Breaking News

Tag Archives: काँग्रेस

नाना पटोले यांचा आरोप, अटल सेतुचे काम निकृष्ट दर्जाचे, रस्ता एक फुट खचला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या अटल सेतू रस्त्याला भेगा

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ज्या अटल सेतुचे उद्घाटन करण्यात आले त्या रस्त्याला अवघ्या तीन महिन्यातच भेगा पडल्या आहेत. नवी मुंबईकडील एका भागात अर्धा किलोमीटरपर्यंत रस्ता एक फुट खाली खचला आहे. महायुती सरकारने भ्रष्टाचाराच्या सर्व सीमा ओलांडल्या आहेत. कर्नाटकातील आधीचे भाजपा सरकार ४० टक्के कमिशनवाले होते, पण महायुती सरकार तर १०० …

Read More »

नाना पटोले यांचा आरोप, शेतकऱ्यांची लूट आणि विद्यार्थ्यांचे भविष्य उद्धवस्त… ईव्हीएमवर भाजपा उमेदवारांनाही विश्वास नाही पण भाजपा सरकार व निवडणूक आयोगाची अडेलतट्टूची भूमिका

केंद्रातील आणि राज्यातील भाजपा सरकारने जनतेला वा-यावर सोडून सत्ताधारी मजा मारत आहेत. राज्यात कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे बिघडलेली आहे, महागाई, बेरोजगारीने लोकांना जगणे कठिण झाले आहे. सरकारने बियाणे आणि खतांचा काळाबाजार करून शेतक-यांची लूट सुरु आहे. NEET चे पेपर फोडून विद्यार्थ्यांचे भविष्य उद्धवस्त करणा-या भ्रष्टाचारी महायुती सरकारविरोधात काँग्रेसने आज राज्यभरात …

Read More »

वाढवण बंदराला विरोध असतानाही केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजूरी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय मंत्रिमंडळाचे मंत्री संजय बनसोडे यांनी मानले आभार

पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदराला शिवसेना उबाठा गटाने सातत्याने विरोध केला आहे. तर तसेच काँग्रेसनेही स्थानिकांच्या प्रश्नावरून वाढवण बंदराच्या उभारणीला विरोध दर्शविला आहे. त्यामुळे या वाढवण बंदराच्या उभारणीला स्थानिकांसह राजकिय पक्षांचा विरोधही वाढत आहे. मात्र नुकत्याच झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत वाढवण (जि. पालघर) बंदर उभारणी करण्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील …

Read More »

नाना पटोले यांची मागणी, भर पावसात पोलीस भरतीसाठी आलेल्या उमेदवारांची राहण्याची सोय करा MPSC ने उपजिल्हाधिकारी, तहसीलदार पदांसह सर्व रिक्त पदांची जाहिरात काढून पद भरती करावी

पोलीस विभागातील १७ हजार जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु असून यासाठी तब्बल १७ लाख उमेदवारांनी अर्ज केले आहेत. राज्यातील विविध जिल्ह्यात होत असलेल्या या पोलीस भरतीसाठी आलेल्या मुला-मुलींच्या राहण्याची काहीही सोय नाही, त्यांची प्रचंड गैरसोय होत आहे. भरपावसात पोलीस भरती सुरु असून या भरतीसाठी आलेल्या मुलांना पावसात रस्त्याच्या कडेला, उड्डाण पुलाखाली …

Read More »

भाजपा सरकारविरोधात २१ जून रोजी काँग्रेसचे ‘चिखल फेको’ आंदोलन महागाई, बेरोजगारी, NEET परिक्षेतील घोटाळा, खते-बियाण्यांचा काळाबाजार, कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नी आंदोलन

राज्यातील जनता अनेक समस्यांचा सामना करत असताना महाभ्रष्टयुती सरकार त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. या सरकारने जनतेला वाऱ्यावर सोडून दिले आहे. या महाभ्रष्ट, निष्क्रीय सरकारच्या विरोधात काँग्रेस पक्ष शुक्रवार २१ जून रोजी राज्यातील सर्व जिल्हा मुख्यालयी सकाळी ११.०० वाजता सरकारच्या प्रतिमेस चिखल लावून ‘चिखल फेको’ आंदोलन करून भाजपाप्रणित सरकारचा निषेध …

Read More »

विजय वडेट्टीवार यांची मागणी, जातनिहाय जणगणना करा पोलिस भरती पारदर्शक व्हावी ; दोन जिल्ह्यातील भरतीत अंतर ठेवावे

महायुती सरकारने दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे महापाप केले आहे. पुरोगामी महाराष्ट्राचे गतवैभव परत आणण्यासाठी व दोन्ही समाजाचे समाधान होण्यासाठी राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांच्या मागणीप्रमाणे राज्य सरकारने जातनिहाय जनगणना करावी, केंद्र सरकारने नीट परीक्षेबाबत एसआयटी गठीत करून झालेल्या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करावी, केंद्र सरकारने नीट परीक्षेबाबत एसआयटी गठीत करून …

Read More »

नाना पटोले यांचा सवाल, न्यायप्रक्रियेत भाजपाचा कार्यकर्ता कशाला? भाजपाचे उमेदवार उज्ज्वल निकमांच्या सरकारी वकीलपदी नियुक्तीस काँग्रेसचा विरोध

राज्यातील भारतीय जनता पक्षाच्या सरकारने न्याय व्यवस्थेत आपली माणसे घुसवून पाप केले आहे. अॅड उज्वल निकम यांनी लोकसभेच्या निवडणुकीत भाजपाचे उमेदवार म्हणून निवडणुक लढवलेली असताना त्यांची सरकारी वकील पदावर नियुक्ती करण्यात आलेली आहे. राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याची सरकारी वकील पदावर नियुक्ती करुन भाजपा सरकार चुकीचा पायंडा पाडत आहे. उज्ज्वल निकम यांच्या …

Read More »

अखेर ठरलं, वायनाडमधून प्रियंका गांधी वड्रा, राहुल गांधी रायबरेलीचे खासदार काँग्रेस पक्षाचा निर्णय सोनिया गांधी यांच्याबरोबरील बैठकीनंतर निर्णय

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी वायनाड आणि उत्तर प्रदेशातील रायबरेली लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरला होता. या दोन्ही जागांवर राहुल गांधी विजयी झाले. त्यामुळे राहुल गांधी कोणत्या लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. तसेच राहुल गांधी यांनीही आपण वायनाड मतदारसंघातील लोकांच्या प्रेमात असून …

Read More »

संजय निरूपम यांची मागणी,…राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांनी माफी मागावी वृत्तपत्राने खोट्या बातमीची कबुली दिल्याने उत्तर-पश्चिम मतदार संघातील सत्य अखेर समोर

लोकसभा निवडणुकीत मुंबई उत्तर-पश्चिम मतदार संघातील मतमोजणीबाबत प्रसिद्ध केलेली बातमी खोटी असल्याचे मिड डे या इंग्रजी वृतपत्राने कबुली देत माफी मागितली आहे. याबाबत आक्रमक होत शिवसेना उपनेते आणि प्रवक्ते संजय निरुपम यांनी या वृत्तपत्राचा आधार घेत सोशल मिडियावर फेक न्यूज व्हायरल करणाऱ्या राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांनी जाहीर माफी …

Read More »

नाना पटोले यांचा सवाल, किड्या मुंग्याप्रमाणे माणसे मरत आहेत, सरकार कुठे आहे? उष्माघाताने किती लोकांचा मृत्यू झाला? हे सरकारने जाहीर करावे!

राज्यात दुष्काळाची परिस्थिती गंभीर आहे. राज्याच्या विविध भागात उष्माघाताने अनेकांचा बळी गेला आहे. दुष्काळाने ग्रस्त शेतकरी आत्महत्या करत आहेत. पाण्यासाठी वणवण करताना अनेक माता भगिणींनी आणि लहान मुलामुलींनी जीव गमावला आहे. कंपन्यांमध्ये झालेल्या स्फोट आणि दुर्घटनेत अनेकांचा मृत्यू झाला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये राज्यात किड्या मुंग्याप्रमाणे माणसे मरत आहेत. पण …

Read More »