोरण ठरविण्यासाठी समिती गठीत करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे. परंतु सरकारने भेदभाव करत मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाला जाणीवपूर्वक यातून वंचित ठेवले आहे. सरकारच्या या वृत्तीचा विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी तीव्र शब्दात निषेध केला …

Read More »

अशोक चव्हाण यांचे प्रत्युत्तर, काँग्रेस आघाडीने कार्यकारी पदांची कंत्राटी भरती केली नाही देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपांना दिले प्रत्युत्तर

काँग्रेस आघाडी सरकारने कधीही कार्यकारी पदांची कंत्राटी भरती केली नाही, आता मात्र तहसीलदार, नायब तहसीलदार, पोलीस अशा पदांवर सुद्धा कंत्राटी भरतीचा प्रयत्न झाला आहे. काँग्रेस आघाडी सरकारवर खापर फोडून राज्य सरकार आपले अपयश झाकण्याचा प्रयत्न करतेय असा हल्लाबोल माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला. तसेच अशोक …

Read More »

नाना पटोले यांची टीका, ‘गिरे तो भी टांग उपर’ अशी देवेंद्र फडणवीसांची अवस्था काँग्रेस पक्ष व तरुणांच्या रेट्यामुळेच कंत्राटी नोकर भरती रद्द करण्याची भाजपा सरकारवर नामुष्की

सरकारी नोकर भरती कंत्राटी पद्धतीने करण्यावर काँग्रेस पक्षाने सातत्याने आवाज उठवला होता. सरकारी नोकरीची प्रतिक्षा करणाऱ्या तरुण वर्गातही याबाबत तीव्र संताप होता. काँग्रेस पक्षाने तरुण वर्गाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत भाजपा सरकारला उघडे पाडले. तरुण वर्गाची नाराजी परवडणारी नाही, निवडणुकीत दारुण पराभव होऊ शकतो हे लक्षात आल्यानेच भाजपाप्रणित सरकारवर कंत्राटी …

Read More »