Breaking News

Tag Archives: काँग्रेस

तेलंगणा राज्यातील निवडणूक निकालः राष्ट्रीय राजकारणावर प्रभाव टाकणारा

तेलंगणातील निकाल हीच एक गोष्ट आहे जी पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांमध्ये समोर आली आहे. तीन हिंदी-हृदय प्रदेशातील भाजपा विरुद्ध काँग्रेस या लढतीवर ‘राष्ट्रीय’ माध्यमांचे लक्ष केंद्रित असताना, या दक्षिणेकडील राज्यातील बहुकोणीय लढतीतून स्पष्ट निकाल येऊ शकतो. त्याचा राष्ट्रीय राजकारणावरही मोठा परिणाम होईल. सुमारे दोन वर्षांपूर्वीपर्यंत तेलंगणात काँग्रेसची कोंडी झाली होती. …

Read More »

ब्रम्हपूरीत रंगणार महिला महाराष्ट्र केसरी कुस्तीचा रणसंग्राम राज्यभरातील ६०० महिला कुस्ती पटुंचा सहभाग; लाखोंची बक्षीसे

ब्रम्हपूरी शहराला शिक्षण व आरोग्य विषयक सोयींसाठी अवघ्या विदर्भात नावलौकिक प्राप्त आहे. मात्र ह्याच शहरात क्रिडा स्पर्धांना देखील मोठा वाव असुन येथील अनेक खेळाडूंनी विविध क्रिडा स्पर्धांमध्ये आतापर्यंत राज्य व राष्ट्रीय स्तरावर देखील मजल मारली आहे. त्यामुळे याच पार्श्वभूमीवर यावर्षी या शहरात राज्यस्तरीय महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन विधानसभा …

Read More »

या प्रश्नांवर काँग्रेसचा नागपूर विधानभवनावर ‘हल्लाबोल’मोर्चा महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकारला जाब विचारणार

राज्यातील शेतकरी प्रचंड अडचणीत आहे, शेतमालाला भाव नाही, सरकार मदतीच्या कोरड्या घोषणा करत आहे, तरुणांना नोकऱ्या नाहीत, आरक्षणावर निर्णय घेतला जात नाही. ड्रग माफियांचा सुळसुळाट झाला आहे पण भाजपाप्रणित शिंदे सरकार जनतेच्या या मुलभूत प्रश्नांकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. जनतेला वा-यावर सोडून विदर्भात फक्त पर्यटनाला आलेल्या बेजबाबदार महाराष्ट्रविरोधी भाजपा व …

Read More »

… चर्चेची मागणी फेटाळल्याने काँग्रेससह विरोधकांचा सभात्याग

राज्यातील दुष्काळाने ६ लाख ३५ हजार हेक्टर बाधित झाले आहे. शेतकऱ्यात नैराश्य आहे. अजून पंचनामे झाले नाहीत. अधिकारी सरकारचे का ऐकत नाहीत, असा सवाल करत विधानसभेतील काँग्रेसचे नेते तथा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारला धारेवर धरले. पुढे बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले, राज्यात अवकाळीने पीक गमावले.आता नाशिक परिसरात कांदा उत्पादक …

Read More »

नाना पटोले यांचा सवाल, …नवाब मलिक देशद्रोही तर मिर्चीशी संबंधित प्रफुल्ल पटेल कोण?

माजी मंत्री नवाब मलिक यांच्यावर देशद्रोहाचे गुन्हे आहेत त्यांची साथ महायुतीत नको ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भूमिका दुटप्पीपणाची आहे. नवाब मलिक चालत नाहीत तर मग कुख्यात माफिया दाऊद इब्राहिमचा साथीदार इक्बाल मिर्चीशी संबंधीत प्रफुल्ल पटेल फडणवीसांना कसे चालतात? असा सवाल करुन फडणवीस यांचे देशप्रेम नकली आहे, अशा नकली देशप्रेमाची …

Read More »

बाळासाहेब थोरात यांचा आरोप तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बैठकीचे आश्वासन

दुधाचे भाव २५ रुपयांपर्यंत खाली आले आहेत, राज्यभर आंदोलने आणि मोर्चे सुरू आहेत. सरकार मात्र या विषयावर तोडगा काढायला तयार नाही, उलट दुग्धविकास मंत्री महाराष्ट्रातल्या दुधात भेसळ आहे असे सांगून दूध उत्पादकांची बदनामी करतात, परिणामी महाराष्ट्रातल्या दुधाकडे संशयाच्या नजरेने पाहिले जाते आणि परराज्यातल्या खाजगी दूध संस्थांची चंगळ होते असा गंभीर …

Read More »

निवासी आश्रमशाळांमधील २८२ पदे भरण्याची प्रक्रिया सुरू इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे

राज्यात इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत एकूण ९७७ खासगी अनुदानित आश्रमशाळा चालविण्यात येतात. या आश्रमशाळांना शालेय पोषण, इमारत भाडे आणि वेतन अशा तीन भागात अनुदान देण्यात येत आहे. यावर्षी २२५ कोटी रुपयांच्या तरतुदीपैकी आतापर्यंत १८० कोटी रुपयांचे वितरण करण्यात आले आहे. या आश्रमशाळांमध्ये एकूण २ लाख २३ हजार विद्यार्थी शिक्षण …

Read More »

नाना पटोले यांची आरोप, … स्थगन प्रस्ताव नाकारणारे सरकार शेतकरी विरोधी

अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते त्याची मदत अजून मिळालेली नाही आणि आता पुन्हा गारपीट व अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना भरीव मदत मिळावी यासाठी काँग्रेस पक्षाने स्थगन प्रस्ताव दिला होता पण भाजपा सरकारने चर्चेपासून पळ काढला. केवळ भरपूर मदत दिली आहे असे म्हणून चर्चा टाळणे हा …

Read More »

बाळासाहेब थोरात यांचा हल्लाबोल, … सरकार असंवेदनशील

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकार असवेदनशील आहे, याचा प्रत्यय आज सभागृहात आला. अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे महाराष्ट्रात शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या प्रश्नांवर चर्चा करावी अशी मागणी विरोधकांनी स्थगन प्रस्तावाद्वारे केली. मात्र सरकारने चर्चा तर सोडा साधे निवेदन सुद्धा केले नाही, असा घनाघाती आरोप काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब …

Read More »

विजय वडेट्टीवार यांचा हल्लाबोल, सरकारच्या चहापानाला जाणे, हा संकटातील शेतकऱ्याप्रती द्रोह

राज्यावर दुष्काळ, पाणीटंचाई व अवकाळीचे संकट उभे ठाकले असून शेतकऱ्यांच्या डोळयात अश्रु आहेत. अशा वेळी शेतकऱ्यांची झोप उडाली असताना सरकार मात्र सुस्त आहे. शेतकऱ्यांची ही दुर्देवी परिस्थिती असताना सरकारने चहापानाचा कार्यक्रम टाळायला हवा होत. हा कार्यक्रम टाळला असता तर शासन शेतकऱ्यांबरोबर असल्याचा दिलासा राज्यातील शेतकरी, शेतमजूर यांना मिळाला असता. दुर्देवाने …

Read More »