Breaking News

Tag Archives: एकनाथ शिंदे

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे मुख्यमंत्र्यांना लिहिले पत्र तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना व नागरिकांना सरसकट आर्थिक मदत करा

संपूर्ण महाराष्ट्र ओला आणि कोरड्या दुष्काळाचा सामना एकाचवेळी करत असल्याचे दिसून येत आहे. ही परिस्थिती अत्यंत गंभीर असून तात्काळ पंचनामे करुन नागरिकांना व शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदत करा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली. जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना याबाबत पत्र …

Read More »

वर्ल्ड ॲग्रीकल्चर फोरमतर्फे कृषी पारितोषक २०२४ महाराष्ट्राला जाहीर एक लाख डॉलरचा वैश्विक पुरस्कार

युनोचे सरचिटणीस अँण्टिवो गुट्रेस यांनी शाश्वत विकास, हवामान बदलाशी लढा आणि अन्न सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी तातडीने पाऊले उचलण्याचे आवाहन केले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील महाराष्ट्र शासनाने या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. राज्यात पर्यावरण रक्षण, अन्न सुरक्षा यांच्या माध्यमातून शाश्वत विकास धोरण राबविली जात आहेत. या सर्व प्रयत्नांची …

Read More »

एकतर तुम्ही किंवा मी अशा ईर्षेनेच मैदानात, उद्धव ठाकरे यांचा खणखणीत इशारा कुणाला? देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना दिला इशारा

खोट्या केसेसमध्ये फसवू पाहणाऱ्याला इशारा देत आता एक तर तू राहशील किंवा मी असा निर्वाणीचा इशारा शिवसेना उबाठाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना देत आता आदेशाची वाट बघू नका आगामी विधानसभा निवडणूकीच्या तयारीला लागा असे आदेशही यावेळी दिले. शिवसेनेच्या शाखाप्रमुखांचा मेळावा रंगशारदा सभागृहात झाला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी …

Read More »

विजय वडेट्टीवार यांचा सवाल, …त्या अधिकाऱ्याचे निर्णय सरकार रद्द करणार का? सुधाकर शिंदे यांनी आठ महिन्यात घेतलेल्या निर्णयाची चौकशी करा

नियमबाह्य पद्धतीने मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त म्हणून कारभार हाती घेणाऱ्या सुधाकर शिंदे यांची अखेरीस बदली झाली. मात्र नियमबाह्य पदावर बसलेल्या अधिकाऱ्याने आठ महिन्यात घेतलेले निर्णय सरकार रद्द करणार का? असा सवाल करत हे देखील सरकारने स्पष्ट करावे अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली. पुढे बोलताना विजय वडेट्टीवार …

Read More »

राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय, जेंडर ट्रान्सफॉरमेटीव्ह मेकॅनिझम कार्यक्रम राबविणार आतंरराष्ट्रीय कृषी विकास निधीतून मिळणाऱ्या कर्जातून अनुदान देणार

नव तेजस्विनी – महाराष्‍ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्पाच्या मुदतीत एक वर्षाची वाढ करण्यात आली आहे. हा कार्यक्रम आता सहा ऐवजी सात वर्षांच्या कालावधीमध्ये राबविण्यात येणार आहे. याशिवाय या कार्यक्रमात जेंडर ट्रान्सफॉरमेटीव्ह मॅकॅनिझम (Gender Transformative Mechanism- GTM) लिंग परिवर्तनीय यंत्रणा राबविण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा,ज्येष्ठ नागरिक कल्याणकारी महामंडळाची स्थापना करणार ज्येष्ठ नागरिक धोरणाच्या अंमलबजावणीचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेणे हे शासनाचे कर्तव्य आहे. या भूमिकेतून आमचे काम सुरु असून येत्या काळात ज्येष्ठांसाठीच्या कल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी कर्तव्य अभियान राबविण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. तसेच ज्येष्ठ नागरिक कल्याणकारी महामंडळाची स्थापन करण्याची घोषणा करून ज्येष्ठांसाठीच्या सर्व योजना या महामंडळाच्या माध्यमातून राबविण्यात याव्यात, असेही मुख्यमंत्र्यांनी …

Read More »

आदित्य ठाकरे यांची टीका, सरकारचे खोके, जनतेला धोके’ असं मिंधेंच धोरण नोव्हेंबरमधे आमचं सरकार येणार, रस्ते घोटाळ्यातील भ्रष्टाचारी कॉन्ट्रॅक्टर आणि मंत्र्यांना जेलमध्ये जावं लागणार

खड्ड्यांमुळे मुंबई अहमदाबाद, मुंबई नाशिक आणि मुंबई गोवा महामार्गाची अक्षरशः चाळण झालीआहे . चाकरमानी कोकणात आता गणपतीला जातील. गडकरी यांना आवाहन आहे, त्यांनी एकदा एकदा गाडीने जावं. मग कळेल किती काम झालय. कारण मुंबई असो वा ठाणे रस्त्यावरचे खड्डे मोजावे की खड्ड्यात रस्ते शोधावे अशी स्थिती निर्माण झाली आहे अशी …

Read More »

परतवारीपूर्वीच दिंडी प्रमुखांच्या बँक खात्यात २० हजार रुपये जमा आषाढ वारीतील १५०० दिंड्यांना सानुग्रह अनुदानापोटी ३ कोटींचे वितरण

आषाढ वारीत सहभागी झालेल्या राज्यभरातील १५०० दिंड्यांना सानुग्रह अनुदानापोटी ३ कोटी सुपूर्द करण्यात आल्याची माहिती शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेनेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष ह.भ.प. अक्षय महाराज भोसले यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. यंदा प्रथमच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिंड्यांना प्रत्येकी २०००० रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा केली होती. परतवारीपूर्वीच याची पूर्तता …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांची माहिती, दिव्यांगाना आता अडीच लाख कर्ज देणार दिव्यांगांसाठी सर्व महानगरपालिकांमध्ये पुनर्वसन केंद्र सुरू करा

दिव्यांग बांधवांना यंदा देखील रोजगार, स्वयंरोजगारासाठी ई-रिक्षा वाटप करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला. दिव्यांग बांधवांना एकाच छताखाली प्रशिक्षण, समुपदेशन, वैद्यकीय सहायता यासर्व सुविधा देणारे पुनर्वसन केंद्र सर्व महानगरपालिकांनी सुरू करावे, असे निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी आज दिले. दिव्यांगांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देणारी योजना तयार करतानाच कर्जाची रक्कम अडीच …

Read More »

देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्री कार्यालयातील (न) फायलीवर बारीक लक्ष पण कान बंद आणि डोळे झाकले

लोकसभा निवडणूकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील एका प्रचारसभेत शरद पवार आणि शिवसेना उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना म्हणाले होते की, आजभी नकली एनसीपी के शरद पवार आणि नकली शिवसेना के उद्धव ठाकरे हमारे साथ आ जाये और अपनी मन मर्जी से जो करना है करो, असे …

Read More »