Breaking News

Tag Archives: काँग्रेस

ममता बँनर्जी यांनी जाहिर केली ४२ उमेदवारांची यादीः काँग्रेस आश्चर्यचकीत

आगामी लोकसभा निवडणूकीच्या धर्तीवर आणि भाजपा विभाजनवादी राजकारणाला प्रत्युत्तर म्हणून देशातील प्रमुख विरोधी पक्षांनी इंडिया आघाडीची स्थापना केली. परंतु काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेशसह अन्य राज्यातून काँग्रेसच्या इंडिया आघाडीतील घटक पक्षांकडून प्रश्न उपस्थित करण्यात येऊ लागले. त्यातच बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी …

Read More »

शरद पवार म्हणाले, आगामी निवडणूक देशाच्या भवितव्यासाठी महत्त्वाची

देशाचे भविष्य आणि भवितव्यासाठी निवडणुका आहेत. देशाचे अनेक जणांनी नेतृत्व केलं. देशाच्या भवितव्यची चिंता कधी नव्हती. पण गेले दहा वर्ष पाहिलं असता, आता बदल केला पाहिजे असं वाटतंय असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातील भोर इथे आयोजित महाविकास आघाडीच्या वतीने …

Read More »

काँग्रेस-डिमकेच्या आघाडीत कमल हसनही सहभागीः जागा वाटपावर शिक्कामोर्तब

इंडिया आघाडीतील तामिळनाडू राज्यातील डिमके अर्थात द्रविड मुनेत्र कझघम पक्षाबरोबर असलेली काँग्रेसबरोबरील आघाडीवर आज शिक्कामोर्तब करण्यात आले. विशेष म्हणजे या आघाडीत दाक्षिणात्य स्टार कमल हसन यांचा मक्कल निधी मैय्यम हा पक्षही सहभागी झाला आहे. त्यामुळे तामिळनाडू मध्ये डिएमके पक्षाबरोबर काँग्रेस आणि मक्कल निधी मैय्यम हा पक्ष आघाडी म्हणून लोकसभा निवडणूकीला …

Read More »

मल्लिकार्जून खर्गे म्हणाले, मोबाईल असो वा हायस्पीड मेट्रो या योजना काँग्रेस…

मुंबई शहराचा विकास व आंतरराष्ट्रीय शहर म्हणून ओळख ही काँग्रेस काळातच झाली. काँग्रेस सरकार असतानाच मुंबईतील पायाभूत सुविधा, आरोग्य, शिक्षण व पर्यटन सारख्या क्षेत्रांची भरभराट झाली. मोबाईल असो वा हायस्पीड मेट्रो या योजना काँग्रेस सरकारने आणलेल्या आहेत. बांद्रा कुर्ला कॉम्लेक्स, मंत्रालय, सरकारी कार्यालयांचा विस्तार हा काँग्रेसच्या काळातच झाला. राजीव गांधी …

Read More »

अरूणाचलमधील तवांगला जोडणाऱ्या सर्वाधिक लांब बोगद्याचे उद्घाटन

ईशान्य भारतातील ७ राज्यांतील विविध विकास अशा ₹५५,६०० कोटी रूपये किमतीच्या प्रकल्पांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुमारंभ करण्यात आला. त्याचबरोबर अरूणाचल प्रदेश मधील तवांग प्रदेशाला जोडणाऱ्या सामरिक सेला बोगद्याचा समावेश आहे. इटानगर येथून मणिपूर, मेगालय नागालँड, सिक्कीम, त्रिपुरा आणि अरूणाचल प्रदेशातील विविध विकासांचा शुमारंभ केला. सुमारे ₹८२५ कोटी खर्चून …

Read More »

काँग्रेसची ३९ लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहिरः राहुल गांधी वायनाड

आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने आपली ३९ उमेदवारांची यादी आज जाहिर केली. काँग्रेस नेते तथा राहुल गांधी हे उत्तर प्रदेशातील अमेठीबरोबरच केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज जाहिर करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र काँग्रेसने आज जाहिर केलेल्या ३९ उमेदवारांच्या यादीत दक्षिण भारतातील आणि ईशान्य भारतातील उमेदवारांची यादी …

Read More »

मुंबई काँग्रेसचे ९ मार्चला एकदिवसाचे शिबिर

लोकसभा निवडणुकीसाठी मुंबई काँग्रेस सज्ज असून पदाधिकारी व कार्यकर्ते यांना मार्गदर्शन करण्यासाठी उद्या दिनांक ९ मार्च रोजी म्हाडा कॉलनी, मुलुंड येथील आर. आर. सभागृहामध्ये एक दिवसाचे शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरीचे ऑनलाईन उद्घाटन काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे करणार आहेत. तसेच काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, विधिमंडळ …

Read More »

प्रकाश आंबेडकर यांचे आव्हान, डिक्लेरेशनमध्ये लिहिलेल्या बायकोला पंतप्रधान….

लोकसभा निवडणुका लागणार आहेत, मोदींनी घोषणा केली आहे की, ४०० पार जागा निवडून आणणार आहोत. लोकांनी ठरवलं पाहिजे की, या ४०० पैकी ४८ जागा या महाराष्ट्रात आहेत. ४०० मधून ४८ गेले की ३५२ राहतात. त्यामुळे ४८ जागा कमी करणे ही आपली जबाबदारी आहे. त्या ४८ जागा आपण कमी करूया असे …

Read More »

अतुल लोंढे यांची टीका, … हा भाजपाचा ‘चुनावी जुमला’

लोकसभा निवडणुकीतील पराभवाची चाहूल लागल्याने भारतीय जनता पक्ष एक एक जुमले फेकत आहे. महिला दिनाचे औचित्य साधत गॅस सिलिंडर १०० रुपयाने कमी केला आहे. राजस्थान विधानसभा निवडणुकीत ४५० रुपयांनी गॅस सिलिंडर देण्याचे होर्डींग लावले पण सत्ता येऊनही अद्याप ४५० रुपयांचे सिलिंडर काही आले नाही. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीवेळीही दोन सिलिंडर …

Read More »

विजय वडेट्टीवार यांचा आरोप, मुंबई महानगरपालिका भ्रष्टाचाराचे आगार

मुंबई महानगरपालिका भ्रष्टाचाराचे आगार बनले आहे. लोकनियुक्त सदस्य महापालिकेत नसल्याचा फायदा घेत काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मुंबई साफ करण्याचा उद्योग सुरू केला आहे. निविदा प्रक्रियेबाबतच्या मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन करुन रस्ते विकासाच्या निविदा अंतिम केल्याचे ७०० कोटींच्या घोटाळ्याचे प्रकरण आता समोर आले आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार सरकारने शोधला पाहिजे, अन्यथा जनतेच्या …

Read More »