Breaking News

Tag Archives: एकनाथ शिंदे

संभाजीनगरमध्ये शिंदे, फडणवीस ‘बोलून झाले मोकळे’, अन् जनतेच्या हाती फक्त भोपळे मराठवाड्यातील परिस्थिती गंभीर असतानाही दुष्काळ जाहीर न करणे ही शेतकऱ्यांची क्रूर थट्टा नाना पटोले

मराठवाड्यातील जनतेच्या समस्या मार्गी लागाव्यात यासाठी शिंदे- फडणवीस – पवार सरकारने छत्रपती संभाजीनगर येथे मंत्रिमंडळ बैठक घेतली पण यातून मराठवाड्याच्या जनतेला काहीही मिळालेले नाही. ५९ हजार कोटींच्या योजना दिल्याचा ढोल पिटला जात असला तरी हा फक्त आकड्यांचा खेळ आहे, प्रत्यक्षात जनतेच्या हाती जेव्हा काही लागेल तेंव्हाच ते कळेल. मराठवाडा दुष्काळाच्या …

Read More »

१७ सप्टेंबर ते १६ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत सेवा महिना राज्य सरकारकडून शासन निर्णय जारी

राज्यात १७ सप्टेंबर ते १६ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत सेवा महिना राबविण्याबाद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी सूचना केल्यानुसार शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. राज्य शासनाच्या विविध क्षेत्रीय कार्यालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांबाबत नागरिकांना मोठ्या प्रमाणावर माहिती प्राप्त करून देणे, त्यांना विविध योजनांचा योग्य लाभ …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांची ग्वाही, मराठवाड्याच्या शाश्वत विकासाला शासनाचे सर्वोच्च प्राधान्य ३०० वर्षे जुन्या पुलाच्या कामासाठी निधी देणार

मराठवाड्याच्या विकासाचे मध्यवर्ती केंद्र म्हणून छत्रपती संभाजी नगरची ओळख आहे. या शहरासह मराठवाड्यातील पायाभूत सुविधांसाठी शासनाने वेळोवेळी निधी उपलब्ध करुन दिला आहे. मराठवाड्याच्या शाश्वत विकासाला शासनाचे सर्वोच्च प्राधान्य असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. शहरातील वंदे मातरम सभागृहात “मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवी” वर्षानिमित्त महापालिकेच्या विविध विकासकामांचे उद्घाटन व …

Read More »

छत्रपती संभाजीनगर महसुली विभाग, धाराशिव जिल्हा नामकरण फलकाचे तिघांकडून उद्धाटन मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण

छत्रपती शिवाजी महाराज की जय… छत्रपती संभाजी महाराज की जय… या जयघोषाच्या निनादात छत्रपती संभाजीनगर महसुली विभागाचे आणि धाराशिव जिल्हा नामकरण फलकांचे अनावरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज करण्यात आले. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर आज मंत्रिमंडळ बैठकीसाठी मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्यांचे छत्रपती …

Read More »

अखेर औरंगाबाद, उस्मानाबादच्या तालुका, जिल्हा आणि विभागाचे नामांतर मराठवाड्यातील बैठकीच्या अनुषंगाने राज्य सरकारचा मोठा निर्णय

महाविकास आघाडीने सरकारला उलथवून टाकत राज्यात स्थानापन्न झालेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने ठाकरे सरकारचा निर्णय रद्दबादल ठरवित पुन्हा एकदा औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहराचे अनुक्रमे छत्रपती संभाजी नगर आणि धाराशीव असे नामांतर करण्याचा निर्णय घेतला. मात्र औरंगाबाद नामांतर प्रश्नी मुंबई उच्च न्यायालयात याचिका प्रलंबित असताना आणि मराठवाडा …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांचा दिलासा, गणेश भक्तांना टोल माफी, पण पासेस या ठिकाणी असा मिळणार कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना टोल माफी

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना शनिवार १६ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर या कालावधीत पथकर (टोल) माफी देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. त्यासंबंधीचा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला आहे. मुंबई – बंगळुरु राष्ट्रीय महामार्ग, मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्ग यावरील आणि इतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यांवरील पथकर नाक्यांवर ही …

Read More »

राज ठाकरे म्हणाले, मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणात मुख्यमंत्री शिंदेंनी तोडगा काढला ते … पूर्ण न होणारी आश्वासन दिली नसतील अशी आशा

मनोज जरांगे पाटील ह्यांचं मराठा आरक्षणासाठी गेले १७ दिवस जे उपोषण सुरु होतं ते त्यांनी मागे घेतलं, ही समाधानाची बाब. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ह्यांनी मध्यस्थी करून तोडगा काढला हे बरं झालं. पण हे उपोषण सोडवताना सरकारकडून कोणतीही पूर्ण न होऊ शकणारी आश्वासनं दिली गेलेली नाहीत, अशी मी आशा करतो असे …

Read More »

अपात्रतेच्या मुद्दाप्रकरणी शिंदे आणि ठाकरे गटाच्या आमदारांना दोन आठवड्यांची मुदत विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांची माहिती

आमदारांच्या अपात्रतेसंबंधी आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी घेतलेल्या सुनावणीत काही निर्णय होईल अशी अपेक्षा होती, मात्र या प्रकरणी आमदारांना दोन आठवड्यांचा अवधी वाढवून मिळाला आहे. या मुदतवाढीसाठी न मिळालेल्या कागदपत्रांबरोबरच गणेशोत्सवाचे कारण पुढे करण्यात आले आहे. त्यामुळे सध्या तरी अपात्रतेची टांगती तलवार असणाऱ्या आमदारांना गणपती पावला असे म्हटले जात …

Read More »

मुख्यमंत्री शिंदेचा मोठा निर्णयः गणेशोत्सव मंडळांना पाच वर्षांसाठी एकदाच परवानगी एकदाच घ्यावी लागणार परवानगी

उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळांना पुढील पाच वर्षाकरिता उत्सवाकरिता एकदाच परवानगी घ्यावी लागणार आहे. अशी परवानगी देण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयामुळे गत दहा वर्षांत सर्व नियम, कायद्यांचे पालन करणाऱ्या, कोणत्याही तक्रारी नसलेल्या उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळांना दिलासा मिळाला आहे. तसेच त्यांना आगामी वर्षांसाठी आणखी …

Read More »

अखेर मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे म्हणाले…. मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी कटिबद्ध

मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार करतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यात सामाजिक सलोखा, शांतता राखावी, असे आवाहन केले आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी आज जालना जिल्ह्यातील आंतरवाली-सराटी (ता. अंबड) येथे आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते. मुख्यमंत्र्यांच्या ग्वाहीनंतर मनोज जरांगे पाटील यांनी …

Read More »