Breaking News

Tag Archives: काँग्रेस

के सी वेणुगोपाल यांचा इशारा, पक्षात बेशिस्त खपवून घेणार नाही…आमदारांवर कारवाई राज्याला गुजरातचा गुलाम होऊ देणार नाही: नाना पटोले

विधानसभा निवडणुकीला ताकदीने सामोरे जाणार असून आजच्या बैठकीत काँग्रेस संघटन मजबूत करण्यावर चर्चा करण्यात आली. लोकसभा निवडणुका व त्यानंतर देशभरात झालेल्या पोटनिवडणुकीतही भाजपाचा सुपडा साफ झालेला आहे. जनतेला महाराष्ट्रातही परिवर्तन हवे आहे. महाविकास आघाडी विधानसभेच्या निवडणुका एकत्र लढणार असून तीन पक्ष एकत्रित बसून जागावाटपाची चर्चा करणार आहेत. आम्ही मिळून या …

Read More »

विजय वडेट्टीवार यांचा हल्लाबोल, विशाळगड येथील दुर्दैवी घटना सरकार पुरस्कृत जिल्हाधिकाऱ्यांची बदली तर जिल्हा पोलीस प्रमुखांना तात्काळ निलंबित करावे

कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगड येथे अतिक्रमण हटविण्याच्या नावाखाली समाजकंटकांनी विशिष्ट समाजाला लक्ष करून घातलेला हैदोस निंदनीय आहे. विशाळगड येथील गजापूर येथे घडविलेली समाजविघातक घटना ही शासन पुरस्कृत असल्याने या घटनेमागील खरा सूत्रधार सरकारने समोर आणला पाहिजे, अशा शब्दात विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर सडकून टीका करत या दुर्देवी घटनेचा …

Read More »

नाना पटोले यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र, विशाळगडावर दंगली घडवण्याचे षडयंत्र… गजापूर दंगलीला वेगळा रंग देण्याचा गृहमंत्र्यांचा प्रयत्न; गृहमंत्र्यांचे विधान दंगेखोरांना पाठबळ देणारे

राजर्षी शाहू महाराज यांनी सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन राज्य केले म्हणूनच त्यांना लोकराजे म्हणतात पण त्यांच्याच करवीर नगरीत सामाजिक सलोखा बिघडवण्याचे पाप केले जात आहे आणि तेही केवळ राजकीय फायद्यासाठी, हे अत्यंत दुर्देवी आणि चिंताजनक आहे. विशाळगड हिंसाचाराचे प्रकरण हे महाराष्ट्राला काळीमा फासणारे आहे. विशाळगडावरील अतिक्रमणाच्या नावाखाली गजापूर गावात …

Read More »

आगामी विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते के सी वेणुगोपाल मुंबईत निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेऊन रणनिती ठरवणार

राज्यातील विधानसभा निवडणुका अवघ्या तीन महिन्यांवर आल्या आहेत. लोकसभा निवडणुकीत राज्यात काँग्रेस पक्षाला व महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले आहे. विधानसभा निवडणुकीत असेच यश मिळावून राज्यात काँग्रेस विचाराचे सरकार आणण्यासाठी प्रदेश काँग्रेसने तयारी सुरु केली असून या अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे संघटन सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल व महाराष्ट्र प्रभारी रमेश …

Read More »

विशाळगडावरील दंगलीची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करा: काँग्रेसची मागणी राजर्षी शाहू महाराजांच्या भूमीतच त्यांच्या विचारांना काळीमा फासण्याचा प्रयत्न

विशाळगडावरील अतिक्रमणाच्या नावाखाली मजापूर गावातील अल्पसंख्याक समाजाच्या घरावर हल्ले करून तोडफोड, जाळपोळ करून मारहाण करण्यात आली. अतिक्रमण प्रकरण न्यायप्रविष्ट आहे तसेच विशाल गडावर मोर्चा काढणार याची पोलीसांना माहिती असतानाही चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला नाही. कायदा हातात घेऊन दंगल करणाऱ्यांना मोकळीक दिल्याचे स्पष्ट दिसत आहे. विशाळगडावरील दंगलीची सखोल चौकशी करून …

Read More »

नाना पटोले यांचे साकडे, महाराष्ट्र बेरोजगारी आणि शेतकरी आत्महत्या मुक्त व्हावा बा विठ्ठला, राज्यातील सामाजिक सलोखा कायम ठेवण्याची सुबुद्धी सत्ताधा-यांना दे

आषाढी वारीच्या निमित्ताने काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंढरपुरच्या विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेऊन राज्याच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना केली. महाराष्ट्र बेरोजगारी आणि शेतकरी आत्महत्या मुक्त व्हावा, असे साकडे घालून राज्यातील सामाजिक सलोखा कायम ठेवण्याची सुबुद्धी सत्ताधा-यांना दे, अशी प्रार्थनाही नाना पटोले यांनी केली. विठुरायाचे दर्शन घेण्याआधी नाना पटोले यांनी पंढरपूर तालुक्यातील …

Read More »

अलका लांबा यांचे निर्देश, प्रत्येक बुथवर किमान एक महिला अध्यक्ष नियुक्त करा महिला प्रदेश काँग्रेसच्या विस्तारित कार्यकारिणीची बैठक टिळक भवनमध्ये संपन्न

महाराष्ट्र एक मोठे राज्य असून एक मजबूत संघटनच निवडणुका लढून जिंकू शकते त्यासाठी संघटन सशक्त असले पाहिजे. महिलांची लोकसंख्या ५० टक्के आहे, ही नारीशक्ती निवडणुकीतही तितकीच महत्वाची आहे. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राने विजयाचा मार्ग आखून दिला आहे. भारतीय जनता पक्षाने ४०० पारचा नारा दिला होता त्याला रोखण्याचे काम महाराष्ट्राने केले असून …

Read More »

नितीन गडकरी यांच्या कानपिचक्या, हायब्रीड बियाणं लावलं की उत्पन्न वाढतं पण… काँग्रेसने ज्या चुका केल्या त्या आपल्याला करायच्या नाहीत

संपूर्ण भाजपात स्पष्टवक्ते आणि दिलखुलासपणे पक्षातील अंतर्गत बाबींवर किंवा धोरणांवर जाहिरपणे भाष्य करणारे नितीन गडकरी यांच्यासारखा दिलखुलास व्यक्ती भाजपामध्ये कोणीच नसल्याचे बोलले जाते. त्याचा प्रत्यंत्तर नुकताच आला. मात्र नितीन गडकरी यांनी यावेळी त्यांच्या जाहिर वक्तव्यातून भाजपा कार्यकर्त्यांनाच कानपिचक्या देत म्हणाले पूर्वी एक बरं होतं, काहीच नव्हतं, त्यामुळे थोडक्यात समाधान व्यक्त …

Read More »

काँग्रेस मागणार खर्चाचा हिशेब, महामंडळांना दिलेला निधी कुठे खर्च झाला? काय कामे झाली? हिशोब काँग्रेस प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिक-यांना विचारणार

महाभ्रष्ट महायुती सरकारने राज्याची मोठ्या प्रमाणात अधोगती केल्याचे आर्थिक पाहणी अहवालातून दिसून आले आहे. दरडोई उत्पन्नात आघडीवर असणारा महाराष्ट्र या महायुती सरकारच्या काळाच देशात सहाव्या क्रमांकावर फेकला गेला आहे. कृषी क्षेत्रात राज्याची मोठी पीछेहाट झाली असून राज्यावर ८ लाख कोटी रुपयांच्या कर्जाचा डोंगर उभा केला आहे. कॅगनेही राज्य सरकारच्या आर्थिक …

Read More »

नाना पटोले यांची टीका, पंतप्रधान मोदींची निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा फेकाफेकी लाखो रोजगार निर्मिती होत असेल तर अजूनही बेरोजगारांच्या फौजा कशा

मुंबईतील २९ हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईला जागतिक आर्थिक केंद्र करण्याचे स्वप्न असल्याचे सांगितले ते पटण्यासारखे नाही. मागील १० वर्षात भाजपा सरकारने मुंबई व महाराष्ट्राचे सर्वच बाबतीत खच्चीकरण केले आहे. मुंबईतील जागतिक वित्तीय केंद्रासह अनेक महत्वाच्या कंपन्यांची कार्यालये, प्रकल्प गुजरात व इतर राज्यात पळवले. …

Read More »