Breaking News

Tag Archives: उपमुख्यमंत्री

देवेंद्र फडणवीस यांचे आदेश, रोडमॅप सादर करा…

भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना राज्याच्या सर्वांगीण विकासात महत्वाचे क्षेत्र असणाऱ्या ऊर्जा विभागाची भूमिका मोलाची असणार आहे. त्यामुळे ऊर्जा विभागाच्या तीनही कंपन्यांनी ऊर्जा क्षेत्रातील पायाभूत विकासाचा सन २०३५ पर्यंतचा एकत्रित रोडमॅप पुढील तीन महिन्यांत सादर करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. सह्याद्री अतिथीगृहात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस …

Read More »

अजित पवार यांची घोषणा, फुले वाडा व सावित्रीबाई फुले स्मारक विस्तारासाठी १०० कोटींचा निधी

महात्मा फुले वाडा व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मारक विस्तारासाठी १०० कोटींचा निधी देण्यात येईल, स्मारकाची रचना आकर्षक आणि भव्य प्रकारची करावी, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. राष्ट्रीय स्मारक भिडेवाडा तसेच महात्मा फुले वाडा व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मारक विस्ताराबाबत शासकीय विश्रामगृह येथे आयोजित बैठकीत अजित पवार बोलत होते. …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र तर फडणवीस म्हणाले, NCRB ने फक्त …

मागील १० दिवसांपासून नागपूर येथे राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस असल्याने विधानसभेत विरोधी पक्षाने मांडलेल्या २९२ अन्वयेखाली अंतिम आठवडा प्रस्ताव मांडला. विरोधकांनी मांडलेल्या प्रस्तावाला उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील विरोधी पक्ष गोंधळलेला असल्याचे वक्तव्य भाषणाच्या सुरुवातीलाच केले. मुख्यमंत्र्यांच्या या विधानावर जयंत पाटील …

Read More »

विजय वडेट्टीवार यांचा मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीसांवर हल्लाबोल

मुख्यमंत्री स्वतःला शेतकऱ्याचा मुलगा म्हणवतात मात्र शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलताना त्यांनी शेतकऱ्याच्या मुलासारखं उत्तर दिले नाही. शेतकऱ्यांचे प्रश्न धसास लागतील अशी अपेक्षा होती. संत्रा, धान, कापूस, सोयाबीन कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सरकारने दिलासा दिला नाही. १९४ तालुक्यांना केंद्राकडून मदत मिळेल अशी अपेक्षा होती, पण तिथेही अपेक्षाभंग झाला आहे. एनडीआरएफ व एसडीआरएफच्या मदतीपासून …

Read More »

देवेंद्र फडणवीस यांची घोषणा, पेमेंट गेटवे कंपनीच्या रक्कमेप्रकरणी ‘एसआयटी’ चौकशी

ठाण्यातील वागळे इस्टेटमध्ये असलेल्या पेमेंट गेट वे आणि पे आऊट सुविधा देणाऱ्या एका कंपनीचे बँक खाते हॅक करून १६ हजार १८० कोटी रुपयांचा व्यवहार करण्यात आला. हा व्यवहार वेगवेगळ्या ठिकाणी जवळपास २६० पेक्षा जास्त बँक खाती उघडून करण्यात आला आहे. यासाठी ९७ बनावट नोटराईज्ड करारनामे करण्यात आले. हे संपूर्ण प्रकरण …

Read More »

अजित पवार यांचे सारथीच्या फेलोशिप संदर्भात मोठे वक्तव्य

राज्य सरकारच्या छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेकडून (सारथी) मराठा समाजातील पीएच.डी. करणाऱ्या केवळ २०० विद्यार्थ्यांना फेलोशिप देण्यात येणार आहे. मुळात यासाठी १३८९ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. सरकारने जाहिरात काढताना विद्यार्थ्यांच्या मर्यादा संख्येचा त्यात उल्लेख नव्हता. त्यामुळे २०२३ च्या बॅचमधील संशोधक विद्यार्थ्यांना सरसकट फेलोशिप द्या, अशी मागणी …

Read More »

चिटफंड सुधारणा विधेयक विधानसभेत मंजूर

उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत मांडलेल्या सन २०२३ चे विधानसभा विधेयक क्रमांक ४९- चिट फंड (महाराष्ट्र सुधारणा) विधेयक, २०२३ मंजूर करण्यात आले. राज्य शासनाकडील अपिलाचे अधिकार प्रशासकीय अधिकाऱ्यास प्रदान केल्यामुळे अपील निकाली काढण्यातील विलंब टाळला जाणार आहे. त्यामुळे अपीलकर्त्यांचा वेळ देखील वाचणार आहे. विधेयक मांडताना उपमुख्यमंत्री अजित पवार …

Read More »

बाळासाहेब थोरात यांचा आरोप तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बैठकीचे आश्वासन

दुधाचे भाव २५ रुपयांपर्यंत खाली आले आहेत, राज्यभर आंदोलने आणि मोर्चे सुरू आहेत. सरकार मात्र या विषयावर तोडगा काढायला तयार नाही, उलट दुग्धविकास मंत्री महाराष्ट्रातल्या दुधात भेसळ आहे असे सांगून दूध उत्पादकांची बदनामी करतात, परिणामी महाराष्ट्रातल्या दुधाकडे संशयाच्या नजरेने पाहिले जाते आणि परराज्यातल्या खाजगी दूध संस्थांची चंगळ होते असा गंभीर …

Read More »

सुषमा अंधारे यांचा फडणवीसांवर हल्लाबोल, सत्तेपेक्षा देश मोठा…आरोप केलेल्या नेत्यांना सत्तेत…

राज्यातील ज्या नेत्यावर देशद्रोहाचे आरोप केले. त्याच सत्ता येते जाते, देश मोठा असे सांगत त्या नेत्याला सत्तेत सामावून घेतल्याची उपरती झाल्यानेच ते अजित पवार यांना पत्र लिहीत आपल्यावर आलेली उपरती एकप्रकारे पत्रातून व्यक्त करत असल्याची टीका शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी एक व्हिडीओ ट्विट करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस …

Read More »

अजित पवार यांची घोषणा, १० महानगरांमध्ये पिंक रिक्षा सुरू करणार

महिलांसाठी रोजगाराची संधी निर्माण करणे आणि महिला सुरक्षा या उद्देशाने राज्यातील १० महानगरांमध्ये पिंक रिक्षा सुरू करणे व सॅनिटरी पॅड संदर्भात सविस्तर आराखडा सादर करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी दिल्या. या संदर्भांत नागपूर विधानभवन येथे बैठक झाली. या बैठकीस महिला व बालविकास मंत्री आदिती …

Read More »