Breaking News

Tag Archives: काँग्रेस

राहुल गांधी यांचा विश्वास, जम्मू आणि काश्मीरला राज्याचा दर्जा मिळवून देणार जम्मू आणि काश्मीरच्या काँग्रेसच्या प्रचारसभेत बोलताना दिला विश्वास

स्वतंत्र भारताच्या इतिहासात एखाद्या राज्याचा असलेला राज्याचा दर्जा काढून घेऊन त्याला केंद्रीय प्रदेश बनविण्याचा प्रयत्न सुरु असून हा प्रयत्न हाणून पाडू आणि जम्मू आणि काश्मीरला राज्याचा दर्जा मिळवून देऊ असा विश्वास काँग्रेसचे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज व्यक्त केला. जम्मू आणि काश्मीरमधील विधानसभा निवडणूकीच्या निमित्ताने आयोजित प्रचार सभेत …

Read More »

नाना पटोले यांचा आरोप, हॉस्पिटलची ५०० कोटींची जमीन ७० कोटीत… मविआ सरकार असताना एस. टी. संप चिघळवणारे भाजपाचे तीन हस्तक आता गप्प का ?: विजय वडेट्टीवार

राज्यातील कायदा व सुव्यवस्था अत्यंत खालावलेली असून हत्या, खून, दरोडो, बलात्कार यांचे प्रमाण वाढले आहे. पुण्यात नुकतेच दिवसाढवळ्या दोन खून झाले. राज्यात शांतता राखण्यात भाजपा युती सरकार अपयशी ठरली आहे. कायदा सुव्यवस्थेकडे अक्षम्य दुर्लक्ष केले जात असून सरकारचे सर्व लक्ष मात्र घोटाळे करून पैसा वसुल करण्याकडे आहे, असा घणाघाती हल्लाबोल …

Read More »

“इमर्जन्सी” चित्रपटाला सेन्सॉर प्रमाणपत्र देण्यास मुंबई उच्च न्यायालयाचा नकार मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात कोणतेही आदेश पारीत करण्यास मनाई

काँग्रेस नेत्यांचे आणि पक्षाची प्रतिमा डागळण्याची एकही संधी भाजपाकडून सोडली जात नाही. तसेच भाजपाच्या खासदारांकडून सातत्याने काँग्रेसच्या नेत्यांना लक्ष्य करण्यात येत असते. कधी विद्यमान नेत्यांना तर कधी भूतपूर्व नेत्यांना, या पार्श्वभूमीवर पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांच्या जीवनावर आधारीत आणि आणिबाणी लागू केलेल्या घटनांचा संदर्भावर आधारीत भाजपा खासदार कंगना राणावत यांची …

Read More »

अमित देशमुख यांची मागणी, अतिवृष्टी आणि पुरग्रस्तांना तातडीने मदत करा नांदेड, हिंगोली जिल्हयातील पूरग्रस्त भागाची पाहणी केल्या नंतर माजी मंत्री अमित विलासराव देशमुख यांची मागणी

अतिवृष्टी आणि नंतर आलेल्या पुरामुळे मराठवाड्यात उभ्या शेती पिकाचे आणि जमिनीचे मोठे नुकसान झाले आहे. प्रशासनाने या नुकसानीचे तातडीने पंचनामे करावेत, शासनाने आपतग्रस्तांना दिलासा देण्यासाठी मदत जाहीर करावी, अशी मागणी माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी नांदेड, हिगोली जिल्हयात अनेक ठिकाणी अतीवृष्टी आणिपूरग्रस्त भागाच्या पाहणी नंतर केली. मागच्या तीन-चार दिवसात …

Read More »

नाना पटोले यांची मागणी, गृहमंत्री फडणवीसांचा राजीनामा, डीजीपी रश्मी शुल्कांना निलंबित करा बदलापूर प्रकणातील आपटे व महाराजांच्या पुतळ्याचा शिल्पकार आपटे अजून मोकाट कसे?

महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले आहेत. कायदा व सुव्यवस्था हाताळण्यात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस फेल झाले आहेत तर पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला बदलापूर घटनेतील आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. बदलापूर घटनेतील आरोपी आपटे व शिवरायांच्या पुतळ्याचा शिल्पकार जयदीप आपटेला अजून अटक का झाली नाही? ते पाकिस्तानात पळून गेले काय? असा …

Read More »

सेबी प्रमुख माधबी पुरी बुच यांना आयसीआयसीआय बँकेकडून पगार काँग्रेसचा प्रवक्ते पवन खेरा यांचा आरोप

काँग्रेस नेते पवन खेरा यांनी सेबी प्रमुख माधबी पुरी बुच यांना आयसीआयसीआय बँकेकडून पगार मिळत होता असा आरोप केल्याने एकच खळबळ उडाली. त्यातच यासंदर्भात काँग्रेसने थेट माधबी पुरी बुच यांना ट्विटरवरून जाहीर प्रश्न केले. दरम्यान आयसीआयसीआय ICICI बँकेने २ सप्टेंबर रोजी सेबी SEBI चेअरपर्सन माधबी पुरी बुच यांना पगार किंवा …

Read More »

नाना पटोले यांचा सवाल, मराठवाड्यातील जिल्ह्यांचे पालकमंत्री कुठे आहेत ? मराठवाड्यातील पूरस्थितीची गांभिर्याने दखल घेऊन तातडीने मदत पाठवा

मराठवाड्याला अतिवृष्टीचा मोठा तडाखा बसला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. रस्ते व पुल वाहून गेल्याने मराठवाड्यातील अनेक गावांचा इतर भागाशी संपर्क तुटला आहे. पुराच्या पाण्याने शेतातील उभे पिक वाहून गेल्याने खरीप हंगामही वाया गेला. शेकडो जनावरे वाहून गेली आहेत. नद्या, नाल्यांना पूर आला आहे. सरकारने इव्हेंटबाजी व जाहिरातबाजी बाजूला ठेवून …

Read More »

नाना पटोले यांचा इशारा,… पंडित नेहरूंच्या नावाने फेक नेरेटिव्ह पसरवू नका पवन खेरा यांची टीका, जे काम मुघल करु शकले नाहीत ते भाजपाच्या बेईमान लोकांनी केले

छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करुन भाजपा सरकारने महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला ठेच पोहोचवली आहे. महाराज आपले दैवत आहेत, भाजपाने त्यांचा धडधडीत अपमान केला आहे, या अपमानाविरोधात जोडे मारो आंदोलन आयोजित केले असताना शिवद्रोही व्यवस्थेने विरोध केला, परवानगी नाकारली. आता काँग्रेसनेच महाराजांचा अवमान केल्याचा फेक नेरेटिव्ह देवेंद्र फडणवीस व भाजपा पसरवत आहे, फेक …

Read More »

देवेंद्र फडणवीस यांचा सवाल, त्या कृत्यांबद्दल काँग्रेस माफी मागणार का? शिवाजी महाराजांनी सुरत लुटलीच नाही

मालवण येथील शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळून पडल्याच्या निषेधार्थ विरोधक महाविकास आघाडीच्यावतीने राज्य सरकारच्या विरोधात जोडे मारो आंदोलन पुकारत भलामोठा मोर्चा काढला. या मोर्चात शिवद्रोही सरकार म्हणून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी महायुती सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. यावेळी हुतात्मा चौक ते गेट वे ऑफ इंडिया दरम्यान महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून चुकीला माफी …

Read More »

जोडे मारो आंदोलनः नाना पटोले यांची टीका, ही भाजपाची पेशवाई वृत्ती…चुकीला माफी नाही राजकोटच्या किल्यावरील महाराजांचा पुतळा कोसळण्याची घटना हा भ्रष्टाचाराचा नमुना

भाजपा सरकारने कमिशनखोरी व भ्रष्टाचार करून छत्रपती शिवरायांचा अपमान करण्याचे पाप केले आहे. मालवणमध्ये शिवरायांचा फक्त पुतळाच पडलेला नाही तर महाराष्ट्र धर्म पायदळी तुडवला व महाराष्ट्राचा अवमानही केला. शिवाजी महाराज हे आमचे दैवत आहेत, खोके सरकारने आमच्या दैवतांचा अपमान केला. विधानसभा निवडणुकीचा काळ असल्याने पंतप्रधान व मुख्यमंत्री यांनी माफी मागितली …

Read More »